संविधान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

संविधान किंवा राज्यघटना (इंग्रजी : Constitution) हा एखादा देश अथवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेले मूळ आदर्श, पायंडे अथवा नियमांचा संच आहे. हे नियम एकत्रितपणे राष्ट्राचे अस्तित्व ठरवतात. जर हे नियम एक अथवा अनेक पुस्तके अथवा कायदेशीर कलमामध्ये लिहिले गेले असतील तर त्याला लिखित संविधान असे म्हणतात. संविधान हे केवळ एका देशापुरते मर्यादित नसून संस्था, संघटना इत्यादी देखील आपापले संविधान बनवू शकतात.

इंग्रजी भाषेमध्ये २२ भाग, ४४४ कलमे, ११८ दुरुस्त्या व १,१७,३६९ शब्द असलेले भारताचे संविधान हे एका सार्वभौम राष्ट्राने तयार केलेले जगातील सर्वात मोठे संविधान आहे. ह्याउलट केवळ ७ कलमे व २६ दुरुस्त्या असलेले अमेरिकेचे संविधान हे जगातील सर्वात लहान लिखित संविधान मानले जाते.

हे सुद्धा पहा[संपादन]

भारताचे संविधान

आम्ही भारताचे लोक

भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य

घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार,

अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे

स्वतंत्र; दर्जाची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये

व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्रची एकता एकता आणि एकात्मता

यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रबंधित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे

संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वत;प्रत अर्पण करत आहोत.