Jump to content

"लोकमान्य टिळक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १३८: ओळ १३८:
==[[पुणे|पुण्यातल्या]] भाजी मंडई समोरील पुतळ्याचा इतिहास==
==[[पुणे|पुण्यातल्या]] भाजी मंडई समोरील पुतळ्याचा इतिहास==
[[पुणे|पुण्याच्या]] [[महात्मा फुले]] मंडईत पांढर्‍या शुभ्र मेघडंबरीत असणार्‍या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे २२ जुलै १९२४ रोजी अनावरण झाले. लोकमान्यांच्या निधनानंतर लगेचच म्हणजे १७ ऑगस्ट १९२० रोजीच्या पुणे नगरपालिकेच्या सभेत या पुतळ्याचा ठराव मांडण्यात आला व त्यासाठी पंधरा हजार रुपयांची तरतूदही करण्यात आली. त्यानंतर वर्षभराने झालेल्या सभेत शिल्पकार [[विनायकराव वाघ|विनायक व्यंकट वाघ]] यांना आगाऊ सहा हजार रुपये देण्यात यावेत, असे ठरले. नगरपालिकेच्या अकाउंटंटने मात्र या खर्चासाठी प्रांतिक सरकारची म्हणजे मुंबई सरकारची परवानगी घ्यावी असे सुचविले. ९ जून १९२२ रोजी नगरपालिकेचेया लोकनियुक्त अध्यक्ष [[न.चिं. केळकर]] अध्यक्षस्थानी असलेल्या पालिकेच्या सभेत अकाउंटंटचा आक्षेप चर्चेला आला असता, ‘या खर्चासाठी अन्य कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही,’ असे मत व्यक्त करण्यात आले.
[[पुणे|पुण्याच्या]] [[महात्मा फुले]] मंडईत पांढर्‍या शुभ्र मेघडंबरीत असणार्‍या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे २२ जुलै १९२४ रोजी अनावरण झाले. लोकमान्यांच्या निधनानंतर लगेचच म्हणजे १७ ऑगस्ट १९२० रोजीच्या पुणे नगरपालिकेच्या सभेत या पुतळ्याचा ठराव मांडण्यात आला व त्यासाठी पंधरा हजार रुपयांची तरतूदही करण्यात आली. त्यानंतर वर्षभराने झालेल्या सभेत शिल्पकार [[विनायकराव वाघ|विनायक व्यंकट वाघ]] यांना आगाऊ सहा हजार रुपये देण्यात यावेत, असे ठरले. नगरपालिकेच्या अकाउंटंटने मात्र या खर्चासाठी प्रांतिक सरकारची म्हणजे मुंबई सरकारची परवानगी घ्यावी असे सुचविले. ९ जून १९२२ रोजी नगरपालिकेचेया लोकनियुक्त अध्यक्ष [[न.चिं. केळकर]] अध्यक्षस्थानी असलेल्या पालिकेच्या सभेत अकाउंटंटचा आक्षेप चर्चेला आला असता, ‘या खर्चासाठी अन्य कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही,’ असे मत व्यक्त करण्यात आले.

१९२२-२३ मध्ये सरकारी हिशेब तपासनिसाने पुतळा आणि शिल्पकाराचा खर्च करण्यास मनाई केली. जिल्हाधिकार्‍यांनीतर ६ हजार रुपये वसूल करण्यासाठी भारतमंत्री (Secretary of State for India) यांच्या वतीने जिल्हा कोर्टात दावा दाखल करण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व कालखंDaaत अशा प्रकारचा दावा झालेला हा पहिलाच पुतळा असावा. टिळक हयात असताना सरकार त्यांच्यावर खटले भरतच होते; आता पुतळ्यावर खटला सुरू झाला. सरकार आणि कोर्ट या दोघांचेही दडपण पुणे नगरपालिकेच्या अध्यक्षांवर आले. शिल्पकार वाघांना या कशाचीच गंधवार्ता नव्हती.

कोर्टाने पुतळा उभारण्याच्या खर्चाला बंदी घातली होती. अखेर केसरी मराठा ट्रस्टने खर्चाची बाजू उचलण्याची तयारी दाखवली. न्यायालयात विरुद्ध निकाल गेल्यास हे पैसे ट्रस्ट परत मागणार नाही, असे सांगितल्याने २२ जुलै १९२४ रोजी पंडित मोतीलाल नेहरू यांच्या हस्ते पुतळा बसविण्यात आला. मात्र न्यायालयाने सरकारविरुद्ध निर्णय दिला आणि पुणे नगरपालिकेची भूमिकाच योग्य ठरली.


== संदर्भ ==
== संदर्भ ==

१३:४८, ४ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

बाळ गंगाधर टिळक

इ.स. १९१० च्या सुमारास घेतलेले टिळकांचे प्रकाशचित्र
टोपणनाव: लोकमान्य टिळक
जन्म: जुलै २३,इ.स. १८५६
रत्‍नागिरी(टिळक आळी), रत्‍नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: ऑगस्ट १, इ.स. १९२०
पुणे, महाराष्ट्र, भारत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस
पत्रकारिता/ लेखन: केसरी
मराठा
पुरस्कार: लोकमान्य
धर्म: हिंदू
वडील: गंगाधर रामचंद्र टिळक
आई: पार्वतीबाई टिळक
पत्नी: तापीबाई
अपत्ये: श्रीधर बळवंत टिळक[]
तळटिपा: "स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच "

बाळ गंगाधर टिळक (जुलै २३,इ.स. १८५६ - ऑगस्ट १, इ.स. १९२०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.

