पुण्यातील गणेशोत्सव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मुख्य पान: गणेशोत्सव
मुख्य लेख: पुणे
पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळाचा देखावा

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास[संपादन]

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात गणेशाचा उत्सव होत असल्याचे अभ्यासक नोंदवतात.[१]

गणेशोत्सव पूजा साहित्य विक्री

पेशव्यांच्या राजवटीत पुण्यात गणेशोत्सव हा त्यांचा वार्षिक समारंभ मानला जात असे. [२]पुण्यातील गणेशोत्सवाची सुरुवात शनिवारवाड्यात पेशव्यांनी केल्याचे संदर्भ सापडतात.[३] लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव सुरु केला आणि अनंत चतुर्दशीपर्यंत या उत्सवाचा काळ वाढविला. बिपीनचंद्र पाल यांनी या उत्सवाविषयी म्हटले आहे की " टिळकांचा हा उत्सव केवळ धार्मिक अनुष्ठान नसून स्वदेशसेवेचा हा सार्वजनिक महायज्ञ आहे."[४] प्रारंभीच्या वर्षी पुण्यात तीन ठिकाणी आणि मुंबईत दोन ठिकाणी असे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे झाले होते.[१] या उत्सवाच्या आयोजनासाठी लोकमान्य टिळक यांना विरोधाला आणि संघर्षालाही तोंड द्यावे लागले आहे. पण त्यांच्या प्रेरणेतून हा उत्सव नागपूर, वर्धा, अमरावती येथेही सुरु झाला.[५]

मेळे[संपादन]

पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रारंभी मंडळांच्या गणपतींच्या समोर दिवसाच्या वेळी भजनाचे कार्यक्रम आणि रात्री कीर्तने आयोजित होत असत. शाहिरांचे पोवाडे, समई नृत्य, जादूचे प्रयोग असे कार्यक्रम यात होत असत.जनमर्द मावळी मेळा, जना मावळी मेळा, सन्मित्र मेळा हे तत्कालीन प्रसिद्ध मेळे मानले जात.देशभक्तीपर गीते म्हणणारे मेळे पुण्यात संध्याकाळच्या वेळेत होत असत. या पदांची पुस्तकेही प्रकाशित करण्यात आलेली होती. [६][७]

पुण्यातील गणेश मूर्ती विक्री

वैशिष्ट्ये[संपादन]

१. पुण्यातील गणेशोत्सवात मानाच्या पाच गणपतींना अग्रमान आहे. दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळ, हुतात्मा बाबू गेनू मंडळ या मंडळांचे देखावे आणि आकर्षक सजावट हे पुण्याच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य सांगता येईल. २. मिरवणुकीतील ढोल ताशा पथकांचा सहभाग हे पुण्याच्या गणेशोत्सवाचे आगळे- वेगळे वैशिष्ट्य आहे. [८]पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी संस्थेने ढोल ताशा वादन आणि बरची नृत्य यांची परंपरा सुरु केली आहे. या संकल्पनेचा प्रचार आता महाराष्ट्रात सर्वदूर झाला आहे.

मानाचे गणपती[संपादन]

पुण्यातील मानाचे पहिले पाच गणपती असे आहेत:[९]<ref>

 1. कसबा गणपती (हे पुण्याचे ग्रामदैवत आहे)
 2. तांबडी जोगेश्वरी गणपती
 3. गुरुजी तालीम गणपती
 4. तुळशीबाग गणपती
 5. केसरीवाडा गणपती

पुण्यातील गणेशोत्सवातील इतर महत्त्वाचे गणपती[संपादन]

गणेशोत्सवाचे वर्तमान स्वरूप[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

सार्वजनिक गणेशोत्सव[संपादन]

चित्रदालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


संदर्भ[संपादन]

 1. ^ a b Mishra, Achyutanand (2009-01-01). Sarokaron Ke Dayre (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9788173155550.
 2. ^ Keer, Dhananjay (1971). Lokamānya Ṭiḷaka [āṇi] Rājarshī Śāhū Mahārāja. Śrīgajānana Buka Ḍepo Prakāśana.
 3. ^ Joshi, Prabhash (2008-09). Dhann Narbada Maiya Ho (हिंदी भाषेत). Rajkamal Prakashan Pvt Ltd. ISBN 9788126716074. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 4. ^ Mishra, Achyutanand (2009-01-01). Sarokaron Ke Dayre (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 9788173155550.
 5. ^ sharma, vimlesh (2018-07-02). SARV VIPRA MARTAND: sarvvipramartand (हिंदी भाषेत). VIMLESH SHARMA.
 6. ^ सबनीस, विवेक (२ सप्टेंबर). "पुण्यातील गणपती उत्सवाची रोमहर्षक सव्वाशे वर्षे!". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 7. ^ करंबेळकर ओंकार. "मेळ्याची पदे आणि शंभर वर्षापुर्वीचा मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव (४. ९. २०१८)". line feed character in |title= at position 65 (सहाय्य)
 8. ^ "पुण्याचा गणेशोत्सव (२४.८. २०१७)".
 9. ^ "पुण्यातील पाच मानाचे गणपती आणि त्यांचं महत्त्व (२५. ८. २०१७)".