Jump to content

प्रतिमा इंगोले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रतिमा इंगोले

डॉ. प्रतिमा इंगोले या एक मराठी बालसाहित्यकार, कवयित्री आणि वैचारिक लेखन करणाऱ्या लेखिका आहेत. नक्षलवाद, शेतमजूर, पंचमहाभूते, बलुतेदारी यांसारखे विविध विषय़ त्यांनी आपल्या साहित्यातून हाताळले आहेत. डॉ. इंगोले या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत. सतत सहा वर्षे विदर्भामध्ये अभ्यास करून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लिखाण केले आहे. प्रतिमा इंगोले यांची ८०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

डॉ. इंगोले यांनी ग्रामीण स्त्री-पुरुषांचे वास्तव जीवन आपल्या कथांमधून चितारण्याचा प्रयत्‍न केला. ग्रामीण भागातील समस्या, तेथील जीवघेणा जीवनसंघर्ष मांडणाऱ्या त्या एकमेव कथालेखिका आहेत. समकालीन लेखकांमध्ये अग्रस्थानी असणाऱ्या डॉ. प्रतिमा इंगोले यांनी ग्रामीण भागातील समस्यांवर उपाय सुचवण्याचा प्रयत्‍नही आपल्या लेखनातून केलेला आहे. ले.

यांचे किमान दहा कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या दहाही कथासंग्रहांना निरनिराळे पुरस्कार लाभलेले आहेत.

त्यांचा ‘हजारी बेलपान’ हा निखळ वऱ्हाडी बोलीतील पहिला संग्रह आहे तर ‘जावायाचं पोर’ हा पहिला स्त्रीवादी कथासंग्रह आहे. आज ग्रामीण साहित्य आणि स्त्रियांचे साहित्य या दोन्ही प्रवाहांत या कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत.

डॉ. प्रतिमा इंगोले या अमरावती जिह्यातील दर्यापूर गावच्या रहिवासी आहेत.

लिहिलेली वा प्रकाशित केलेली पुस्तके

[संपादन]
  • अकसिदीचे दाने (कथासंग्रह)
  • अंधारपर्व (कथासंग्रह)
  • अन् मृगधाऱ्या बरसल्या (कादंबरी)
  • अमंगल युग (कथासंग्रह)
  • आक्रोश अन्नदात्याचा
  • आगळे अनुभविश्व
  • आजही स्त्रीचे स्थान दुय्यमच
  • आत्मघाताचे दशक
  • आमच्या आयडॉल (संपादित)
  • आस्वाद गंध (लेखसंग्रह)
  • उजळ आजोबा (बालसाहित्य)
  • उजाड अभयारण्य (प्रवासवर्णन)
  • उदयसोहळा (कवितासंग्रह)
  • उद्‌कार (कवितासंग्रह)
  • उलटे झाले पाय (कथासंग्रह)
  • ओविली फुले मोकळी
  • करारी आजी (बालसाहित्य)
  • ग्रामीण साहित्य : लेखिकांची निर्मिती
  • खमंग संस्कृती (पाकशास्त्र)
  • चुंकी (कादंबरी)
  • जावायाचं पोर (कथासंग्रह)
  • जिजाऊ (बालसाहित्य)
  • झेंडवाईचे दिवे (कथासंग्रह)
  • तुयशीचा वटा (नाटक)
  • दृष्ट (बालसाहित्य)
  • नक्षलग्रस्त
  • पारंपरिक स्त्री गाथा
  • पार्ट टाईम (कादंबरी)
  • पॉलिश (कथासंग्रह)
  • बयनाचे बोल
  • बाईची कहाणी (कथा)
  • बापू गुरुजी (कहाणी)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्री जागृतीचे कार्य
  • बोडखी (कादंबरी)
  • बोरंवाली बाई (बालसाहित्य)
  • भंडाऱ्याचे गाव (कथा)
  • भुलाई (कवितासंग्रह)
  • भूलोजीची लेख भाग १, २
  • माध्यम (भाषणसंग्रह)
  • मोठ्ठं व्हायचं कसं (नात्यछटा)
  • येळी माय (कथासंग्रह)
  • लळा (कवितासंग्रह)
  • लाजाळू (बालकविता)
  • लोकसंस्कृती आणि स्त्रीजीवन
  • लेक भुईची (कथासंग्रह)
  • वसंत बंधारा (नाटक)
  • वऱ्हाडी लोकगाथा (कथासंग्रह)
  • वऱ्हाडी लोकभाषा
  • वसंत बंधारा (एकांकिका)
  • वाघाचं घर मेळघाट
  • वैदर्भीय (माहितीपर)
  • शेतकरी व्यथा (कथासंग्रह)
  • शेतकऱ्याच्या नारी (कवितासंग्रह)
  • श्यामतुरा भाग-१, २
  • सख्यांच्या गोष्टी (बालसाहित्य)
  • सावित्रीबाई फुले (बालसाहित्य)
  • डॉ. प्रतिमा इंगोले : साहित्यसूची
  • सिपनेचे स्वप्न (बालनाटिका)
  • सुगरनचा खोपा (कथासंग्रह)
  • सोन्याचं बाळ (बालकविता)
  • स्त्रीचे भावविश्व आणि आधुनिकता
  • स्वप्नातील राजा (बालकादंबरी)
  • हजारी बेलपान (कथासंग्रह)
  • हॅटट्रिक (विनोदी कथासंग्रह)
  • हिरवा मेळ मेळघाट
  • हिरवे स्वप्न (कथासंग्रह)