बालपण

टिळकांचा जन्म २३ जुलै इ.स. १८५६ मध्ये रत्‍नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज रत्‍नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते[]. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत.[]

त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका अँग्‍लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला. तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली.[] पुण्याला आल्यावर लवकरच त्यांच्या आई मरण पावल्या आणि वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्याचे काका गोविंदपंत यांनी केला. गोविंदपंत स्वतः अशिक्षित असले तरी त्यांनी टिळकांना नेहमी प्रोत्साहन दिले. मृत्यूपूर्वी गंगाधरपंतानी त्यांचा विवाह दहा वर्षाच्या तापीबाई बरोबर करून दिला.[]

Family of Lokmany Bal Gangadhar Tilak

(छायाचित्र : टिळक कुटुंबीय- लोकमान्य टिळकांच्या पत्‍नी सत्यभामाबाई उर्फ तापीबाई आणि मुली व नातवंडे यांच्याबरोबर. छायाचित्रण वर्ष अज्ञात)

कसरतीचे महत्त्व

इ.स. १८७२ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासूनच टिळक अत्यंत कृश होते. त्यांच्या पत्‍नी तापीबाईपण त्यांच्यापेक्षा दणकट होत्या. यावरून त्यांचे मित्र अनेकदा त्यांना चिडवत असत. त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि एक वर्ष आपले लक्ष पूर्णपणे शारीरिक सामर्थ्य संपादन करण्यावर केंद्रित केले. त्यासाठी त्यांनी व्यायामशाळेत जाऊन नियमित कसरती व व्यायाम करणे चालू केले. कुस्ती, पोहणे व नौकाचालन (rowing) हे त्यांचे आवडते खेळ होते. यासोबतच त्यांनी परिपूर्ण आहार पण चालू ठेवला. एका वर्षाअंती त्यांची शरीरयष्टी जोमदार बनली. परंतु या काळात त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले व ते प्रथम वर्षाच्या परीक्षेमध्ये नापास झाले. पण त्यांच्या मते, ते एक वर्ष व्यर्थ गेले नव्हते व त्याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात अनेक शारीरिक व मानसिक कष्टांना सामोरे जाण्यास झाला.[]

कॉलेज जीवन

डेक्कन कॉलेजमध्ये असतांना त्यांना अनेक मान्यवंत शिक्षकांच्या हाताखाली शिकता आले. प्रोफेसर वर्ड्‌स्वर्थ आणि प्रोफेसर शूट यांनी त्यांची अभिजात इंग्रजी साहित्यातील रुची वाढवली तर गणित शिकवणाऱ्या प्रोफेसर केरूअण्णा छत्रे यांनी त्यांच्यावर विशेष छाप टाकली. कॉलेजच्या दिवसात त्यांचे वाचनपण प्रचंड होते. त्यांनी संस्कृत धर्मग्रंथे, इंग्रजीमधील राजनीती आणि अतिभौतिकी (मेटा-फिजिक्स) वरील पुस्तके (विशेषतः हेगेल, कांट, स्पेन्सर, मिल, बेंथम, व्हॉल्टेअर आणि रूसो) तसेच मराठीमधील संतसाहित्याचे वाचन केले. कॉलेजमधील मित्रांमध्ये ते स्पष्टवक्ते आणि बेधडक म्हणून प्रसिद्ध होते. इ.स. १८७७ मध्ये, गणितामध्ये प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन ते बी.ए. झाले. बी.ए.ची पदवी मिळाल्यावर त्यांनी एल्‌एल.बी.. करण्याचे ठरवले. त्यांची गणितातील रुची आणि संशोधनाची आवड पाहता एल्‌एल.बी. करण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या मित्रांसाठी धक्कादायक होता. त्यांनी टिळकांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले, " ज्या अर्थी, मी माझे आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण करण्याचे ठरवले आहे, त्या अर्थी मला असे वाटते की, कायद्याचे ज्ञान मला उपयोगीच पडेल. मला वाटत नाही की माझे आयुष्य ब्रिटिश साम्राज्याविरोधात संघर्षाशिवाय व्यतीत होईल."

सामाजिक मते व उद्गार

इंग्रजांचे अंधानुकरण

इंग्रजांचे अंधानुकरण करणार्‍या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का? असा त्यांचा सवाल होता.[]

प्लेगविरोधी फवारणीस विरोध

इ.स. १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. बाळ गंगाधर टिळक यांनी मराठी पत्रकारितेत मोठे योगदान दिले. तथापि, त्यांनी पुण्यातील प्लेगच्या साथीच्या काळात घेतलेली भूमिका महत्वपूर्ण ठरली . उंदीर नष्ट करण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुण्यात फवारणी मोहीम सुरू केली तेव्हा, पुणेकरांनी विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी पुण्याचा ब्रिटिश रेसिडेंट वॉल्टर चार्लस रँड याने लष्कराची मदत घेतली. व त्यांचे जवान पुण्यात आरोग्य विभगाच्या मदतीला आले, घरात घुसून जबरदस्तीने फवारणी करवून घेऊ लागले. आणि साथीचा फैलाव झाल्याचे कारण सांगून लोकांचे सामान, कपडे-लत्ते सर्रास जाळून टाकु लागले, यामुळे पुण्यात एकच हाहाकार उडाला. रँडसाहेब मुद्दाम आमची घरे जाळीत आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. टिळकांनी केसरीमधून या भूमिकेला उचलून धरले. "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" हा टिळकांनी अग्रलेख याच संदर्भातील आहे. टिळक लिहितात : रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात माजघरात पोहोचला आहे. रँडसाहेबांचे लाडके सोल्जर पायातल्या खेटरासगट फवारणीचे धोटे घेऊन आमच्या घरात घुसतात. घरातले सामान रस्त्यावर फेकून देतात, जाळून टाकतात, हे कमी म्हणून की काय आमच्या देवघरात घुसून उंदरांबरोबर आमच्या विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे.

