कॅनडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कॅनडा
Canada
कॅनडा
कॅनडाचा ध्वज कॅनडाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: A Mari Usque Ad Mare (लॅटिन)
(समुद्रापासून समुद्रापर्यंत)
राष्ट्रगीत: ओ कॅनडा
कॅनडाचे स्थान
कॅनडाचे स्थान
कॅनडाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी ओटावा
सर्वात मोठे शहर टोरॉंटो
अधिकृत भाषा इंग्रजी, फ्रेंच
 - राष्ट्रप्रमुख युनायटेड किंग्डमचा तिसरा चार्ल्स, मेरी सायमन (गव्हर्नर जनरल)
 - पंतप्रधान जस्टिन ट्रुडो
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (ब्रिटनपासून)
जुलै १, १८६७ 
क्षेत्रफळ
 - एकूण ९९,८४,६७० किमी (२वा क्रमांक)
 - पाणी (%) ८.९२
लोकसंख्या
 -एकूण ३,७६,०२,१०३ (३६वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ३.९२ चौ. किमी/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १.१०५ निखर्व अमेरिकन डॉलर (११वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३४,२७३ अमेरिकन डॉलर (७वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन कॅनेडियन डॉलर
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी -३.५ ते -८
-२.५ ते -७ (DST)
आय.एस.ओ. ३१६६-१ CA
आंतरजाल प्रत्यय .ca
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +१
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


कॅनडा हा उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेस असलेला देश आहे. एकूण दहा प्रांत आणि तीन प्रादेशिक विभाग असलेल्या देशाच्या पूर्वेस अटलांटिक महासागर, पश्चिमेस प्रशांत महासागर तर उत्तरेस आर्क्टिक महासागर आहे. सुमारे ९९.८ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाने कॅनडाला जगातील सगळ्यात मोठ्या देशांच्या यादीत द्वितीय स्थान दिले आहे. दक्षिणेस, दोन देशांना विभागणारी जगातली सर्वात लांब आंतराष्ट्रीय सीमारेषा कॅनडा आणि अमेरिकेच्या दरम्यान असून हिची लांबी ८,८९१ किलोमीटर इतकी आहे. कॅनडाची राजधानी ऑटावा आहे. कॅनडातील प्रमुख शहरे टोरोंटो, व्हॅन्कुव्हर, माँत्रिआल आहेत.

इतिहास[संपादन]

नावाची व्युत्पत्ती[संपादन]

कॅनडा हे नाव इराक्वॉस जमातीतील गाव किंवा वाडी या अर्थाच्या शब्दापासून आलेले आहे.

प्रागैतिहासिक कालखंड[संपादन]

भूगोल[संपादन]

कॅनडा उत्तर अमेरिकेच्या उत्तर भागात पसरलेला विशाल देश आहे. याला फक्त अमेरिकेशी सीमा आहे व कॅनडाच्या इतर तीन बाजूंना समुद्र आहेत.

पेगीचा कोव्ह, हॅलिफॅक्स

चतुःसीमा[संपादन]

कॅनडाच्या दक्षिणेला अमेरिका, पूर्वेला अटलांटिक महासागर, उत्तरेला आर्क्टिक महासागर तर पश्चिमेला पॅसिफिक महासागर व अमेरिकेचे अलास्का राज्य आहेत.

राजकीय विभाग[संपादन]

कॅनडाचे १० प्रांत व तीन इतर राजकीय प्रदेश आहेत.

मोठी शहरे[संपादन]

लोकसंख्येनुसार शहरांची यादी
शहर लोकसंख्या
टोरॉंटो
२६,१५,०६०
मॉंत्रियाल
१६,४९,५१९
कॅल्गारी
१०,९६,८३३
ओटावा
८,८३,३९१
एडमंटन
८,१२,२०१
मिसिसागा
७,१३,४४३
विनिपेग
६,६३,६१७
व्हॅंकूव्हर
६,०३,५०२
हॅमिल्टन
५,१९,९४९
क्वेबेक सिटी
५,१६,६२२

समाजव्यवस्था[संपादन]

वस्तीविभागणी[संपादन]

इ.स. २००६च्या अंदाजानुसार कॅनडाची लोकसंख्या ३,१६,१२,८९७ आहे. येथील लोकसंख्येतील वाढ मुख्यत्वे बाहेरदेशातून येणाऱ्या लोकांमुळे आहे. वस्तीवृद्धीचा दर वर्षास ५.४% आहे.

कॅनडातील तीन चतुर्थांश वस्ती कॅनडा व अमेरिकेच्या सीमेपासून १५० कि.मी. (९० मैल) अंतराच्या आत राहते.

