Jump to content

शरद तळवलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जन्म नोव्हेंबर १, १९१८
बोधेगाव, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू ऑगस्ट २१, २००१
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट)
भाषा मराठी

शरद तळवलकर (नोव्हेंबर १, १९१८ - ऑगस्ट २१, २००१) हे मराठी चित्रपटांतील अभिनेते होते. चेहऱ्यावरील भावातुनच विनोद आणि वेदना दाखविणारे कै शरद तळवलकर विनोदी अभिनेता म्हणून अभिनय करतानाच ते दु :खद प्रसंगातही हेलावून टाकणारे त्यांचे भाव चेहऱ्यावर दाखवीत शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. शरद तळवलकरांचा जन्म दि. १ नोव्हेंबर १९१८ रोजी झाला. शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस ‘रणदुंदुंभी’ नाटकातील शिशुपाल आणि ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्र त्यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली.[ संदर्भ हवा ]

शरद तळवलकर हे के.ना. वाटवे यांचे जावई लागत.

कित्येकदा लहान-मोठी किंवा अगदी पडदा उघडताना ऐनवेळी अशा भूमिका रंगवून त्यांनी आपले नाव नाट्यवर्तुळात सर्वतोमुखी केले. पुढे केशवराव दात्यांच्या ‘नाट्यविकास’ मंडळीत त्यांनी नोकरी केली. ‘छापील संसार’ नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. हा अभिनयाचा छंद जोपासत असताना त्यांनी ‘मिलिटरी अकाउंट्‌स’ मध्ये नोकरी केली. त्यावेळेस त्यांचे शिक्षणही सुरू होते.[ संदर्भ हवा ]

विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता ‘माझा मुलगा’ तिथून सुरू झालेला विनोदी अभिनेत्याचा प्रवास शेवटपर्यंत सुरूच होता. नाट्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रांत त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रभाव पाडला होता. बालगंधर्वांसारख्या नटश्रेष्ठाबरोबर ‘एकच प्याला’तील रंगवलेली तळीरामाची भूमिका बालगंधर्वांच्या शाबासकीला पात्र ठरली. ‘लग्नाची बेडी’ या नाटकातला गोकर्ण शरद तळवलकरांनी आपल्या ठसकेबाज शैलीत रंगवून अविस्मरणीय केला. पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्यनिर्माते म्हणून केलेले त्यांचे कार्य मोलाचे होते. त्यांच्या काळातील नभोनाट्ये हा श्रोत्यांच्या आवडीचा विषय होता. ‘कलाकार’ ही नाट्यसंस्था त्यांनी उभारली.[ संदर्भ हवा ]

मुंबईचा जावई या चित्रपटात त्यांनी केलेली भूमिका वास्तवाशी निगडित असून खूपच सुंदर होती अतिशय बोलक्या चेहऱ्याच्या ह्या विनोदी कलावंताला नाट्यसृष्टीत मानाचा समजला जाणाऱ्या ‘विष्णूदास भावे’ पुरस्काराने गौरविले गेले.[ संदर्भ हवा ]

चित्रपट[संपादन]

चित्रपट वर्ष भाषा सहभाग
अष्टविनायक मराठी अभिनय
गडबड घोटाळा १९८६ मराठी अभिनय
गौराचा नवरा १९८८ मराठी अभिनय
घरकुल १९७० मराठी अभिनय
चुडा तुझा सावित्रीचा १९७१ मराठी अभिनय
धाकटी सून १९८६ मराठी अभिनय
धूमधडाका १९८५ मराठी अभिनय
नवरे सगळे गाढव १९८२ मराठी अभिनय
मामा भाचे १९७९ मराठी अभिनय
मुंबईचा जावई १९७० मराठी अभिनय
राणीनं डाव जिंकला १९८३ मराठी अभिनय
वरदक्षिणा १९६० मराठी अभिनय

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • 'गुदगुल्या' दैनिक 'लोकसत्ता' मधून याच शीर्षकाखाली लिहिलेल्या अनुभव लेखांचा संग्रह
  • मी रंगवलेले म्हातारे[ संदर्भ हवा ]