ना.धों. महानोर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नामदेव धोंडो महानोर या पानावरून पुनर्निर्देशित)
ना.धों. महानोर
जन्म १६ सप्टेंबर १९४२
पळसखेड (औरंगाबाद जिल्हा)

नामदेव धोंडो महानोर (जन्म : पळसखेड-कन्नड तालुका-औरंगाबाद जिल्हा, १६ सप्टेंबर १९४२) हे मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत.

महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला आहे.

ना. धों. महानोर यांच्या कवितांनी बालकवीबहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ना.धों. महानोरांचे ‘पानझड’, ‘तिची कहाणी' 'पळसखेडची गाणी म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिना. त्यांच्या ‘रानातल्या कवितां'ना खरा मातीचा गंध येतो.

  • झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरील नक्षत्रांचे देणे या प्रसिद्ध कार्यक्रमासाठी विंदा करंदीकर आणि ना.धों. महानोर यांच्या गीतरचना गायल्या गेल्या त्या शशांक पोवार याने संगीतबद्ध केल्या होत्या.
  • देवकी पंडित यांनी महानोरांनी लिहिलेली काही चित्रपट गीते गायली आहेत, ती अशी :-
  • जाळीमधी झोंबतोया गारवा (कवी -ना.धों. महानोर, संगीत - आनंद मोडक, चित्रपट - एक होता विदूषक, सहगायक - रवींद्र साठे)
  • तुम्ही जाऊ नका हो रामा (कवी - ना.धों. महानोर, संगीत - आनंद मोडक, चित्रपट - एक होता विदूषक, सहगायक - आशा भोसले)
  • सूर्यनारायणा नित्‌ नेमाने उगवा (कवी - ना.धों. महानोर, संगीत - आनंद मोडक, चित्रपट - एक होता विदूषक)
  • श्रावणातल्या उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारी कवी ना.धों. महानोर यांची लावणी 'श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना' ही आशा भोसले यांनी 'एक होता विदूषक' या चित्रपटासाठी गायली आहे.
  • डाॅ. शुभा साठे यांनी ना.धों. महानोरांच्या समग्र साहित्यावर व जीवनावर आधारित लेख अभिवाचनाचे अनेक कार्यक्रम सादर केले आहेत.
  • संगीत दिगदर्शक हर्षित अभिराज यांनी ना.धों. महानोर यांच्या 'दूरच्या रानात केळीच्या बनात' या चित्रपटातील गीतांना संगीतबद्ध करून आपल्या सांगीतिक कारकिर्दीची सुरुवात केली कोती..

जीवन[संपादन]

महानोरांचा जन्म महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. त्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले[ संदर्भ हवा ]. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले[ संदर्भ हवा ]. मराठी साहित्यविश्वात ते 'रानकवी' म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव जाणवतो.

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अजिंठा (कवितासंग्रह) दीर्घ कविता पॉप्युलर प्रकाशन १९८४
कापूस खोडवा) शेतीविषयक
गंगा वाहू दे निर्मळ कविता संग्रह पॉप्युलर प्रकाशन
गपसप कथासंग्रह समकालीन प्रकाशन
गावातल्या गोष्टी कथासंग्रह समकालीन प्रकाशन
जगाला प्रेम अर्पावे कविता संग्रह पॉप्युलर प्रकाशन
त्या आठवणींचा झोका साकेत प्रकाशन
दिवेलागणीची वेळ कविता संग्रह साकेत प्रकाशन
पळसखेडची गाणी लोकगीते पॉप्युलर प्रकाशन
पक्षांचे लक्ष थवे पॉप्युलर प्रकाशन
पानझड पॉप्युलर प्रकाशन
पावसाळी कविता कविता संग्रह पॉप्युलर प्रकाशन
पु. ल. देशपांडे आणि मी]] समकालीन प्रकाशन
यशवंतराव चव्हाण साकेत प्रकाशन
यशवंतराव चव्हाण आणि मी व्यक्तिचित्रणपर समकालीन प्रकाशन
या शेताने लळा लाविला समकालीन प्रकाशन
रानातल्या कविता कविता संग्रह पॉप्युलर प्रकाशन
शरद पवार आणि मी साकेत प्रकाशन
शेती, आत्मनाश व संजीवन शेतीविषयक साकेत प्रकाशन

नामदेव धोंडो महानोर हे गीतकार असलेले चित्रपट[संपादन]

चित्रपट वर्ष (इ.स.)
अबोली इ.स.१९९५
एक होता विदूषक इ.स.१९९२
जैत रे जैत इ.स.१९७७
दूरच्या रानात केळीच्या बनात (आल्बम) इ.स.२०१४?
दोघी इ.स.१९९५
मुक्ता इ.स.१९९४
सर्जा इ.स.१९८७
मालक इ.स. २०१५
ऊरुस इ.स. २००८
अजिंठा इ.स. २०११
यशवंतराव चव्हाण इ.स. २०१२

राजकीय कारकीर्द[संपादन]

महानोर हे १९७८ साली महाराष्ट्र विधान परिषदेचे नियुक्त सदस्य झाले.

