बुलढाणा जिल्हा
बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्हा | |
---|---|
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा | |
![]()
| |
देश |
![]() |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | अमरावती विभाग |
मुख्यालय | बुलढाणा |
तालुके |
|
क्षेत्रफळ | ९,६४० चौरस किमी (३,७२० चौ. मैल) |
लोकसंख्या | २५,८८,०३९ (२०११) |
लोकसंख्या घनता | २६८ प्रति चौरस किमी (६९० /चौ. मैल) |
साक्षरता दर | ८५% |
लिंग गुणोत्तर | १.०१ ♂/♀ |
प्रमुख शहरे | बुलडाणा, खामगाव, चिखली |
जिल्हाधिकारी | डॉ. सुमन चंद्रा |
लोकसभा मतदारसंघ | बुलढाणा (लोकसभा मतदारसंघ) |
विधानसभा मतदारसंघ | मलकापूर, बुलडाणा, चिखली, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद, सिंदखेडराजा |
खासदार | प्रतापराव जाधव |
संकेतस्थळ |
भौगोलिक रचना[संपादन]
बुलढाणा जिल्हा (किंवा बुलडाणा जिल्हा) हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात आहे विदर्भातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला-वाशीम,अमरावती जिल्हा, जळगाव-जालना व परभणी हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस नेमाड जिल्हा(मध्य प्रदेश) आहे.[१]
जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय बुलढाणा शहरात असून ते १३ तालुक्यांशी राज्य महामार्गानी जोडले गेले आहे. मुंबई ते हावडा हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग तसेच पूर्व-पश्चिम भारतास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ या जिल्ह्यातून गेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या पश्चिम दिशेस वाहणार्या आहेत व त्या तापी नदीला जाऊन मिळतात तर दक्षिणेकडील नद्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. कापूस, ज्वारी, सोयाबीन, सूर्यफूल ही या जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आहेत. जिल्ह्यात खामगाव, मलकापूर ही औद्योगिक शहरे आहेत.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत हजरत सैलानीबाबा दर्गा संस्थान आणि बुलढाणा जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळे माहिती[संपादन]
- बुलढाणा जिल्हा संक्षिप्त माहिती सत्याप्रित ****** जनहितार्थ **********************************
- शेगाव येथे श्री संत गजानन महाराजाचे मंदिर आहे व आनंदसागर हा प्रसिद्ध बगीचा आहे.
- लोणार येथील उल्कापाताने निर्मिलेले खार्या पाण्याचे सरोवर प्रसिद्ध आहे.
- जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे गांव छत्रपती शिवाजी राजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे जन्मस्थान आहे.
- नांदुरा येथे जगातील सर्वात मोठी हनुमान मूर्ती आहे.
- देऊळगाव राजा हे गाव तेथील बालाजीच्या मंदिरासाठी लोकांना माहीत असते.
- लोणार पासून दक्षिणेला १५ किमी अंतरावर (लोणार-आघाव-वझर रोडवर) पार्डा दराडे नावाचे गाव आहे. तेथे पांडवकालीन महादेवाचे मंदिर आहे.
- लोणार पासून ७ किमी वर पांगरा (डोले) गाव आहे. तेथे भगवान बाबाचे मंदिर आहे.
- बुलडाणा जिल्ह्यातच पैनगंगा या नदीचा उगम झालेला आहे ते ठिकाण बुधनेश्वर हे असून बुलढाणा अजिंठा या रोडवर बुलडाण्यापासून २० किमी अंतरावर आहे.
- बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये चिखली पासून फक्त १२ किलोमीटर च्या अंतरावर साकेगाव या गावामध्ये जुने (हेमाडपंथी शिवमंदिर) आहे. निसर्गरम्य असे हे साकेगाव आहे.
- मोताळा तालुक्यातील तारापुर येथील जागृत देवस्थान अंबादेवीचे मंदिर आहे. राजा हरिश्चंद्र द्वारा स्थापित असुन नवरात्रोस्त्व काळात मोठी गर्दी असते.
- देऊळगाव राजा हे शैक्षणिक गुवत्तेच्या बाबतीत सुद्धा अग्रेसर आहे.
- सुलतानपुर येथील पुरातन वास्तू सिद्धेश्वर मंदिर शिल्पकलेचा उत्तम अविष्कार दर्शनीय आहे.
- उंद्री या गावापासुन 15 कि मी अंतरावर वडाळी नावाच्या गावामध्ये प्रसिद्ध शिवमंदिर आहे.
- अमडापुर येथे प्रसिद्ध बल्लाळ देवी मंदिर.
- बुलडाणा जिल्ह्यातील १८ किमी जवळच असलेल्या गिरडा या गावामध्ये प्रसिद्ध असलेल्या गजानन महाराज संस्थान द्वारा संचालित श्री स्वयंम प्रकाश महाराजांचे मंदिर आहे,तसेच गिरडा हे गाव निसर्ग पर्यटनाचे एक आकर्षण बिंदू आहे. येथील काळी भिंत ही पर्यटकांसाठी आकर्षक बाब आहे. निसर्ग रम्य असलेल हे पर्यटन तसेच धार्मिक स्थळ बुलडाणा अजिंठा रोडवर आहे..
आराध्यदैवत हजरत बादशहा अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबा दर्गा देवस्थान पिंपळगांव येथे हिंदू व मुस्लिम धार्मिक स्थळ ता.चिखली जिल्हा बुलढाणा आहे
- महाराष्ट्राचे आराध्यदैवत हजरत अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबांच्या माहे मार्च महिन्यातील ऐतिहासिक (ऊरुस) यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड,आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातुन तसेच दक्षिण मराठवाडा (लातूर ,उस्मानाबाद व नांदेड), विदर्भ (बुलढाणा ,अकोला ,वाशिम, यवतमाळ व चंद्रपूर) इत्यादी भागातील लाखोंच्या संख्येने हिंदू धर्मीय व मुस्लिम धर्मीय लोक भाविक उपस्थित राहतात.
- महाराष्ट्राचे बादशहा अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबा सर्वोच्च इस्लाम देवता अल्ला आहेत. त्यामुळे हिंदू धर्मीय व मुस्लिम धर्मीय लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे.
- महाराष्ट्रीयन ऐतिहासिक संस्कृतीचे व हिंदू व इस्लाम धर्म परंपरेचे , एकतेचे व एकात्मतेचे दर्शन घडवुन देणारा आमचा बुलढाणा जिल्हा आहे.
*********** धन्यवाद **********
जिल्ह्यातील तालुके[संपादन]
- खामगांव
- चिखली
- जळगाव जामोद
- देउळगांव राजा
- नांदुरा
- बुलढाणा तालुका
- मलकापूर
- मेहकर
- मोताळा
- लोणार
- शेगांव
- संग्रामपूर
- सिंदखेड राजा