शिरीष कणेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिरीष कणेकर

शिरीष मधुकर कणेकर (६ जून, इ.स. १९४३; पुणे, महाराष्ट्र - २५ जुलै, २०२३ मुंबई) हे मराठी लेखक, पत्रकार व कथनकार होते. ते विनोदी लेखन व क्रीडा पत्रकारिता यांसाठी ख्यातनाम होते.

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पेण हे कणेकरांचे मूळ गाव होय. त्यांचे वडील रेल्वेमध्ये डॉक्टर होते. त्यामुळे कणेकरांचे लहानपण भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानामध्ये गेले. मुंबई विद्यापीठातून ते बी.ए.एल्‌एल्‌बी. झाले. त्यांचे कणेकरी, माझी फिल्लमबाजी हे विनोदी कथनाचे कार्यक्रम विशेष गाजले आहेत. क्रिकेटचित्रपटसृष्टीतल्या गमती-जमती हे त्यांच्या एकपात्री कथनाच्या कार्यक्रमातील व लिखाणातील आवडीचे विषय असतात. इ.स. २०११ पासुन ते मुक्त पत्रकारीता व वृत्तपत्रांतून स्तंभलेखनही करत.

वृत्तपत्रीय कारकीर्द[संपादन]

इंग्रजी पत्रकारिता[संपादन]

 • इंडियन एक्सप्रेस (इ.स. १९६८ - इ.स. १९८०)
 • डेली (इ.स. १९८० ते इ.स. १९८२)
 • फ़्री प्रेस जर्नल (इ.स. १९८२ ते इ.स. १९८५)
 • सिंडिकेटेड प्रेस न्यूझ एजन्सी (इ.स. १९८५ ते इ.स. १९८९)

स्तंभलेखन[संपादन]

मुख्यत:मराठी वृत्तपत्रांतून त्याची अनेक सदरे गाजत असत. आणि अजूनही गाजतात. त्यांतली काही सदरे अशी :

 • लोकसत्ता.................यादों की बारात, शिरीषासन, सिनेमाबाजी, मुद्दे आणि गुद्दे, चहाटळकी, सूरपारंब्या
 • महाराष्ट्र टाइम्स........सिनेमागिरी, लगाव बत्ती
 • लोकमत.................कणेकरी
 • सामना...................कणेकरी, चिमटे आणि गालगुच्चे
 • पुढारी.....................चिमटे आणि गालगुच्चे
 • साप्ताहिक मनोहर......आसपास
 • साप्ताहिक लोकप्रभा....कणेकरी, मेतकूट
 • साप्ताहिक प्रभंजन......चित्ररूप
 • पाक्षिक चंदेरी...........कणेकरी
 • साप्ताहिक चित्रानंद.....शिरीषासन
 • सिंडिकेटेड कॉलम.....फिल्लमबाजी
 • द डेली (इंग्लिश) ............. कल्चर व्हल्चर


पहिले लेखन[संपादन]

‘जॉर्ज गन : एक लहरी फलंदाज’ ही अमृत मासिकाच्या जानेवारी १९६४ च्या अंकात प्रसिद्ध झालेला लेख.

प्रकाशित साहित्य[संपादन]

 • क्रिकेट-वेध (इ.स. १९७७)..क्रिकेटवर +
 • गाये चला जा (इ.स. १९७८)..हिंदी चित्रपट-संगीतावर
 • यादोंकी बारात (इ.स. १९८५)..हिंदी चित्रपट व्यावसायिकांची व्यक्तिचित्रे
 • पुन्हा यादोंकी बारात (इ.स. १९९५)...हिंदी चित्रपट व्यावसायिकांची आणखी व्यक्तिचित्रे
 • ते साठ दिवस (इ.स. १९९७)..प्रवासवर्णन +
 • डॉलरच्या देशा (इ.स. २००२)..प्रवासवर्णन
 • रहस्यवल्ली (इ.स. १९८६)..रहस्यकथा +

हिंदी चित्रपटांविषयीची पुस्तके[संपादन]

 • कणेकरी (इ.स. १९९१) +
 • नट बोलट बोलपट (इ.स. १९९९) +
 • शिरीषासन (इ.स. १९८४) +
 • पुन्हा शिरीषासन (इ.स. १९८५) +
 • फिल्लमबाजी (इ.स. १९८०) +
 • शिणेमा डॉट कॉम (इ.स. २००१)

ललितलेखन[संपादन]

 • आंबटचिंबट (इ.स. २०१०)
 • इरसालकी (इ.स. १९९७) +
 • एकला बोलो रे (इ.स. १९९७)..एकपात्रीचे अनुभव-कथन
 • कट्टा (इ.स.२०१२)
 • खटलं आणि खटला (इ.स. २००५)
 • गोतावळा (इ.स. २०००)..व्यक्तिचित्रे
 • गोली मार भेजे में (इ.स. २००१)
 • चंची ( इ.स.२०११-मे)
 • चर्पटपंजरी (इ.स. २०१९)
 • चहाटळकी (इ.स. १९९५) +
 • चापटपोळी (इ.स. २००६)
 • चापलुसकी (इ.स. १९९८) +
 • डॉ. कणेकरांचा मुलगा (इ.स. २००३)
 • तिकडमबाजी (इ.स. २००९)
 • नानकटाई (इ.स. २००५)
 • फटकेबाजी (इ.स. २००६)
 • मखलाशी (इ.स. २००४)
 • माझी फिल्लमबाजी (इ.स. २००२)..एकपात्रीची संहिता
 • मेतकूट (इ.स. २००७)
 • मोतिया (इ.स. २०१०)
 • मनमुराद (इ.स. २०??)
 • लगाव बत्ती (इ.स. २००२)
 • वेचक शिरीष कणेकर (इ.स. २००१)..लेख-संकलन
 • साखरफुटाणे (इ.स. २००१)
 • सूरपारंब्या (इ.स. २००१)

भाषांतरे[संपादन]

 • ‘गाये चला जा’ व ‘यादों की बारात’ यांची गुजराथीत भाषांतरे झाली आहेत.
 • अनेक लेखांची गुजराठीत व हिंदीत भाषांतरे प्रकाशित
 • ‘यादों की बारात’चे इंग्रजीतून ‘वेब साइट’वर प्रसारण

सूचना[संपादन]

+ ही खूण असलेल्या पुस्तकांच्या बाजारातील प्रति आता(सन २०११) बहुधा संपल्या आहेत. त्यांच्या नवीन आवृत्त्या निघणार नाहीत.[ संदर्भ हवा ] या पुस्तकांतील कालबाह्य न झालेला मजकूर अन्य पुस्तकांत समाविष्ट झाला आहे.

रंगमंचीय कारकीर्द[संपादन]

 • रंगमचावर पदार्पण : ७ नोव्हेंबर, इ.स. १९८७, स्थळ दीनानाथ नाट्यगृह, मुंबई.
 • भारतीय रंगमंचावर ‘स्टॅन्ड अप कॉमेडी’ प्रथम आणली.
 • ‘माझी फिल्लमबाजी’, ‘फटकेबाजी’ व ‘कणेकरी’ या तीन एकपात्री कार्यक्रमांचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती व सादरीकरण केले.

कार्यक्रमाच्या ऑडियो कॅसेटी आणि सिड्या[संपादन]

 • हिज मास्टर्स व्हॉइस कंपनीने तिन्ही कार्यकमांच्या ध्वनिफितींचे दोन्ही प्रकारचे संच काढले आहेत.
 • फाउंटन म्युझिक कंपनीतर्फे ‘माझी फिल्लमबाजी’ व ‘कणेकरी’ यांच्या व्ही.सी.डी. प्रकाशित.

पुरस्कार[संपादन]

 • मुंबई पत्रकार संघातर्फे दिला जाणारा ‘कै. विद्याधर गोखले ललित साहित्य पुरस्कार’ इ.स. १९९९
 • नाशिक महापालिका वाचनालयातर्फे ‘सूरपारंब्या’ या लेखसंग्रहास सर्वोत्कृष्ट विनोदी वाङ्‌मयाचा पुरस्कार
 • ‘लगाव बत्ती’ या संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाङ्‌मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कार