कुंवरसिंह
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
कुंवरसिंह | |
---|---|
टोपणनाव: | कुंवरसिंह |
मृत्यू: | एप्रिल २६, १८५८ जगदीशपूर |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा |
धर्म: | हिंदू |
कुंवरसिंह हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म इ.स. १७७७ साली जगदिशपूरचे राजा जादासिंह यांच्या कडे झाला होता.
बालपण आणि शिक्षण[संपादन]
कुंवरसिंह यांचे मूळ गाव शहाबाद तालुक्यातील जगदिशपूर. जमीनदार घराण्यात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून अश्वरोहण, नेमबाजी, भालायुद्ध, तलवारयुद्ध, तिरंदाजी इत्यादी युद्धकलांचे त्यांनी उत्तम शिक्षण प्राप्त केले होते.
कारकीर्द[संपादन]
राजा जादासिंहजीच्या मृत्युनंतर जगदिशपूरच्या संस्थानाचा कारभार कुंवरसिंहानी स्वीकारला. १८५६ च्या शेवटच्या काळात इंग्रज सरकारने जगदिशपूरचे संस्थान खालसा केले. कुंवरसिंहानी या अन्यायारोधात लढा देण्याचे ठरविले. दाणापूर-पाटणा भागातील क्रांतिकारकांचे नेतृत्व पत्करून जुलै २९, १८५७ रोजी या ८० वर्षाच्या क्रांतिकारकाने आरानगरवर हल्ला करून ३०० हून आधील गोर्या सैनिकांना ठार केले.[ संदर्भ हवा ] या युद्धात ते जबर जखमी झाले. २३ मे १८५८ ला कुंवरसिंहाचे प्राणोत्क्रमण झाले. त्यांचा भाऊ अमरसिंह याने हा लढा पुढे चालू ठेवला.
संदर्भ आणि नोंदी[संपादन]