रघुनाथ वामन दिघे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रघुनाथ वामन दिघे
जन्म नाव रघुनाथ वामन दिघे
जन्म २३ मार्च १८९६
कल्याण, महाराष्ट्र, भारत
मृत्यू ०४ जुलै १९८०
पुणे ,महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा, कादंबरी
प्रसिद्ध साहित्यकृती पाणकळा
वडील वामन गणेश दिघे
आई अन्नपूर्णाबाई वामन दिघे
पत्नी

प्रथम पत्नी - [रतन कामथे]

द्वितीय पत्नी - लक्ष्मीबाई [यमुना पाटणे]
अपत्ये दत्तात्रय,कृष्णा, उल्हास, शबरी, मुरार , वामन ,मालू ,कमल

रघुनाथ वामन दिघे (२४ एप्रिल[१] किंवा २५ मार्च [२], इ.स. १८९६; कल्याण - ४ जुलै, इ.स. १९८०) हे मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार होते. ग्रामीण जीवनाच्या पार्श्वभूमीवरील लिहिलेल्या कादंबऱ्यांसाठी ते परिचित आहेत.

जीवन[संपादन]

दिघे हे बी.ए., एल.एल.बी. होते. त्यांनी पुणेपनवेल येथे काही काळ वकिली केली[२]. पुढे विहारी, खोपोली (वर्तमान रायगड जिल्हा) येथे राहून ते शेती करू लागले.

प्रकाशित साहित्य[संपादन]

दिघे यांच्या पुष्कळशा कादंबऱ्या ग्रामीण पार्श्वभूमीचे चित्रण करणाऱ्या आहेत. त्यांच्या लिखाणातील नायक हा बहुधा वारकरी आणि शेतकरी असायचा. हा नायक शेतकरी वारकरी संप्रदायाची मूल्ये जपतो आणि निसर्गाच्या आपत्तीशी त्यानुसार झगडा देतो. संतांच्या शिकवणीतून हा मुकाबला तो कसा करतो, याची त्या कादंबऱ्यांमध्ये उत्तम वर्णने वाचायला मिळतात.

विशेषत: त्यांच्या पाणकळा आणि पड रे पाण्या या दोन कादंबऱ्यांतून भीमा नदीच्या खोऱ्यातल्या शेतकऱ्यांचे जीवन समर्थपणे उभे केलेले दिसते [३].

साहित्यकृतीचे नाव प्रकाशनवर्ष (इ.स.) साहित्यप्रकार प्रकाशक
कार्तिकी कादंबरी
गानलुब्धा मृगनयना कादंबरी
पड रे पाण्या कादंबरी
पाणकळा कादंबरी
पावसाचे पाखरू कादंबरी
पूर्तता कादंबरी
सराई कादंबरी
सोनकी कथासंग्रह

वारसा[संपादन]

दिघे यांच्या साहित्यिक कारकिर्दीचे विश्लेषण व मूल्यमापन करणारा कादंबरीकार र.वा.दिघे नावाचा समीक्षाग्रंथ रवींद्र ठाकूर ह्यांनी लिहिला आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; मराठीविश्वकोश नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; लोकसत्ता२००९०३२५ नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  3. ^ मोरे, सदानंद (१ जुलै, इ.स. २००८). "ग्यानबांची वारी" (मराठी मजकूर). महाराष्ट्र टाइम्स. ४ जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]

  • "दिघे,रघुनाथ वामन". मराठी विश्वकोश, खंड ७ (मराठी मजकूर) (महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई). 


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.