टाटा मोटर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टाटा मोटर्स ही भारतातील सर्वांत मोठी व्यावसायिक वाहने बनवणारी टाटा समूहाची कंपनी असून विविध प्रकारचे ट्रक हे या कंपनीचे वैशिष्ट्य आहे. मागील १५ ते २० वर्षात टाटा मोटर्सने लहान व मध्यम गाड्यांमध्ये लक्षणीय झेप घेतली आहे. या कंपनीने जगातील सर्वांत स्वस्त गाडी बनवण्याचा ध्यास घेतला असून. टाटा नॅनो १ लाख रुपयात सर्व सामान्यांसाठी चारचाकी गाडी असे सादरीकरण केले आहे. यामुळे प्रथमच भारतीय वाहननिर्मितीची आंतराष्ट्रीय स्तरावर कौतुकास्पद दखल घेतली गेली. तसेच प्रसिद्ध लॅंड रोव्हर व जॅग्वार ह्या ब्रिटीश वाहन कंपन्या या कंपनीने विकत घेतल्या. त्यामुळे टाटा मोटर्स या कंपनीचा व भारताचा आंतराष्ट्रीय वाहन निर्मितीत भारताचा दबदबा वाढला. या कंपनीचा पुणे येथे मोठा कारखाना आहे. किंबहुना पुणे शहराची औद्योगिक शहर म्हणून ओळख होण्यास या कंपनीचा मोठा वाटा आहे. तसेच जमशेदपूर येथेही कारखाना आहे. नॅनोसाठी पश्चिम बंगालमध्ये सिंगूर येथे टाटा मोटर्स या कंपनीने घेतलेल्या जागेवर २००७-०८ मध्ये बरेच आंदोलन झाले व टाटा मोटर्स कंपनी यामुळे माध्यमांमध्ये चर्चेत होती.

टाटा इंडिका
टाटा नॅनो

उत्पादने[संपादन]

कनसेप्ट वाहने[संपादन]

व्यावसायिक[संपादन]

टाटा ९०९ ट्रक
टाटा ११०९ ट्रक
टाटा १६१३ ट्रक

सैनिकी वाहने[संपादन]

  • टाटा ४०७ ट्रूप कॅरियर,
  • टाटा एलपीटीए ७१३ टीसी (४x४)
  • टाटा एलपीटी ७०९ ई
  • टाटा एसडी १०१५ टीसी (४x४)
  • टाटा एलपीटीए १६१५ टीसी (४x४)
  • टाटा एलपीटीए १६२१ टीसी (६x६)
  • टाटा एलपीटीए १६१५ टीसी (४x२)[१]

इतर प्रसिद्ध ब्रँड[संपादन]

संदर्भ[संपादन]