प्रतिमा इंगोले यांच्यावरील ग्रंथ

[संपादन]
  • डाॅ. प्रतिमा इंगोले यांच्या साहित्यातील सामाजिकता - एक अभ्यास (डाॅ. संजीवनी मोहोड ठाकरे)
  • डॉ. प्रतिमा इंगोले-साहित्यसूची (१९८१ ते २०००) - संपादक प्राचार्य रामदास मुगुटराव देवके.

डॉ. प्रतिमा इंगोले यांना मिळालेले पुरस्कार

[संपादन]
  • आचार्य अत्रे पुरस्कार
  • उत्कृष्ट स्त्रीजीवनपर पुरस्कार
  • कृष्णाबाई मोटे पुरस्कार
  • गिरिजा कीर पुरस्कार
  • ग्रंथोत्तेजक पुरस्कार
  • चिं.वि. जोशी पुरस्कार
  • जनसंवाद पुरस्कार
  • जिजामाता पुरस्कार
  • दत्ता डावजेकर स्मृती पुरस्कार
  • नागसेन पुरस्कार
  • प्रबोधन पुरस्कार
  • बहिणाबाई पुरस्कार[१]
  • महाराष्ट्र सरकारचे बालसाहित्य पुरस्कार (एकाहून जास्त वेळा)
  • महाराष्ट्र सारस्वत पुरस्कार
  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विश्वनाथ पार्वती पुरस्कार
  • पुणे येथील साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या वतीने देण्यात येणारा मालती दांडेकर जीवनगौरव पुरस्कार (२००९)
  • यशवंतराव चव्हाण पुरस्कार
  • राजरत्‍न पुरस्कार[२]
  • रोहमारे पुरस्कार
  • लोकमत दैनिकाचा पुरस्कार
  • लोकमित्र सरदार पुरस्कार
  • विदर्भ भूषण पुरस्कार
  • विश्वनाथ पार्वती पुरस्कार
  • शकुंतला जोग पुरस्कार
  • शब्दगंध पुरस्कार
  • शशिकला आगाशे बालवाङ्‌मय पुरस्कार
  • छत्रपती शिवाजी पुरस्कार
  • संत गोरोबा सामाजिक पुरस्कार
  • सह्याद्री वाहिनीचा नवरत्‍न पुरस्कार
  • स्वयंसिद्धा पुरस्कार[३]
  • ’वऱ्हाडी लोकगाथा’ला मुलुंड सेवा संघातर्फे देण्यात आलेला २०१४ सालचा सु.ल. गद्रे पुरस्कार.

सन्मान

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ↑ "डॉ. प्रतिमा इंगोले यांना बहिणाबाई पुरस्कार". २३ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ↑ "डॉ. प्रतिमा इंगोले यांना राजरत्‍न पुरस्कार प्रदान". २३ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. ↑ "डॉ. प्रतिमा इंगोले यांना स्वयंसिद्धा पुरस्कार". २३ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.[permanent dead link]