दलाई लामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१४ वे दलाई लामा

दलाई लामा हे तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते असतात. ‘दलाई लामा’ याचा अर्थ ‘ज्ञानाचा महासागर’ असा होतो. जगभरातील बौद्ध यांना आपले धर्मगुरू मानतात. आतापर्यंत १३ दलाई लामा होऊन गेले असून सध्याचे चौदावे दलाई लामा हे तेन्झिन ग्यात्सो आहेत. चीनने तिबेट देशावर केलेल्या विरोधामुळे त्यांना भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील धरमशाला येथे आश्रय घेतला आहे.

इतिहास[संपादन]

तिबेटमध्ये दलाई लामांची परंपरा चौदाव्या शतकापासून सुरु झाली. ‘दलाई’ म्हणजे महासागर व ‘लामा’ म्हणजे ज्ञान, दलाई लामा या संयुक्त शब्दाचा अर्थ ज्ञानाचा महासागर असा आहे. हे लामा बुद्धिष्ट गुरु किंवा शिक्षक असतात. पहिले लामा जेनडून द्रूप हे ड्रेपुंग विहाराचे उच्च लामा झाले. ‘ड्रेपुंग’ हा तिबेटमधील सर्वात भव्य विहार आहे. पहिल्या लामांनंतर प्रत्येक नवा दलाई लामा हा पूर्वीच्या लामाचा अवतार मानला जाऊ लागला. सध्या दलाई लामा हे तिबेटीय लोकांचे सर्वोच्च धार्मिक नेते व शासन प्रमुख देखील आहेत. इ.स. १३९१ ते इ.स. १९३३ या कालखंडात तेरा दलाई लामा होऊन गेले. तिबेटीय परंपरेनुसार ज्येष्ठ धर्मगुरु व शासन मिळून नवीन दलाई लामा निवडीची जबाबदारी पार पाडतात.

बाह्य दुवे[संपादन]

चीनचा नवा खोडसाळपणा