  • ना. धो. महानोरांची काव्यसृष्टी (सोमनाथ दडस)
  • ना. धों. महानोरांची प्रतिमासृष्टी आणि संपादने (सोमनाथ दडस)

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार, इ.स.१९९१
  • जागतिक चित्रपट महोत्सव गीतकार जीवन गौरव पुरस्कार, पुणे २०१५
  • कृषीभूषण (महाराष्ट्र शासन) इ.स. १९८५
  • 'वनश्री' पाणलोट पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल. इ.स १९९१
  • 'कृषिरत्न' शेती क्षेत्रातील बहुमोल कामगिरीबद्द्ल सुवर्ण्पदक इ.स. २००४
  • डॉ. पंजाबराव देशमुख गौरव पुरस्कार इ.स. २००४
  • कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार, इ.स. २००९
  • साहित्य अकादमी पुरस्कार, इ.स. २००० - 'पानझड'
  • विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (महाराष्ट्र शासन) (२०१२)
  • 'मराठवाडा भूषण'
  • महानोर आणि त्यांच्या पत्नी सुलोचना यांना यशवंत-वेणू पुरस्कार (२०१७)
  • अनंत भालेराव स्मृतिपुरस्कार.
  • जळगाव येथील भॅंवरलाल ॲन्ड कांताबाई जैन फाऊंडेशन सर्वोत्कृष्ट गद्य लेखनासाठी ना.धों. महानोर पुरस्कार देते. २०१६-१७चा हा पुरस्कार किरण गुरव यांना मिळाला होता.
  • सदानंद देशमुख यांनाही निसर्गकवी ना.धों. महानोर सर्वोत्कृष्ट गद्य लेखन पुरस्कार (जळगाव) मिळाला होता.
  • इ.स. १९९३ सालापासून सेवा संघाच्या माध्यमातून सु.ल. गद्रे यांनी त्यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ साहित्य, कला आणि शिक्षण या तीन क्षेत्रांत पुरस्कार ठेवले आहेत. ना.धों. महानोर यांनाही हा पुरस्कार मिळाला होता.
  • अनुराधा पाटील यांना 'दिवसेंदिवस'ला बहिणाबाई प्रतिष्ठान, पुणे या संस्थेकडून १९९३ साली उत्कृष्ट काव्यलेखनासाठी कवी ना.धों. महानोर काव्य पुरस्कार मिळाला होता.
  • रणधीर शिंदे यांनाही २०१४ साली जालना येथे ना.धों. महानोर पुरस्कार मिळाला होता.
  • औदुंबर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.
  • प्रकाश होळकर यांनी 'रानगंधाचे गारूड' नावाचा ना.धों.महानोर यांच्या पत्रसंग्रहावर आधारित ग्रंथ लिहिला आहे.
  • यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील फलटण या गावी, २५ ते २७ नोव्हेंबर २०१२ या दिवशी यशवंतराव चव्हाण स्मृति साहित्य संमेलन झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे व फलटण शाखा आणि सातारा जिल्हा परिषद यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनाच्या अध्यक्षपदी ना.धों. महानोर होते.
  • भालचंद्र वनाजी नेमाडे यांना ’देखणी’साठी १९९२ साली ना.धों. महानोर पुरस्कार मिळाला होता.
  • मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात २२ फेब्रुवारी २०१२ रोजी झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. इतकेच नाही तर २४ मार्च २०१४ रोजी सुरू झालेल्या दशदिवसीय ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
  • १ले जलसाहित्य संमेलन नागपूरमध्ये २००३मध्ये झाले होते . संमेलनाध्यक्ष - श्री. ना.धों. महानोर होते. हे संमेलन नागपूरच्या महिला पाणी मंचाच्या सहकार्याने पार पडले होते.
  • नंदुरबारचे पहिले जिल्हा साहित्य संमेलन, १४ जानेवारी २००९ रोजी नंदुरबार येथे झाले होते. संमेलनाध्यक्ष रानकवी ना. धों. महानोर होते.
  • यशवंतराव चव्हाण स्मृती समिती, अंबाजोगाईचा ३ रा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार २०१५

बाह्य दुवे[संपादन]

  • "अधिकृत संकेतस्थळ".
  • "मराठी ई-साहित्य संमेलन". Archived from the original on 2014-03-19. 2014-03-15 रोजी पाहिले.