टिळक-आगरकर मैत्री व वाद

डेक्कन कॉलेजमध्ये असतांना टिळकांची गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली. आगरकरांकडे केसरीच्या संपादकपदाची धुरा टिळकांनी दिली होती. पण नंतर दोघांत बिनसले. राजकीय स्वातंत्र्य आधी की, समाज सुधारणा आधी या मुद्यावर त्यांच्यात मतभेद झाले. त्यातून दोघांची मैत्री तुटली. आगरकरांना केसरी सोडावे लागले.

न्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्युकेशन सोसायटी

त्या काळात विष्णुशास्त्री चिपळूणकर हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते. त्यांचाही स्वतःची शाळा काढण्याचा मानस होता. कॉलेज संपल्यावर टिळक, आगरकर तसेच त्यांचे मित्र नामजोशी, करंदीकर यांनी चिपळूणकरांना मदत करण्याचे ठरवले व १ जानेवारी इ.स. १८८० रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. शालेय शिक्षण जितके स्वस्त करता येईल तितके स्वस्त करण्याचा संस्थापकांचा उद्देश होता. पण तसे करतांना शाळेचा दर्जा ढासळणार नाही याचीपण काळजी त्यांनी घेतली. न्यू इंग्लिश स्कूल तत्काळ प्रसिद्ध झाले. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून पालक आपल्या मुलांना त्या शाळेत पाठवू लागले. १८८०-१८८६ दरम्यानची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळाली.[]

त्यांच्या कामाला भक्कम पाया आणि सातत्य देण्यासाठी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नावाची सार्वजनिक संस्था उभारण्याचे ठरविले. इ.स. १८८३ च्या सुमारास त्यांनी या कामाला सु्रुवात केली. संस्थेच्या विश्वस्त समितीमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. यामध्ये सर विल्यम वेडरबर्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापकांपैकी एक असे महादेव गोविंद रानडे, इतिहासकार रामकृष्ण गोपाळ भांडारकर, शिक्षणतज्‍ज्ञ एम. एम. कुंटे तसेच प्रख्यात वकील के. पी. गाडगीळ यांचा समावेश होता. तेव्हाचे मुंबईचे गव्हर्नर सर जेम्स फर्गसन हे संस्थेचे पहिले देणगीदार होते. त्यांनी संस्थेसाठी १२५० रुपयांची देणगी दिली. सर जेम्स फर्ग्युसन यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी संस्थेच्या कॉलेजचे नाव फर्ग्युसन महाविद्यालय ठेवण्याचे एकमताने ठरवण्यात आले. यामागे एक व्यावहारिक उद्देशपण होता. गव्हर्नरचे नाव कॉलेजला दिल्यामुळे अनेक भारतीय संस्थानिक स्वतःहून देणगी देण्यासाठी पुढे आले आणि जानेवारी २ इ.स. १८८५ला फर्ग्युसन कॉलेज अस्तित्वात आले. फर्गसन कॉलेजच्या संस्थापकांचे स्पष्ट मत होते की पाश्विमात्य शिक्षणाचा भारतात प्रसार होणे अत्यंत निकडीचे आहे. चिपळूणकर आणि टिळक तर इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हणत. संस्थेच्या कामाने प्रभावित होऊन सरकारने डेक्कन कॉलेजचे व्यवस्थापन संस्थेला सुपूर्त करण्याचा प्रस्ताव मांडला. पण संस्थेच्या आजीवन सदस्यांनी याला नकार दिला. याला अनेक कारणे असली तरी मूळ कारण सरकारची दोन युरोपियन शिक्षक ठेवण्याची अट हे होते.

पण संस्थेच्या अन्य सभासदांसमवेत बाह्य-उत्पन्नाच्या विषयावरून झालेल्या वादामुळे डिसेंबर इ.स. १८९० मध्ये टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा दिला[] आणि स्वतः पूर्णवेळ केसरीमराठा या वृत्तपत्रांचे संपादन करू लागले.

दु्ष्काळ

अभ्यासिकेत टिळक

इ.स. १८९६ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतकर्‍यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार ’दुष्काळ विमा निधी’ अतंर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. तसेच सरकारच्या 'Famine Relief Code' नुसार दुष्काळ पडला असतांना शेतकर्‍यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती. तरी काही भागात सक्तीने करवसुली करण्यात येत असे. याविरुद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरीद्वारे केले. त्यांच्या स्वयंसेवकांनी महाराष्ट्रभर गावागावात फिरून लोकांना 'Famine Relief Code' बद्दल माहिती देणारी पत्रके वाटली. याबरोबरच धनिकांनी व दुकानदारांनी अन्न व पैसा दान करावे असे आवाहन केले व यातून अनेक ठिकाणी सार्वजनिक खानावळी चालवल्या गेल्या.

