महापरिनिर्वाण दिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन (पुण्यतिथी) असून तो ६ डिसेंबर रोजी असतो.[१] महापरिनिर्वाण दिनाला १ डिसेंबर ते ७ डिसेंबर यादरम्यान मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून २५ लाखाहून अधिक भीमअनुयायी त्यांचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादीबौद्ध व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे (बौद्ध मंदिरे), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात.

पूर्वी महाराष्ट्रउत्तर प्रदेश महापरिनिर्वाण दिनाची सार्वजनिक सुट्टी असे.

पार्श्वभूमी[संपादन]

६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी महापरिनिर्वाण (निधन) झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर (दादर) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. त्यावेळी हिंदू स्मशान भूमी एवढीच त्या जागेची ओळख होती. काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला आला. आंबेडकरांना श्रद्धांजली व आजरांजली अर्पण करण्याकरिता भारताच्या सर्व प्रांतातून लाखोंच्या संख्येचा मोठा बौद्ध जनसमूदाय मुंबई येथील चैत्यभूमी (दादर) शिवाजी पार्क येथे दरवर्षी १ डिसेंबर पासून येत असतो. या जनसमूदायांची काळजी बृहन्मुंबई महानगरपालिका व आंबेडकरवादी स्वयंसेवक-स्वयंसेवका मोठ्या परिश्रमपूर्वक घेत असतात. दरवर्षी येणाऱ्या श्रद्धावान अनुयायांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढतच असते. २५ लाख अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेण्यासाठी व त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येत असतात. डॉ. आंबेडकरांचे अनुयायी-विचारवंत तसेच देश-विदेशातील जनतेकरिता हे चैत्यभूमी स्मारक प्रेरणास्थान आहे.

इ.स. २००२ पासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समीती'ची स्थापना करून महानगरपालिका प्रशासनाशी समन्वय साधून सर्व संस्थांना घेऊन परिश्रमणाने अनुयायांना सेवा-सुविधा पुरवण्याचे मोठे कार्य करत असते. २०१७ मध्ये ६१वा महापरिनिर्वाण दिन झाला, यावेळी १५ मिनिटे मौन पाळून, बुद्धवंदना म्हणून, मानवसमाजाप्रती शिस्तबद्ध मंगलमैत्री करून असा महापरिनिर्वाण दिन या वर्षापासून आयोजित करण्याचे ठरवले आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "डॉ अम्बेडकर महापरिनिर्वाण दिवस 2018 - Ambedkar Mahaparinirvan Diwas in Hindi". हिन्दीकीदुनिया.com (en-US मजकूर). 2017-01-24. 2018-05-09 रोजी पाहिले.