मध्य प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?मध्यप्रदेश

भारत
—  राज्य  —
Map

२३° १५′ ००″ N, ७७° २५′ ०१.२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ३,०८,१४४ चौ. किमी
राजधानी भोपाळ, मध्यप्रदेश
मोठे शहर इंदूर
जिल्हे ५०
लोकसंख्या
घनता
७,२५,९७,५६५ (सहावा)
• २४०/किमी
भाषा हिंदी भाषा
राज्यपाल मंगुभाई पटेल
मुख्यमंत्री मोहन यादव
मुख्य सचिव इकबाल सिंह बैंस
स्थापित १ नोव्हेंबर १९५६
विधानसभा (जागा) मध्य प्रदेश विधानसभा (२३०)
आयएसओ संक्षिप्त नाव IN-MP
संकेतस्थळ: मध्य प्रदेश राज्याचे संकेतस्थळ
भीमबेटकाचे चित्र
सांची स्तूप

मध्य प्रदेश (Madhyapradesh.ogg उच्चार ) हे भारत देशामधील क्षेत्रफळानुसार दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे व २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत ६ व्या क्रमांकावर आहे. ह्याला भारताचे हृदय देखील म्हंटले जाते, कारण ते भारत देशाच्या मध्यावर आहे. मध्य प्रदेशात वाघांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. म्हणून या राज्याला टायगर स्टेट या नावाने सुद्धा ओळखले जाते. फार फार पूर्वी अवंती महाजनपद म्हणून हा प्रदेश ओळखला जात होता. त्याकाळी त्या प्रदेशाची राजधानी उज्जैन होती. राज्याचे ६ सांस्कृतिक विभाग आहेत; निमाड, मालवा, बुंदेलखंड, बघेलखंड, महाकौशल आणि ग्वाल्हेर.

भारताच्या मध्य प्रदेश हे राज्य, भाषावार प्रांतरचनेनंतर १ नोव्हेंबर इ.स. १९५६ला बनवले गेले. त्यानंतर, १ नोव्हेंबर इ.स. २०००ला पुन्हा त्यातून छत्तीसगढ हा विभाग वेगळा होऊन त्याचे स्वतंत्र्य राज्य निर्माण केले गेले. नर्मदा नदीच्या खोऱ्यात हठ्नोरा आदिमानव हा मध्य प्रदेशात सुमारे ३,००,००० वर्षांपूर्वी, मिडल Pleistocene कालखंड पासून जगात आले असते हे दर्शविते. नंतर मेसोलीठीक कालावधी दिनांक ?? पेंट मातीची भांडी भीमबेटका रॉक shelters मध्ये सापडला आहे . कायथा संस्कृती (2100-1800 सालच्या) आणि माळवा संस्कृती (1700-1500 सालच्या) राज्यातील पश्चिम भागात शोधला गेले आहेत राहण्याचे चाल्कॉलीठीक साइट.

भूगोल[संपादन]

मध्य प्रदेशला लागून

मध्य प्रदेश या राज्याच्या मध्यावर नर्मदा नदी आहे व सातपुडाविंध्य हे पर्वत आहेत.

मध्य प्रदेश राज्याची राजधानी भोपाळ आहे.

प्रशासकीय विभाग[संपादन]

मध्य प्रदेश राज्याचे खालील दहा प्रशासकीय विभाग आहेत.

जिल्हे[संपादन]

मध्य प्रदेश राज्यात् खालील ४८ जिल्हे आहेत.

यावरील विस्तृत लेख पहा - मध्य प्रदेशमधील जिल्हे.


बाह्य दुवे[संपादन]