प्लेगची साथ, राजद्रोहाचा खटला व तुरुंगवास

इ.स. १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. ऑक्टोबरमध्ये मुंबईत गाठीच्या प्लेगची साथ पसरली व १८९७ येईपर्यंत ही साथ पुण्यापर्यंत पोहोचली. रँडच्या प्रशासनाने या बाबतीत अक्षम्य अतिरेक केला. रोगग्रस्त लोकांसोबतच अनेक निरोगी लोकांनापण केवळ संशयावरून रोग्यांच्या छावणीत हलविण्यात आले. टिळक निर्जंतुकीकरण व सार्वजनिक स्वच्छतेच्या विरोधात नव्हते, पण रँडने वापरलेल्या कार्यपद्धतीला त्यांचा विरोध होता, असे डी.व्ही. ताम्हणकरांसारख्या काही लेखकांचे मत आहे.[१०] २३ जून १८९७ ला दामोदर चाफेकरांनी रँड व त्याचा सहकारी आयरेस्ट याची गोळ्या घालून हत्या केली.[११][१२] सरकारने पुण्यात कर्फ्यू लावला व संशयितांची धरपकड चालू केली. चाफेकरांना अटक करून फासावर चढवण्यात आले. टिळकांवरपण रँडच्या हत्येच्या कटात सामील असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण त्यासंदर्भात काहीच पुरावा सरकारला मिळाला नाही. यादरम्यान टिळकांनी केसरीमध्ये "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" व "`राज्य करणे' म्हणजे `सूड उगवणे नव्हे'" हे दोन अग्रलेख लिहिले. रँडच्या खुनानंतर अनेक अँग्लो-इंडियन वृत्तपत्रांनी टिळकांवर टीकेची झोड उठविली. याचाच परिणाम म्हणजे, ब्रिटिश सरकारने टिळकांवर दोन राजद्रोहात्मक लेख केसरीमधून लिहिल्याच्या आरोपाखाली खटला भरला. .[१३] या खटल्याची सुरुवात सप्टेंबर ८ , इ.स. १८९७ रोजी मुंबईच्या उच्च न्यायालयात झाली. एकूण नऊ पंचांमध्ये सहा युरोपीय पंच व तीन भारतीय पंच होते. टिळकांच्या बचावासाठी पूर्ण देशभरातून जवळपास ४०,००० रूपये इतका निधी गोळा करण्यात आला. यामध्ये डब्ल्यू.सी. बॅनर्जी, मोतीलाल घोष (अमर बाझार पत्रिकाचे संपादक) व रविंद्रनाथ टागोर या बंगालच्या नेत्यांचा तसेच जनतेचा वाटा उल्लेखनीय होता.[१४] यासोबतच बंगालमधून टिळकांची बाजू मांडण्यासाठी वकीलसुद्धा पाठविण्यात आले.[१५] हा खटला सहा दिवस चालला व खटल्याच्या शेवटी तीन भारतीय पंचांनी टिळकांकडून निकाल दिला तर सहा युरोपीय पंचांनी टिळकांविरुद्ध. न्यायाधीश जस्टिस स्ट्रॅची यांनी बहुमतानुसार टिळकांना दोषी घोषित केले व १८ महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. निकालादरम्यान "Disaffection" (सरकारबद्द्ल अप्रीती) म्हणजे "want of affection" (प्रीतीचा अभाव) या न्यायाधीशांनी केलेल्या व्याख्येवर भारतात तसेच इंग्लंडमध्ये अनेक कायदा-अभ्यासकांनी प्रखर टीका केली.[१४][१६] टि़ळकांना तीन महिन्यासाठी डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले व नंतर भायखळ्याच्या तुरुंगात हलविण्यात आले. तुरुंगवासादरम्यान टिळकांना राजकीय कैद्याप्रमाणे न वागवता सामान्य कैद्याची वागणूक दिली जात असे. याचा संस्कृत विद्वान व टिळकांचे परिचित मॅक्स म्यूलर यांनी तसेच इंग्लंडमधील काही नेत्यांनी विरोध केला. याचा परिणाम म्हणजे सरकारने टिळकांना पुण्याच्या येरवडा तुरुंगात हलविले तसेच त्यांना तुरुंगात काही काळ वाचनाची व लिखाणाची मुभा दिली. तुरुंगवासादरम्यान टिळकांनी आर्क्टिक होम ऑफ वेदाज या त्यांच्या पुस्तकासाठी टिपणे बनविली.[१७] जेव्हा बारा महिन्याच्या तुरुंगवासानंतर सप्टेंबर ७, इ.स. १८९८ रोजी टिळकांची सुटका करण्यात आली तेव्हा त्यांचे शारीरिक स्वास्थ्य खूप ढासळले होते. मुक्ततेनंतर काही दिवसांतच त्यांची प्रकृती थोडी सुधारली. याच वेळी गोखले, रानडे यांनी स्वदेशीचे आंदोलन छेडले होते. टिळकांनी आपल्या साप्ताहिकाद्वारे, लेखांच्या आधारे हा विचार घरांघरांत पोहोचवला.

जहालवाद विरुद्ध मवाळवाद

तत्कालीन भारतीय नेतृत्त्वात भारतास स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा असावा याबद्दल दोन स्पष्ट मतप्रवाह होते. इंग्रजांशी जुळवून घेउन भारतास स्वातंत्र्य देण्यास त्यांची मनधरणी करणे हा मतप्रवाह मवाळवाद समजला जातो तर इंग्रजांनी भारतास स्वातंत्र्य दिलेच पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करुन वेळ आल्यास कारवाया, आंदोलने करणे हा मतप्रवाह जहालवाद समजला जातो. टिळक जहालवादी होते.

