Jump to content

मुकुंद रामराव जयकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुकुंद जयकर या पानावरून पुनर्निर्देशित)

बॅरिस्टर डॉ. मुकुंद रामराव जयकर (१३ नोव्हेंबर, इ.स. १८७३१० मार्च, इ.स. १९५९) हे लेखक, विधिज्ञ, राजकीय पुढारी, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते.[] पुणे करारावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या नेत्यांमध्ये यांचा समावेश होता.


या विभागातील मजकूर http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=11176 येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.



जयकरांचा जन्म मुंबईत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी मुंबईतील एल्फिन्स्टन विद्यालय व सेंट झेवियर महाविद्यालय यांतून शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठाच्या अनेक पदव्या त्यांनी संपादन केल्या. वयाच्या चोविसाव्या वर्षी इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर झाले आणि मुंबई उच्च न्यायालयात कायदेपटू म्हणून प्रसिद्धीस आले. १९१९ साली पंजाबमध्ये झालेल्या हत्याकांडाची चौकशी करण्याकरता काँग्रेसने जी एक समिती नेमली होती, तिचे ते सदस्य होते. त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय असा भाग घेतला नाही; तरीही राजकीय वाटाघाटीत मध्यस्थ म्हणून ते यशस्वी ठरले. या दृष्टीने ’गांधी–आयर्विन करार (१९३१” आणि ’पुणे करार (१९३२)’ या बाबतींत त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे.

वकील म्हणून त्यांनी भरपूर पैसे मिळविले. त्यांतून त्यांनी अनेक संस्थांना देणग्या दिल्या. त्यांनी टिळक स्वराज्य फंडालाही मोठी देणगी दिलीे होती. प्रथम ते स्वराज्य पक्षात होते. नंतर त्यांनी केळकर प्रभृतींबरोबर प्रतिसहकार पक्ष काढला. ते प्रिव्ही कौन्सिल व फेडरल कोर्टातही न्यायाधीश झाले. तिन्ही गोलमेज परिषदांचे ते सभासद होते. त्यांना पुढे संविधान समितीचे सभासद म्हणून घेतले; पण फार दिवस ते काम त्यांनी केले नाही. मुंबईच्या विधिमंडळात त्यांनी १९२३–२६ च्या दरम्यान स्वराज्य पक्षाचे नेतृत्व केले. पुढे ते मध्यवर्ती विधिमंडळात राष्ट्रीय पक्षाचे उपनेते होते. (१९२६–३०) आयुष्याच्या अखेरच्या दिवसांतील पुणे विद्यापीठाची स्थापना, ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होय. ते पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. वकिलीच्या धंद्यात त्यांना अतोनात पैसा मिळाला. त्यांपैकी दोन लाख रुपये त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांना देणगीरूपाने दिले. मुकुंदराव जयकर हे हिंदू महासभेचे संविधान सभेतील सदस्य होते.

स्टडीज इन वेदान्त’ या इंग्रजी पुस्तकाचे जयकरांनी संपादन केले. त्यांचे हिंदू धर्माविषयीचे विचार त्यांनी ’मराठी मंदिर’ या नियतकालिकातील लेखांद्वारे प्रकाशित केले.

संमेलनांचे अध्यक्षपद

[संपादन]

पुणे येथे १९१८ साली भरलेल्या १४व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद बॅ.मुकुंदराव जयकरांनी भूषविले होते. २३ एप्रिल १९२३ रोजी गुलबर्गा येथे झालेल्या हैदराबाद सामाजिक सुधार संघाच्या अध्यक्षस्थानी होते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले
  2. ^ http://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/92706/7/07_chapter-2.pdf