किन्हवली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

किन्हवली हे महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील गाव आहे.

भूगोल[संपादन]

किन्हवली १९.२१ अ़क्षांश उत्तरेस आणि ७३.२८ दक्षिणेस आहे. किन्हवली हे ठिकाण दोन नद्यांच्यामध्ये आहे. या गावाच्या उत्तरेस कानवी व दक्षिणेस काळु नदी आहे.या दोन्ही नद्यांमुळे या गावात पाण्याची टंचाई भासत नाही. गावात १० पेक्षा जास्त विहिरी व १५ पेक्षा जास्त सार्वजनिक बोअरवेल आहेत.

दळणवळण[संपादन]

किन्हवली - शहापुर हा सर्वांत महत्त्वाचा व वाताहातीचा मार्ग आहे. किन्हवली हे शहापूर तालुक्यातील प्रमुख ठिकाण म्हणुन ओळखले जाते. किन्हवलीच्या उत्तरेस किन्हवली-शहापूर मार्गात शेलवली, धसई, शेणवा,मळेगाव, बेडीसगाव, उंभ्रई, परटॉली, इ गावे लागतात. किन्हवलीच्या दक्षिणेला संगम, भादाणेफाटा, सरळगाव,मुरबाड इ गावे आहेत. किन्हवलीच्या पुर्वैस कानवे,खरिड,आपटे तर गुंड्याचा पाडा,चिखलगाव, टाकिपठार, सोगाव,धोंडालपाडा, खरांगण ई.गावे आहेत. किन्हवलीच्या पश्चिमेला चीचपाडा , शिळ,गेगाव, शेलवली ई.गावे आहेत. त्यातिलच सोगाव हे गाव खूप प्रगती पथावर आहे तेथे ग्रुप ग्रामपणचायत आहे ,दहावी पर्यंत मध्मिक शाळा आहे खूप गरजू मुले पुढे येत आहेत ह्या गावात शाही नदी वसलेली आहे जी काळू नदीला मिळते सोगाव हे शहापूर तालुक्याचे शेवटचे गाव आहे या मध्ये सर्व लोक सुख शांती ने वावरतात

बाजारपेठ[संपादन]

रविवार हा किन्हवली गावचा बाजाराचा दिवस. या दिवशी सर्व प्रकारची दुकाने लागतात. गावात ग्रामपंचायत आहे, जिचे संपुणॅ गावावर् नियंञण आहे.

शैक्षणिक विकास[संपादन]

शैक्षिणक विकासाच्या बाबतित सर्व प्रकारच्या सुखसोइ उपलब्ध् आहेत. गावात केजि पासुनच्या शाळांची सुविधा आहे.
१ली ते ४ थी मराठी व ईग्रजी माध्यम तसेच ५ वी ते १०वी मरठी ११वी व १२ वी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे
तसेच १५वी पर्यंत कला, विज्ञान, संगणकशास्त्र इ.प्रकारच्या शैक्षिणक सुविधा आहेत.मुलीसाठी बी.एड् कॉलेज तसेच राहण्यासाठी वस्तीगृह आहे.

आर्थिक विकासच्या सोई[संपादन]

किन्हवली गावामध्ये आर्थिक विकासाठी बॅकांची सोई उपलब्ध आहेत. या गवामध्ये १) बॅक ओफ महाराष्ट् २) ठाणे बॅक ३) संत गजानन महाराज ग्रामिण बिगर शेती पतसंस्था ४) बॅक ओफ बडोदा ५) द्वारका मल्टीस्टेट् को.ओप. क्रेडीट सोसायटी इत्यादीच्या आर्थिक मदतीसाठी सोई उपलब्ध आहेत.