राजकारण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

राजकारण ही अनेक व्यक्तींनी एकत्रितरीत्या निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक राष्ट्रांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी व देश चालविण्यासाठी अनेक नेते जे निर्णय घेतात व जे काम करतात त्यास राजकारण म्हणतात. राजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही.राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे. राजकारणाचा हेतू खूप मोठा आहे. दुर्दैवाने आपण तशा व्यापक अर्थाने त्याच्याकडे पाहत नाही.[ संदर्भ हवा ]

राजकारणाची व्याख्या[संपादन]

"आपला देश किंवा आपले राज्य कसं चाललं पाहिजे? कुठल्या तत्वांवर चाललं पाहिजे ? त्याचे आग्रह काय असले पाहिजेत ? राज्य कशासाठी चालवलं पाहिजे?याचा विचार मांडणं, त्या विचारांचा आग्रह धरणं आणि तो पूर्ण करण्यासाठी सत्तेत येणं, सत्तेत येण्यासाठी निवडणुका लढवणं, त्या जिंकणं, त्या जिंकण्यासाठी आपला विचार लोकांना पटवणं, व नंतर ते सत्यात उतरवणं" म्हणजे राजकारण.[ संदर्भ हवा ]

राजकारणाचा दृष्टिकोन[संपादन]

राजकारण फक्त निवडणुकीपुरतं किंवा लढायांपुरतं मर्यादित नाही. राजकारणाला विचार असणं व त्या विचारांना मूल्यांचा आधार असणं व हेतू असणं आवश्यक आहे. राजकारणाला काही श्रद्धा व हेतू असणं आवश्यक आहे.असा विचार प्रत्येक नागरिकाने व राजकारण्यांनी ठेवणं गरजेचं आहे.[ संदर्भ हवा ]

आपल्याला काय करायचंय हे आधी निश्चित करायला हवं,आपली दिशा पक्की असायला हवी.आपण सर्व नागरिकांनी सर्वांनी मिळून एक मोठ्या माणुसकीचं व जगात शांतता नांदेल,प्रत्येक हाताला काम मिळेल,शेतकरी सधन होईल असं काम करणं व ती व्यवस्था निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे तेव्हाच अखंड राष्ट्र सुखी झाले असे म्हणता येईल.[ संदर्भ हवा ]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

शरद पवार