वामन शिवराम आपटे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वामन शिवराम आपटे

वामन शिवराम आपटे (इ.स. १८५८; असोलोपोल, सावंतवाडी संस्थान - ऑगस्ट ९, इ.स. १८९२; पुणे, महाराष्ट्र) हे संस्कृत भाषेचे अभ्यासक, शब्दकोशकारमराठी लेखक होते. त्यांनी संपादलेला इंग्लिश-संस्कृत शब्दकोश इ.स. १८८४ साली प्रकाशित झाला, तर संस्कृत-इंग्लिश शब्दकोश इ.स. १८९० साली प्रकाशित झाला.

जीवन[संपादन]

आपट्यांचा जन्म इ.स. १८५८ साली महाराष्ट्रातील सावंतवाडी संस्थानात झाला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घरची आर्थिक स्थिती बेताची असूनही त्यांच्या आईने मुलांना घेऊन कोल्हापूर गाठले व तेथे मुलांना शाळेत घातले. परंतु लवकरच (अंदाजे इ.स. १८६९ साली) आपट्यांच्या आईचे व थोरल्या भावाचेदेखील निधन झाले. राजाराम हायस्कुलाचे मुख्याध्यापक एम.एम. कुंटे यांनी देऊ केलेल्या मदतीच्या आधारावर आपटे इ.स. १८७३ साली मॅट्रिक्युलेशन परीक्षा उत्तीर्ण झाले व पुढील शिक्षणासाठी ते पुण्यास आले. पुण्यातील डेक्कन कॉलेजातून त्यांनी बी.ए. (इ.स. १८७७) व एम.ए. (इ.स. १८७९) पदव्या मिळवल्या.

शिक्षणानंतर इ.स. १८८० साली सहाध्यायी असलेल्या बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी काढलेल्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या पर्यवेक्षकपदावर ते रुजू झाले. पुढे ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय व डेक्कन कॉलेज या महाविद्यालयांमध्येही शिकवत होते.

शेक्सपिअरच्या ३७ पैकी ३४ नाटकांची भाषांतरे त्यांनी केली.

ऑगस्ट ९, इ.स. १८९२ रोजी टायफॉइडामुळे आपट्यांचा पुण्यात मृत्यू झाला.

बाह्य दुवे[संपादन]