भारतीय संसद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भारतीय संसद
भारताची संसद
Emblem of India.svg
१५ वी संसद
प्रकार
प्रकार द्विसदन
सभागृह राज्यसभा (राज्यांची परिषद)
लोकसभा (लोकांचे सभागृह)
इतिहास
नेते
राष्ट्रपती रामनाथ कोविंद,
२५ जुलै २०१७
राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू,
१७ ऑगस्ट २०१७
राज्यसभा उपाध्यक्ष प. जो. कुरिअन, काँग्रेस
२१ ऑगस्ट २०१२
लोकसभा सभापती ओम प्रकाश बिर्ला, भाजपा
१९ जून २०१९
लोकसभा उपसभापती रिक्त,
संरचना
सदस्य ७९०
२४५ राज्यसभा सदस्य
५४५ लोकसभा सदस्य
राजकीय गट संपुआ, रालोआ, तिसरी आघाडी, इतर
निवडणूक
मागील निवडणूक २००९ लोकसभा निवडणुका
मागील निवडणूक २०१४ची लोकसभा निवडणूक
बैठक ठिकाण
New Delhi government block 03-2016 img3.jpg
संसद भवन, नवी दिल्ली, भारत
संकेतस्थळ
http://loksabha.nic.in/
http://rajyasabha.nic.in/
तळटिपा

लोकसभा[संपादन]

मुख्य पान: लोकसभा

लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभा हे जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. लोकसभा मताधिकारांच्या आधारे थेट निवडणुकीने निवडलेल्या लोकप्रतिनिधींची बनलेली असते. राज्यघटनेत या सभागृहाची अधिकतम सदस्यसंख्या ५५२ आहे, ज्यात राज्यांचे प्रतिनिधित्व म्हणून ५३० सदस्य, केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व म्हणून २० सदस्यांपर्यंत आणि राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले अँग्लो-इंडियन समाजाचे दोन सदस्य अशी निवड केली जाते. प्रत्येक राज्यासाठी देण्यात आलेल्या जागांची संख्या आणि राज्याची लोकसंख्या यांच्यातील गुणोत्तर आतापर्यंत सर्व राज्यांसाठी समान आहे.[१][२]

राज्यसभा[संपादन]

मुख्य पान: राज्यसभा

राज्यसभा हे वरिष्ठ सभाग्रह आहे.राज्यसभेची सदस्यसंख्या २५० असून पैकी २३८ हे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून तर १२ राष्ट्रपतीद्वारा विशेष क्षेत्रातून नेमले जातात. भारतात प्रथमच दुसऱ्या सभागृहाच्य्या स्थापनेची तरतूद २०१८ मधील कायद्यानुसार करण्यात आली आणि १९२१ मध्ये स्थापना करण्यात आली.[३]

संसदेची कार्ये[संपादन]

 • राजकीय आणि वित्तीय नियंत्रण संस्था(किंवा कार्यकारी जबाबदारी)
 • प्रशासनावर नजर (किंवा प्रशासकीय उत्तरदायित्व)
 • माहितीविषयक अधिकार (माहिती मिळविण्याचा अधिकार)
 • प्रतिनिधीविषयक, गाऱ्हाणे मांडणे, इ., शैक्षणिक आणि सल्ला विषयक कार्ये.
 • संघर्ष मिटवणे आणि राष्ट्रीय एकात्मता साधणे.
 • कायदे करणे, विकासात्मक कार्ये, सामाजिक आभियांत्रिकीद्वारा समाज परिवर्तन,
 • संविधान सुधारणा
 • नेतृत्वविषयक अधिकार (पुढाऱ्यांची भरती आणि त्यांचे प्रशिक्षण.[४]

कायदे निर्मिती प्रक्रिया[संपादन]

आपल्या देशात संसदेला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. कायदा तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत स्वीकारण्यात येते. त्या पद्धतीला ‘कायदानिर्मितीची प्रक्रिया’ असे म्हणतात. कायद्याचा कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो. या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक म्हटले जाते.

संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयके मुख्यतः दोन प्रकारची असतात.

 • अर्थ विधेयक
 • सर्वसाधारण विधेयक

विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी ते पुढील प्रक्रियेमधून जाते.

 • पहिले वाचन
 • दुसरे वाचन
 • तिसरे वाचन

दोन्ही सभागृहांनी विधेयकास मंजुरी दिल्यानंतर ते राष्ट्रपतींच्या संमतीसाठी पाठवले जाते. केंद्रात लोकसभा व राज्यसभा यांच्यात विधेयकाबद्दल मतभेद झाल्यास दोन्ही सदनांच्या संयुक्त अधिवेशनात विधेयकाचे भवितव्य ठरते. राष्ट्रपतींच्या संमतीदर्शक स्वाक्षरीनंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते व कायदा तयार होतो.

भारतीय संसदेसंबंधी पुस्तके[संपादन]

 • आपली संसद (सुभाष कश्यप) : हे मूळ इंग्रजीतले पुस्तक जवळजवळ सर्व भारतीय भाषांत अनुवादित झाले आहे.
 • The Indian Parliament (देवेंद्र सिंग)
 • भारतीय संसद व संसदेची कार्यपद्धती (श्रीकृष्ण रा. जोशी)

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Parliament of India, Lok Sabha". loksabha.nic.in. 2019-08-28 रोजी पाहिले.
 2. ^ "Parliament (Articles 79-88/122)". ClearIAS (इंग्रजी भाषेत). 2019-08-28 रोजी पाहिले.
 3. ^ KALE, RAMESHWAR. "Rajya Sabha introduction".
 4. ^ आपली संसद ले.सुभाष कश्यप