लाल-बाल-पाल

लाल बाल पाल

लाला लजपतराय, बाल आणि पाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती. यामुळे या त्रिपुटीला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले. नंदानंतर ह्या भूमीवर क्षत्रिय नाहीत, म्हणून शाहू महाराजसुध्दा शूद्र आहेत ही भूमिका टिळकांनी घेतली. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. टिळकांनी आपल्या हयातीमध्ये आपल्या जातभाईंचा रोष पत्करून अशी कोणती सुधारणा घडवून आणली हे त्यांनी दाखवून द्यावे, उलट समाज सुधारणेला विरोध करण्याची संधी मात्र त्यांनी गमावली नाही. 'नदांत क्षत्रिय कुलम ' असे म्हणून वेदोक्त प्रकरणात यांनी पुरोहितांचीच बाजू घेतली. 1917 मध्ये ज्या काळात टिळक पक्ष विरोध करत होता, त्या काळात शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. टिळकांनी शिवाजी उत्सव सुरू करून शिवाजी हा राष्ट्रीय विभूती आहे, अशी महाराजांची त्यांनी स्तुती केली खरी, परंतु दुसऱ्या बाजूला शंकराचार्य ब्रह्मणाळकर यांनी शिवाजी महाराजांची निर्भत्सना केलेली असतानासुध्दा त्यांच्या पालखीला खांदा देण्याचे काम टिळकांनी केले. यावरून त्यांची शिवभक्ती आणि शिवाजीवरील प्रेम बेगडी होते हे स्पष्ट आहे. त्याकाळी एका जात समूहाला गुन्हेगार ठरवून चावडीवरील त्यांची हजेरी सक्तीची करण्यात आली होती. ही हजेरीची प्रथा एवढी पाशवी होती की, रात्रीच्या वेळी आपल्या तापाने फणफणत असणाऱ्या मुलांच्या अंगावर पांघरून टाकून आई-वडील हजेरी देण्यासाठी चावडीवर जातात. परत येऊन पाहतात तर त्यांची मुले मेलेली ! यापेक्षा अधिक पाशवी अन्याय कोणता ? ती हजेरी पध्दत शाहू महाराजांनी कायद्याने बंद केली, तर महार जात ही गुन्हेगार जात आहे हे टिळकांनी जाहीर केले. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी भरविलेल्या परिषदेत टिळकांचे भाषण खूपच गाजले ते म्हणाले.. ' अस्पृश्यता देवास मान्य असेल तर मी त्या देवास देव म्हणणार नाही.' परंतु आपल्या वैयक्तिक जीवनात अस्पृश्यतेचे पालन करायचे नाही असा ' जाहीरनामा ' तयार करण्यात आला. त्या जाहीरनाम्यावर टिळकांनी सही करण्यास नकार दिला. एकंदरीत टिळकांची भूमिकाच प्रतिगामी होती. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात की, सामाजिक बाबतीत टिळक समतेच्या तत्त्वास विघातक असल्याकारणाने त्यांना पुण्याच्या सर्व नागरिकांतर्फे मानपत्र देणे योग्य नाही. ते राष्ट्रीय पुढारी नहीत.5 कर्मवीर शिंदेनी टिळकांचे अचून निदान केले होते. या सर्व बाबींचा आणि टिळकांच्या भूमिकेचा विचार करता त्यांनंा स्वराज्य पाहिजे होते, ते नेमके कोणासाठी ? हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. ह्यावरून हेच सिध्द होते की, टिळकांची भूमिका एकांगी होती, पक्षपाती होती. भारतामध्ये जी भूमिका टिळकांनी घेतलेली होती, तीच भूमिका अमेरिकेमध्ये तेथील राजनीतितज्ञ जेफरसन याने घेतली होती. जेफरसन म्हणतो की, ' आम्हाला लोकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करावयाचे असल्यामुळे आधी आम्हाला राजकीय शासनसत्ता हस्तगत केली पाहिजे.' असा त्याने संक्षिप्त सिध्दांत मांडला. या सिध्दांतानुसार राष्ट्राचे रक्षण करून जनतेच्या हक्कांचे संरक्षण शांततापूर्वक करणे एवढाच शासनाचा मूलभूत हेतू आहे. परंतु लोकांना काही हक्कच नसतील तर शासनाने संरक्षण करावे तरी कशाचे? त्यासाठी आधी मूलभूत हक्क असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत समाजसुधारणेच्या आधी राजकीय प्रगती झाली पाहिजे. हा सिध्दांत म्हणजे केवळ एक मूर्खपणाची कल्पना ठरते.6 मूलभूत हक्क असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला आणि समाजाला प्रगती करता येणे शक्य नाही. व्यक्तीचे आणि जाती समूहाचे मूलभूत हक्क कोणीतरी हिरावून घेतलेले असतात, आणि ते हक्क परत करण्याची त्यांची इच्छा नसते.कारण त्या हक्कांवर पोसलेली ही बांडगुळे असतात. त्यामुळे ते हक्क पुन्हा मिळवावयाचे असतील तर हा संघर्ष लो. टिळक आपल्या जातभाई विरोधी करणार होते काय ? मुळीच नाही आणि समजा स्वराज्यामध्ये मूलभूत हक्कांचे संरक्षण करणारा कायदा केला म्हणजे काम झाले काय ? कायद्याचे यशापयश शेवटी जनमतावरच अवलंबून असते. भारतात 1829 मध्ये सतिबंदीचा कायदा पास झाला. परंतु तो कायदा यशस्वी होण्यासाठी कायद्याच्या बाजूने लोकजागृती करावी लागली. थोडक्यात निव्वळ कायदा करून प्रश्न सुटतात असे जर कोणाचे मत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे. कोलरिजच्या भाषेत सांगायचे म्हणजे, सामाजिक सामाजिक सुधारणांचे महत्त्व व आवश्यकता स्पष्ट करताना प्रबोधनकार म्हणतात की,........ राजकीय सुधारणा झाली म्हणजे इतर सर्व सुधारणा आपोआप होतील, या गोंडस तत्त्वावर प्रबोधनाचा मुळीच विश्वास नाही. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रे गुलामगिरीच्या आचार विचारांनी चिडचिडलेली, बौध्दिक क्षेत्रात जाणतेपणाचा मक्ता मूठभर सुशिक्षितांच्या हाती, बाकी सर्वत्र अज्ञानाची, अमावस्येची काळीकुट्ट रात्र, औद्योगिक चतुराई ठार मेल्यामुळे आर्थिक बाबतीत सर्वत्र पसरलेले दैन्य आणि दास्य अशा विचित्र परिस्थितीत राजकीय स्वातंत्र्याची अपेक्षा म्हणजे राजकारणाची जुगार खेळणाऱ्या जुगारूंची सट्टेबाजी होय. अर्थात या जुगारात येनकेन प्रकारे हिंदुस्थानच्या स्वराज्याचे तट्टू यदाकदाचित जिंकलेच, तर ती स्वराज्याची लॉटरी म्हणजे मूठभर मोठया माशांना बाकीच्या अनंत धाकटया मासोळयांना बिगर परवाना गिळण्याचा सनदपट्टाच होय, यात आम्हाला मुळीच संशय वाटत नाही. सामाजिक उच्चनीच भेदभाव, आपण व आपला समाज इतर सर्व समाजांपेक्षा उच्च दर्जाचा मानण्याची नाना फडणिशी आणि धार्मिक क्षेत्रात भिक्षुकशाहीची दिवसा ढवळया चालविलेली भांगरेगिरी, या सर्व राष्ट्र विनाशक, समाज विध्वंसक व दास्यप्रवर्तक दोषांचा आमूलाग्र नायनाट झाल्याशिवाय स्वराज्याचे अमृत प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने जरी हिंदुस्थानच्या घशात कोंबले, तरी त्यापासून त्याचा लवमात्र उध्दार होणार नाही. पुढे ते म्हणतात... सामाजिक व धार्मिक गुलामगिरी कडक सीलबंद ठेवून राजकीय स्वातंत्र्य मिळविण्याची शेरवी मारणारे लोक एकतर मूर्ख असले पाहिजेत अथवा अट्टल लुच्चे असले पाहिजेत; यापेक्षा तिसरी भावनाच संभवत नाही.8 असे स्पष्ट करून राजकीय सुधारणेची खिल्ली उडविली, आणि सामाजिक सुधारणेचा प्रबोधनकारांनी मनोभावे स्वीकार केला. ज्या लोकमान्य टिळकांनी राजकीय स्वातंत्र्याचा हिरिरीने पुरस्कार केला, त्या लोकमान्यांची खिल्ली उडवितांना प्रबोधनकार म्हणतात, मुलाचे नाव जगदीश ठेवले म्हणून तो जगाचा ईश थोडाच होतो ? टिळकांना लोकमान्य उपाधी लोकांनी चिकटवली नसून ती त्यांच्या कोब्रा बडव्यांनी विशेष धोरणाने त्यांच्या माथी बळेच लादली आहे, पण तेवढयाने ते थोडेच लोकमान्य होतात.9 त्या कालखंडात टिळकांवर एवढा प्रहार करणे ही काही साधीसोपी गोष्ट नव्हती, परंतु खरा सत्यशोधक एकवेळ मृत्यूला कवटाळेल पण सत्य प्रतिपादन केल्याशिवाय राहणार नाही हे प्रबोधनकारांनी दाखवून दिले. लोककल्याणासाठी लोकांच्या विरोधी जाण्याची लोकमान्यांची हिम्मत नसते. टिळक त्यांच्या जातभाईंच्या विरोधी गेलेच नाहीत. उलट त्यांच्याच हितसंबंधाची काळजी त्यांनी घेतली म्हणून तर ते लोकमान्य बनले. उलट ज्ञानेश्वरांनी आपल्या जातभाईंचे दुर्गुण चव्हाटयावर आणले. ज्ञानगंगा मायबोलीमध्ये आणली. ज्ञानेश्वर लोकमान्य झाले नाहीत. उलट त्यांच्याच जातभाईंनी त्यांना यमयातना भोगावयास भाग पाडले. थोडक्यात ज्याला लोकमान्यता मिळवावयाची असते आणि टिकवावयाची असते, तो लोकांच्याच पावलांनी आणि लोकांच्या कलेनेच चालत असतो. टिळक या कोटीतले होते. अर्थातच ही कोटी उच्च नव्हे.खरा समाजसुधारक लोकमान्यतेची पर्वाच करत नाही. त्याचे भांडण समाजाविरोधी, रूढींच्या विरोधी असते. त्यामुळे त्याला लोकांचा रोष पत्करावा लागतो. सत्यावर त्याचा प्रचंड विश्वास असल्यामुळे लोकांच्या स्तुती निंदेची तो पर्वाच करत नाही. कारण समाजाविषयी त्यांच्या अंत:करणात कमालीची तळमळ आणि कळकळ असते. ज्या समाजाविषयी तो तळमळीने कार्य करत असतो, त्या समाजाला त्याच्या कार्याचे महत्त्व अज्ञानापोटी कळत नसते. म्हणून त्याच्या रक्तामासाचे लोकही त्याला विरोध करत असतात आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या प्रतिसर््पध्यांच्या हितसंबंधावर गदा येत असल्यामुळे ते प्रतिस्पर्धी त्याचे कार्य हाणून पाडण्यासाठी अक्षरश: जिवाचे रान करत असतात. महात्मा जोतीराव फुले या उच्च कोटीतले समाजसुधारक होते. थोडक्यात, जोतीराव तोडू पहात असलेले गुलामगिरीचे पाश टिळकांनी मुद्दाम घट्ट आवळले एवढाच काय तो दोघांत फरक ! एरवी दोघेही मोठेच. prabodhankar.org/node/294/page/0/161

बंगालच्या फाळणीविरुद्धचा लढा

[८ जून]] १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्‍न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते.मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.

[८ जून]] १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्‍न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते.

पत्रकारिता

केसरीतील अग्रलेख
मराठातील अग्रलेख

टिळकांनी आगरकर, चिपळूणकर आणि इतर सहकार्‍यांच्या मदतीने इ.स. १८८१ साली केसरीमराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून प्रसिद्ध होत होते तर मराठा हे इंग्रजीमधून. अलिप्त भारतीय समाजाला भोवताली घडणार्‍या घटनांचा निरपेक्ष अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यांवरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली. इ.स. १८८२च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.

सुरुवातीला आगरकरांकडे ' केसरी ' चे संपादकपद तर टिळकांकडे ' मराठा ' या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. तरीही टिळकांचे अग्रलेख या काळातही 'केसरी' त प्रसिद्ध होत होतेच. पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह ' केसरी ' चे संपादकपद स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच ' केसरी ' चा आत्मा होता. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. ' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ', ' उजाडले पण सूर्य कुठे आहे ,' ' टिळक सुटले पुढे काय ', ' प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ', ' टोणग्याचे आचळ ', 'हे आमचे गुरूच नव्हेत ’, ' बादशहा ब्राह्मण झाले ' हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.[१८]

साहित्य आणि संशोधन

टिळक फक्त चांगले संपादकच नव्हते तर संस्कृत, गणित, खगोलशास्त्र यांच्यामधील मान्यताप्राप्त अभ्यासकपण होते. त्यांची दोन पुस्तके ’ओरायन’(Orion) आणि ’आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas)[१९] त्यांच्या अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. आर्क्टिक हे आर्यांचे मूळ वसतीस्थान आहे असा निष्कर्ष यामध्ये त्यांनी मांडला आहे. त्यांचे तिसरे पुस्तक ’गीतारहस्य’ यात त्यांनी भगवद्‌गीतेतील कर्मयोगाची समीक्षा मांडली आहे. त्यांच्या लिखाणाचे इतर संग्रह खालीलप्रमाणे आहेत, टिळकांच्या बाबतीमध्ये राम गणेश गडकरी असे म्हणाले होते की, बाळ गंगाधर टिळक हे मंडालेला गेल्यापासून या पुणे शहरात दुरून येणारा माणूस पाहून चटकन हातातली विडी विझवावी, या लायकीचे कोणी राहिलेले नाहीत.[२०]

कौटुंबिक जीवन

कौटुंबिक स्तरावर १९०२-०३ साली पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. एकाच आठवड्यात टिळकांचा चुलतभाऊ आणि भाचा प्लेगला बळी पडला. त्याच आठवड्यात लोकमान्यांचा महाविद्यालयात शिकणारा ज्येष्ठ पुत्र विश्वनाथही प्लेगला बळी पडला. पत्‍नीचा देहान्त ...साली झाला. त्यांच्या राजकीय धकाधकीच्या जीवनात पत्‍नीच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांची जबाबदारी ...नी सांभाळली. पण त्यांची दोन्ही धाकटी मुले टिळकबंधू म्हणून ओळखली जात, आणि ती आगरकरांच्या विचारांशी जवळीक ठेवणारी होती.[२१]

प्रसिद्ध घोषणा/वचने

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.

लोकमान्य टिळकांवर लिहिलेली काही पुस्तके

  • टिळक आणि आगरकर - तीन अंकी नाटक, लेखक विश्राम बेडेकर
  • टिळक भारत, लेखक शि.ल. करंदीकर
  • टिळकांची पत्रे, संपादक : एम. धोंडोपंत विद्वांस
  • मंडालेचा राजबंदी, लेखक अरविंद व्यं. गोखले
  • लोकमान्य टिळक चरित्र व आठवणी (भाग १ ते ६), लेखक प्रा.वामन शिवराम आपटे
  • लोकमान्य टिळक दर्शन, लेखक : भालचंद्र दत्तात्रेय खेर
  • लोकमान्य टिळक, लेखक : पु.ग. सहस्रबुद्धे
  • लोकमान्य टिळक यांचे चरित्र (३ खंड), लेखक न.चिं. केळकर
  • लोकमान्यांची सिंहगर्जना, लेखक गिरीश दाबके

टिळकांवर न निघालेला चित्रपट

चित्रपट निर्माते विनय धुमाळे यांनी लोकमान्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी १९९८मध्ये केंद्र सरकारकडून अडीच कोटी रुपयांचे, तर राज्य सरकारकडून पन्नास लाख रुपयांचे अनुदान घेतले होते. त्यानंतर सोळा वर्षे हा चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. त्याबद्दल पुण्यातील विष्णू रामचंद्र कमळापूरकर यांनी माहिती अधिकाराचा वापर करून पाठपुरावा केला होता. अनुदान घेतल्यानंतर तब्बल सोळा वर्षे हा चित्रपट अपेक्षेनुसार बनविण्यात धुमाळे यांना अपयश आल्याचा निष्कर्ष राज्याच्या सांस्कृतिक विभागाने काढला असून, या अनुदानाची व्याजासकट वसुली करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

विनय धुमाळे यांनी शासकीय अर्थसाहाय्यातून निर्माण केलेला 'लोकमान्य' चित्रपट (डीव्हीडी स्वरूपातील) हा अतिशय सुमार दर्जाचा असून राष्ट्रपुरुषांवर चित्रपट बनविण्याचा उद्देश या चित्रपटातून सफल झालेला नाही, असे स्पष्ट मत राज्य सरकारच्या चित्रपट परीक्षण समितीने नोंदविले आहे. या समितीमध्ये संजीव कोलते, भक्ती मायाळू, प्रकाश जाधव, बाळासाहेब गोरे, विजय कोंडके, मधु कांबीकर, ललिता ताम्हाणे, महेश लिमये व सदस्य सचिव म्हणून मंगेश मोहिते यांचा समावेश होता. या चित्रपटाच्या सर्वच अंगांची समितीने चिरफाड केली आहे. हा चित्रपट नसून अडीच तासांचा माहितीपट असल्याचे समितीने नमूद केले असून सरकारचा या बाबतचा हेतू सफल झालेला नसल्याचेही त्यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

टिळकांवर निघालेला चित्रपट

  • लोकमान्य - एक युगपुरुष (दिग्दर्शक - ओम राऊत, टिळकांच्या भूमिकेत सुबोध भावे). - इ.स. २०१५.

