पनवेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पनवेल
जिल्हा रायगड
राज्य महाराष्ट्र
दूरध्वनी संकेतांक ०२२
टपाल संकेतांक ४१०-२०६
निर्वाचित प्रमुख प्रशांत ठाकूर
(आमदार)
पनवेल is located in महाराष्ट्र
पनवेल
पनवेल
पनवेल (महाराष्ट्र)

पनवेल हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातल्या रायगड जिल्ह्यातील, पनवेल तालुक्यातले महानगरपालिका असलेले एक शहर आहे. पनवेलला कोकणाचे प्रवेशद्वार मानले जाते व हे शहर नवी मुंबईला लागून आहे. मुंबई-गोवा महामार्ग व मुंबई-पुणे द्रूतगतिमार्ग येथून सुरू होतात. पनवेल मुंबईपासून ३६.८ कि.मी. अंतरावर आहे.

रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे, विकसित व महत्त्वाचे शहर अशी पनवेलची ओळख आहे. पनवेल हा जिल्ह्यातील ४ तालुक्यांपैकी, ५६४ गावे असलेला सर्वात मोठा तालुका आहे.

भूगोल[संपादन]

पनवेल गाढीनदीवर वसले आहे. ही नदी पुढे जाऊन पनवेलची खाडी बनते. पनवेल समुद्रसपाटीपासून १२.१७५ मीटर उंचीवर वसलेले आहे.

लोकजीवन[संपादन]

२०११ च्या जनगणनेनुसार पनवेलची लोकसंख्या ३,७५,४६३ इतकी आहे. यामध्ये पुरुष ५३% तर महिला ४७% आहेत. शहरातील ७८% लोक साक्षर (पुरुष ८१%, महिला ७४%) असून १३% लोकसंख्या ६-वर्षाखालील वयोगटातील आहे. पनवेल शहरावर पनवेल नगरपालिका तर नवीन पनवेल (पूर्व व पश्चिम), कामोठे व कळंबोली यावर सिडको प्रशासन करते.

इतिहास[संपादन]

पनवेल जवळजवळ ३०० वर्ष जुने आहे. हया शहाराला जुन्या काळात पानेली हया नावाणे देखील ओळखले जायचे. या काळात मोगल, इंग्रज, पोर्तुगीज व मराठ्यांनी विविध कालावधींसाठी पनवेलवर राज्य केले. सन १८५२ मध्ये पनवेल नगरपालिकेची स्थापना झाली. ही महाराष्ट्राची सर्वात पहिली नगरपालिका आहे. १९१० पासून नगरपालिका निवडणुका सुरू करण्यात आल्या. १९१० - १९१६ मध्ये युसुफ नुर मोहम्मद हे पहिले नगराध्यक्ष म्हणुन निवडून आले. समुद्रमार्गे व खुश्कीच्या व्यापारामुळे पनवेल वाढत व प्रगती करत राहिले. पेशवाई काळात शहरात अनेक वाडे बांधण्यात आले व आजही काही वाडे खंबीरपणे उभे आहेत.


पनवेल हे दिवा-पनवेल, छत्रपती शिवाजी टर्मिनल-पनवेल,अंधेरी-पनवेल(ठाणे मार्गे )या चार रेल्वे मार्गांवरील स्टेशन आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


पनवेल
दूरध्वनी क्र.- +९१-२२- फॅक्स क्र.-+९१-२२- ई-मेल पत्ता- संकेत स्थळ-
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
खांदेश्वर
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य(हार्बर) उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
[[]]
स्थानक क्रमांक:२५ मुंबई सीएसटीपासूनचे अंतर ४९ कि.मी.


ट्रेन-छोटी.png
कृपया भारतीय रेल्वे-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.