महाप्रजापती गौतमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
महाप्रजापती गौतमी
Prince Siddhartha with his maternal aunt Queen Mahaprajapati Gotami.JPG
राजकुमार सिद्धार्थांसोबत महाराणी महाप्रजापती गौतमी
धर्म बौद्ध धर्म
गुरू तथागत गौतम बुद्ध
भाषा पाली
व्यवसाय भिक्खुणी
पती शुद्धोधन
अपत्ये नंद

महाप्रजापती गौतमी अर्हत पद प्राप्त करणाऱ्या एक भिक्खुणी होत्या. तसेच त्या जगातील पहिल्या भिक्खुणी होय.[ संदर्भ हवा ] महाप्रजापती गौतमी ह्या शुद्धोधनाची दुसरी पत्नी, महामायांची बहीण तर सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या मावशी व सावत्र आई होत्या. महामायेच्या निधनानंतर त्यांनी राजकुमार सिद्धार्थचा सांभाळ केला. पुढे सिद्धार्थ बुद्ध झाल्यानंतर त्यांच्या भिक्खु संघात प्रवेशाची अनुमती गौतमींनी बुद्धांकडे केली होती. कारण तोपर्यंत या संघात केवळ पुरुषच होते. आनंदबुद्ध यांची याविषयी चर्चा झाली व त्यांनी भिक्खू संघात स्त्रियांच्या प्रवेशाला अनुमती दिली. प्रजापती गौतमींनी यशोधरा काही इतर स्त्रियांसह बौद्ध संघात पहिल्यांदा भिक्खुणी म्हणून प्रवेश केला. तया जगातील पहिल्या भिक्खुणी ठरल्या. बुद्धांचे ‘गौतम’ नाव हे गौतमींच्या नावाने पडलेले आहे असेही मानले जाते.[ संदर्भ हवा ]