लोकमान्यांचे पुतळे

महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांचे बरेच पुतळे आहेत, त्या पुतळ्यापैकी काहींना विशेष इतिहास आहे. टिळकांचे पुतळे असलेल्या काही शहरांची आणि तेथील ठिकांची काही पुतळ्यांची यादी पुढे दिली आहे :-

पुण्यातल्या भाजी मंडई समोरील पुतळ्याचा इतिहास

पुण्याच्या महात्मा फुले मंडईत पांढर्‍या शुभ्र मेघडंबरीत असणार्‍या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याचे २२ जुलै १९२४ रोजी अनावरण झाले. लोकमान्यांच्या निधनानंतर लगेचच म्हणजे १७ ऑगस्ट १९२० रोजीच्या पुणे नगरपालिकेच्या सभेत या पुतळ्याचा ठराव मांडण्यात आला व त्यासाठी पंधरा हजार रुपयांची तरतूदही करण्यात आली. त्यानंतर वर्षभराने झालेल्या सभेत शिल्पकार विनायक व्यंकट वाघ यांना आगाऊ सहा हजार रुपये देण्यात यावेत, असे ठरले. नगरपालिकेच्या अकाउंटंटने मात्र या खर्चासाठी प्रांतिक सरकारची म्हणजे मुंबई सरकारची परवानगी घ्यावी असे सुचविले. ९ जून १९२२ रोजी नगरपालिकेचेया लोकनियुक्त अध्यक्ष न.चिं. केळकर अध्यक्षस्थानी असलेल्या पालिकेच्या सभेत अकाउंटंटचा आक्षेप चर्चेला आला असता, ‘या खर्चासाठी अन्य कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही,’ असे मत व्यक्त करण्यात आले.

१९२२-२३ मध्ये सरकारी हिशेब तपासनिसाने पुतळा आणि शिल्पकाराचा खर्च करण्यास मनाई केली. जिल्हाधिकार्‍यांनीतर ६ हजार रुपये वसूल करण्यासाठी भारतमंत्री (Secretary of State for India) यांच्या वतीने जिल्हा कोर्टात दावा दाखल करण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व कालखंDaaत अशा प्रकारचा दावा झालेला हा पहिलाच पुतळा असावा. टिळक हयात असताना सरकार त्यांच्यावर खटले भरतच होते; आता पुतळ्यावर खटला सुरू झाला. सरकार आणि कोर्ट या दोघांचेही दडपण पुणे नगरपालिकेच्या अध्यक्षांवर आले. शिल्पकार वाघांना या कशाचीच गंधवार्ता नव्हती.

कोर्टाने पुतळा उभारण्याच्या खर्चाला बंदी घातली होती. अखेर केसरी मराठा ट्रस्टने खर्चाची बाजू उचलण्याची तयारी दाखवली. न्यायालयात विरुद्ध निकाल गेल्यास हे पैसे ट्रस्ट परत मागणार नाही, असे सांगितल्याने २२ जुलै १९२४ रोजी पंडित मोतीलाल नेहरू यांच्या हस्ते पुतळा बसविण्यात आला. मात्र न्यायालयाने सरकारविरुद्ध निर्णय दिला आणि पुणे नगरपालिकेची भूमिकाच योग्य ठरली.

संदर्भ

  1. ^ mr.wikipedia.org/wiki/श्रीधर_बळवंत_टिळक
  2. ^ लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अॅन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्ही. ताम्हणकर; पृष्ठ ७
  3. ^ लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अॅन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्ही. ताम्हणकर; पृष्ठे ७-९
  4. ^ बाळ गंगाधर टिळक - चरित्र
  5. ^ लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अॅन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्ही. ताम्हणकर; पृष्ठ ११
  6. ^ लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अॅन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्ही. ताम्हणकर; पृष्ठ १४
  7. ^ लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अॅन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: द.वि. ताम्हणकर; पृष्ठ ६०
  8. ^ लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अॅन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्ही. ताम्हणकर; पृष्ठ २४
  9. ^ लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अॅन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्ही. ताम्हणकर; पृष्ठ ३६
  10. ^ लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अॅन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्ही. ताम्हणकर; पृष्ठे ६८-७९
  11. ^ चाफेकर बंधूंबद्दल माहिती
  12. ^ Touching the Body, Perspectives on Indian Plague, 1896-1900, David Arnold, Subaltern Studies V
  13. ^ लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अॅन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्ही. ताम्हणकर; पृष्ठ ८६
  14. ^ a b Understanding Tilak[मृत दुवा]
  15. ^ लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अॅन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्ही. ताम्हणकर; पृष्ठ ८७
  16. ^ लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अॅन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: डी.व्ही. ताम्हणकर; पृष्ठे ८७-८८
  17. ^ लोकमान्य टिळक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट अॅन्ड मेकर ऑफ मॉडर्न इंडिया (इंग्लिश); ले.: द.वि. ताम्हणकर; पृष्ठ ९५
  18. ^ तिखट व धारदार शस्त्र! - महाराष्ट्र टाइम्स, भारतकुमार राऊत
  19. ^ आर्क्टिक होम ऑफ वेदाज ची पी.डी.फ. प्रत.
  20. ^ http://www.upasanhar.com/books/show_title/75/
  21. ^ अनुदिनी :"सहज माहित असाव म्हणून",http://mattrubhumi.blogspot.in/p/blog-page_3395.html, २० सप्टेंबर २०१५ रोजी पहिला.

बाह्य दुवे

विकिक्वोट
विकिक्वोट
लोकमान्य टिळक हा शब्द/शब्दसमूह
विकिक्वोट, या मुक्त मराठी अवतरणकोशात पाहा.
विकिस्रोत
विकिस्रोत
लोकमान्य टिळक हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.