रंगनाथ पठारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रंगनाथ पठारे

रंगनाथ गबाजी पठारे (जन्म : जवळे-संगमनेर तालुका, जुलै २०, १९५० - हयात) हे मराठी कथालेखक, कादंबरीकार आणि समीक्षक आहेत.

कथारचनेच्या विविध शक्यतांशी खेळणे हा रंगनाथ पठारे यांचा स्वभाव आहे. मराठीत खूप कमी लेखकांनी कथेच्या रचनेच्या अंगाने तिच्याशी संवाद साधल्याचे दिसते. कथा म्हणजे एक सत्त्वशोध आणि समकालीन वास्तवाला दिलेली तीव्र प्रतिक्रिया, किंवा स्वतःत चाललेली जीवघेणी घालमेल असते. रंगनाथ पठारे यांच्या प्रत्येक कथेत ही घालमेल प्रत्ययाला येते. ही घालमेल वाचकाला खूप आत आत आवर्तात घेऊन जाते. ते मराठी लघुकथेला कथेच्या मूळ स्वरूपाकडे घेऊन जातात.. रूढ पारंपरिक कथासमीक्षादृष्टीस हा प्रकार आकळणे थोडे कठीणच. पण पन्नास वर्षांनंतर जो वाचक ’शंखातील माणूस’ या संग्रहातील `गांधीजी अकरा सप्टेंबर २००१’ ही गोष्ट वाचेल तेव्हा या लेखकाच्या असाधारण प्रतिभाशक्तीची प्रगल्भता जाणवू शकेल.

रंगनाथ पठारे यांनी मौखिक परंपरेतील ज्ञानसंक्रमणाचे साधन म्हणून निर्मित झालेल्या कथापरंपरेस पचवून इथल्या मातीच्या कथा रचल्या आहेत

जीवन[संपादन]

त्यांचा जन्म जुलै २०, १९५० रोजी जवळे नावाच्या गावी झाला. त्यांचे आई-वडील पुण्याजवळ कोथरूड या गावी रहात. दुसऱ्या महायुद्धात लढून आलेले त्यांचे वडील ट्रक चालवत असत. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत रंगनाथ पठारे गावी राहिले, तिथेच मॅट्रिक झाले. नंतर शिक्षणासाठी चार वर्षे नगरला, तीन वर्षे पुण्यात आणि त्यांची त्यानंतरचे त्यांचे वास्तव्य संगमनेरात आहे. (२०१४)

ते संगमनेरच्या संगमनेर महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे ३७ वर्षे प्राध्यापक होते. विभागप्रमुख म्हणून ते निवृत्त झाले..

रंगनाथ पठारे यांचे प्रकाशित साहित्य[संपादन]

 • अनुभव विकणे आहे (कथासंग्रह -१९८३)
 • आजची कादंबरी नोंदी आणि निरीक्षणे (वैचारिक)
 • आस्थेचे प्रश्न (निबंध माला -जुलै २०००)
 • ईश्वर मृतात्म्यास शांती देवो! (कथासंग्रह -मे १९९६)
 • एका आरंभाचे प्रास्ताविक (लेखसंग्रह)
 • कवीचे अखेरचे दिवस आणि निरागस इरेंदिरा (अनुवादित)
 • कादंबरी आणि लोकशाही (ललित, अनुवादित -जुलै २०००; मूळ हिंदी लेखक - मॅनेजर पाण्डेय)
 • कुंठेचा लोलक
 • कोंभालगतचा प्रवास (निवडक रंगनाथ पठारे)
 • गाभाऱ्यातील प्रकाश
 • गाभ्यातील प्रकाश (कथासंग्रह -१९९८)
 • चक्रव्यूह (कादंबरी -१९८९)
 • चित्रमय चतकोर (दीर्घकथा संग्रह -जुलै २०००)
 • चोषक फलोद्यान (कादंबरी)
 • छत्तीसगड नियोगींचे आंदोलन आणि सद्यःस्थिती (प्रबंध, सहलेखिका सुमती लांंडे)
 • जागतिकीकरण आणि देशीवाद (वैचारिक)
 • टोकदार सावलीचे वर्तमान (कादंबरी)
 • ताम्रपट (कादंबरी -१९९४)
 • तीव्र कोमल दुःखाचे प्रकरण (कथासंग्रह -जुलै २०००)
 • दुःखाचे श्वापद (कादंबरी -जानेवारी १९९५)
 • दिवे गेलेले दिवस (कादंबरी -जुलै २०००)
 • नामुष्कीचे स्वगत (कादंबरी -मार्च १९९९)
 • प्रत्यय आणि व्यत्यय (मुलाखतसंग्रह - सहलेखक : दिलीप चित्रे)
 • प्रश्नांकित विशेष (निबंध)
 • भर चौकातील अरण्यरुदन - सुनीलच्या कहाणीतून घडणारे भेदक समाजदर्शन आणि सुनीलने लिहिलेल्या मल्लाप्पाच्या कहाणीतून होणारे नाट्यमय समाजदर्शन.
 • मला माहीत असलेले शरद पवार (व्यक्तिचित्रण - रंगनाथ पठारेंसहित १० लेखक)
 • रथ (कादंबरी -१९८४)
 • शंखातला माणूस (कथासंग्रह)
 • सत्त्वाची भाषा (लेखसंग्रह -जानेवारी १९९७)
 • स्पष्टवक्तेपणाचे प्रयोग (कथासंग्रह -१९९२)
 • हारण (कादंबरी -१९९०)

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.