राम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
राम
Ramapanchayan, Raja Ravi Varma (Lithograph).jpg
श्रीराम

seyoey6 - इत्यादींची अधिपती देवता

मराठी राम
संस्कृत राम:
कन्नड რამა
तमिळ இராமர்
निवासस्थान अयोध्या उत्तर प्रदेश,भारत
शस्त्र धनुष्य, बाण
वडील दशरथ
आई कौसल्या
पत्नी सीता
अपत्ये लव , कुश
अन्य नावे/ नामांतरे कौसल्येय, दाशरथी, रघुनंदन, रघुनायक, रघुपती, भरताग्रज, इ.
या अवताराची मुख्य देवता विष्णू
मंत्र श्रीराम जय राम जय जय राम
नामोल्लेख रामायण
तीर्थक्षेत्रे अयोध्यापुरी

राम किंवा श्रीराम हे वाल्मीकिंंनी रचलेल्या ’रामायण’ या महाकाव्याचे नायक आहेत. श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार होते, अशी मान्यता आहे. ते अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला असे मानले जाते. प्रभु श्री राम सत्य वचनी व एक पत्नी व्रत व परम दयाळू होते.

श्रीरामाच्या काही नावांचा उगम[संपादन]

राम : राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला आणि दुसर्‍याना आनंदात रममाण करणारा.

रामचंद्र : रामाचा जन्म सूर्यवंशात झाला. त्याचा जन्म दुपारी १२ वाजता झाला, तरी त्याला रामभानु अशा तर्‍हेचे नावात सूर्य असलेले नाव दिले नाही. पुढे रामाने चंद्राचा हट्ट केल्याच्या प्रसंगावरून त्याला रामचंद्र हे नाव पडले असावे.

श्रीराम : दुष्ट रावणाचा वध करून आणि लंका जिंकून घेतल्यानंतर, म्हणजे स्वतःचे भगवंतपण दाखविल्यानंतर राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परतला, तेव्हा सर्व अयोध्यावासी त्याला ‘श्रीराम’ म्हणू लागले.

आदर्श व्यक्तिमत्व[संपादन]

श्रीराम आदर्श पुत्र होता. रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात. श्रीराम एकपत्‍नीव्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होता. प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्‍त केल्यावर त्याने आपल्या वैयक्‍तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्‍नीचा त्याग केला. श्रीराम हा आदर्श शत्रूसुद्धा होता. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ‘‘मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.’’

श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या असे रामायणातील उल्लेखांंवरून दिसून येते. म्हणूनच त्यांना भारतीय जनमानसात ‘मर्यादापुरुषोत्तम’ असे म्हटले जाते.

रामराज्य[संपादन]

पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, चित्त, बुद्धि आणि अहंकार यांच्यावर हृदयातील रामाचे (आत्मारामाचे) राज्य असणे, हे खरे रामराज्य होय, असे संतांचे सांगणे असते.

राम आणि त्याच्या जीवनावर आधारित काही ग्रंथ[संपादन]

  • रामायण (या महाकाव्याच्या विविध लेखकांनी लिहिलेल्या अनेक गद्य-पद्य प्रती आहेत. मूळ रामायण हे वाल्मीकी ऋषींनी संस्कृतमध्ये लिहिलेले काव्य आहे.)
  • अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम (मूळ गुजराती लेखक दिनकर जोषी, मराठीत अनुवाद करणार्‍या सुषमा शाळिग्राम)
  • गीत रामायण - ग.दि.माडगूळकर

पहा[संपादन]

संदर्भ[संपादन]


Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत