नंदुरबार जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नंदुरबार जिल्हा
नंदुरबार जिल्हा
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा
MaharashtraNandurbar.png
महाराष्ट्रच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
मुख्यालय नंदुरबार
क्षेत्रफळ ५,०३५ चौरस किमी (१,९४४ चौ. मैल)
लोकसंख्या १३,०९,१३५ (२०११)
लोकसंख्या घनता २६० प्रति चौरस किमी (६७० /चौ. मैल)
साक्षरता दर ४६.६३%
लोकसभा मतदारसंघ नंदुरबार (लोकसभा मतदारसंघ)
विधानसभा मतदारसंघ अक्कलकुवानंदुरबारनवापूरशहादा
खासदार हिना गावित (भाजपा)
संकेतस्थळ


हा लेख नंदुरबार जिल्ह्याविषयी आहे. नंदुरबार शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

नंदुरबार जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती सन १९९८ मध्‍ये झाली. त्यापूर्वी हा जिल्हा धुळे जिल्ह्याचा एक भाग होता.

चतुःसीमा[संपादन]

नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्यांच्या सीमा लाभल्या आहेत. गुजरात राज्य वायव्य सीमेवर, तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या ईशान्य सीमेवर आहे. सीमा भागातील काही गावे (उदा. खेडदिगर व खेतिया) ही महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश ह्या दोन्ही राज्यांत विभागली गेली आहेत.

जिल्ह्यातील तालुके[संपादन]

पर्यटन[संपादन]

यशवंत तलाव
  • तोरणमाळ हे सातपुड्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. तेथे यशवंत तलाव व सिताखईची दरी आहे आणि एक धबधबाही आहे.
  • उनपदेव-सुनपदेव (शहादा तालुका) येथे गरम पाण्याचे झरे आहेत.
  • प्रकाशा हे शहादा मधील शंकराचे जागृत देवस्थान आहे, हे तापी नदीच्या काठावर वसलेले आहे.

इतर[संपादन]

नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथील लोकसभा व [विधानसभा]] मतदार संघ हे अनुसूचित जमाती साठी राखीव आदिवासी मतदार संघ आहेत.

जमाती :-

भिल्ल, पावरा, टोकरे कोळी ,कोकणा-कोकणी,गावित, पारधी,मावची, इत्यादी प्रमुख आदिवासी जमाती आहेत.EKLAYA SCHOOL IN NANDURBAR