धर्म[संपादन]

कॅनडा मधील धर्म (२०११)[१]
ख्रिश्चन धर्म
  
67.2%
निधर्मी
  
23.9%
इस्लाम
  
3.2%
हिंदू धर्म
  
1.5%
शिख धर्म
  
1.4%
बौद्ध धर्म
  
1.1%
ज्यू धर्म
  
1.0%
इतर
  
0.6%

धर्मनिरपेक्षता ही कॅनडातील जनतेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. इ.स. २०११ च्या जनगणनेनुसार कॅनडातील लोकसंख्येत ६७.२% ख्रिश्चन, २३.९% निधर्मी, ३.२% मुस्लिम, १.५% हिंदू, १.४% शिख, १.१ बौद्ध, १% ज्यू व ०.६% इतरधर्मीय आहेत.

शिक्षण[संपादन]

कॅनडातील प्रांत व प्रदेश आपआपल्या भागातील शिक्षणव्यवस्थेची रचना ठरवतात. या सगळ्या व्यवस्था साधारण सारख्याच असतात परंतु त्यात प्रदेशानुसार संस्कृती व भूगोलाबद्दलची माहिती वेगवेगळी असते.[२] प्रदेशानुसार वयाच्या ५-७ पासून १६-१८ वर्षांपर्यंतचे शिक्षण सक्तीचे आहे. यामुळे कॅनडातील साक्षरताप्रमाण ९९% आहे. उच्चमाध्यमिक शिक्षणसुद्धा प्रांतीय व प्रादेशिक सरकारचालवतात व त्याचा खर्च सरकारी तिजोरीतून येतो. याशिवाय केंद्र सरकारकडून संशोधनासाठी निधी आणि विद्यार्थ्यांना कर्ज तसेच शिष्यवृत्ती दिल्या जातात. इ.स. २००२मध्ये कॅनडातील २५ ते ६४ वर्षांमधील व्यक्तींपैकी ४३% व्यक्तींनी उच्चमाध्यमिक शिक्षण घेतलेले होते तर २५-३४ वर्षांमधील व्यक्तींपैकी ५१% व्यक्ती उच्चशिक्षित होत्या.[३]

राजकारण[संपादन]

कॅनडा एक संपूर्ण लोकशाही देश म्हणून ओळख असून देशाला उदारमतवादी, सर्वसमावेशक राजकीय विचारसरणीची परंपरा आहे.  कॅनडाने घटनात्मक राजसत्ताचा अवलंब केला आहे ज्या अनुसार देशाच्या सर्वोच्च पदी राजा (किंवा राणी) ची  पदसिद्ध प्रमुख असतात. असे असले तरी कार्यालयीन अधिकार हाऊस ऑफ कॉमन्सद्वारे मंत्रिमंडळाला आणि त्यांच्या प्रमुखाला म्हणजेच पंतप्रधानांकडे असतात.

या देशाचा राजकीय साचा बहुपक्षीय पद्धतीचा असून देशात लिबरल पार्टी ऑफ कॅनडा आणि कॉन्सर्व्हेटिव्ह पार्टी ऑफ कॅनडा हे दोन प्रमुख पक्ष आहेत.

अर्थतंत्र[संपादन]

कॅनडा जगातील धनाढ्य देशांपैकी एक आहे व त्यामुळे तो ओ.ई.सी.डी. आणि जी-८ या संघटनांमध्ये शामिल आहे. कॅनडा जगातील व्यापारउदीमातील पहिल्या दहा देशांमधील एक आहे.[४] कॅनडाचे अर्थतंत्र मिश्र स्वरूपाचे आहे.[५] हेरिटेज फाउंडेशनने या देशाला आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत अमेरिकेपेक्षा खाली तर युरोपमधील देशांपेक्षा वर क्रमित केलेले आहे.[६]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "Religions in Canada—Census 2011". Statistics Canada/Statistique Canada.
  2. ^ Council of Ministers of Canada. "कॅनडातील शिक्षणपद्धतीचे सिंहावलोकन". Archived from the original on 2007-10-25. 2006-05-22 रोजी पाहिले.
  3. ^ Department of Finance. "कॅनडातील उच्चशिक्षण". Archived from the original on 2006-10-08. 2006-05-22 रोजी पाहिले.
  4. ^ WTO. "Latest release". 2008-07-03 रोजी पाहिले.
  5. ^ "PBS, Commanding Heights, map of the world's economic systems". 2008-01-31 रोजी पाहिले.
  6. ^ The Heritage Foundation. "Index of Economic Freedom". Archived from the original on 2008-06-07. 2009-01-09 रोजी पाहिले.