पुणे रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुणे
मध्य रेल्वे स्थानक
Pune railway station - Entrance.jpg
इमारत
स्थानक तपशील
पत्ता आगा खान रोड, पुणे - ४३१००१, पुणे जिल्हा
गुणक 18°31′44″N 73°52′21″E / 18.52889, 73.8725
मार्गिका मुंबई-चेन्नई मार्ग
पुणे-बंगळूर मार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन २७ जुलै १९२५
विद्युतीकरण होय
संकेत PUNE
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
सेवा
पुणे उपनगरी रेल्वे
स्थान
पुणे is located in महाराष्ट्र
पुणे
पुणे
महाराष्ट्रमधील स्थान

पुणे जंक्शन किंवा पुणे रेल्वे स्थानक हे पुणे शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक पुणे शहराला भारतातील सर्व प्रमुख शहरांशी जोडते. 'मुंबई-पुणे-सोलापूर-गुलबर्गामार्गे चेन्नई' आणि 'पुणे-मिरज-हुबळीमार्गे बंगळूर' हे दोन लोहमार्ग पुणे शहराशी जोडलेले आहेत. उपरोक्त दोन्ही लोहमार्गावरून जाणा-या सर्व 'मेल-एक्स्प्रेस-जलद -संपर्काक्रांती' इत्यादी गाड्या पुणे स्थानकात थांबतात. 'पुणे-मुंबई डेक्कन क्वीन' या स्वातंत्र्यपूर्व काळापासून अव्याहत चालणा-या वेगवान एक्स्प्रेसचा वाढदिवस प्रतिवर्षी १ जूनला या स्थानकात साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तराची स्थानके बनविण्यासाठी भारतातील ज्या प्रमुख स्थानकांची निवड झाली त्यात 'पुणे जंक्शन' समाविष्ट करण्यात आले आहे.

इतिहास[संपादन]

स्वातंत्र्यपूर्व काळात १८५३ मध्ये भारतात पहिली रेल्वे 'बोरीबंदर ते ठाणे' दरम्यान धावू लागली. तत्पश्चात ३ वर्षांत 'मुंबई-पुणे' लोहमार्ग बांधून पूर्ण झाला. १८८६ साली 'पुणे-मिरज' हाही लोहमार्ग बांधण्यात आला, मात्र तत्कालीन 'पुणे-मिरज' मार्ग मिटरगेज पद्धतीचा होता.१९३० च्या दशकात सुरु झालेली 'पुणे-मुंबई डेक्कन क्वीन' हि तत्कालीन भारतातील सर्वांत वेगवान एक्स्प्रेस मानली जात असे, त्या काळी डेक्कन क्वीन 'पुणे-मुंबई' हे अंतर केवळ अडीच तासांत (सध्या साडेतीन तास) पूर्ण करत असे.

महत्वाच्या गाड्यांची सूची[संपादन]

पुणे स्थानकातून सुटणा-या प्रमुख एक्स्प्रेस पुढीलप्रमाणे (कृपया अद्ययावत सूचीसाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी अथवा स्थानकात प्रत्यक्ष भेट द्यावी)

१] पुणे-सोलापूर इंटरसिटी

२] पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस

३] पुणे-मुंबई डेक्कन क्वीन

४] पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस

५] पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस

६] पुणे-इंदूर एक्सप्रेस

७] पुणे-अहमदाबाद अहिंसा एक्सप्रेस (रोज नाही)

८] पुणे-पटना एक्सप्रेस

९] पुणे-हावडा आझाद-हिंद एक्सप्रेस

१०] पुणे-जम्मू झेलम एक्सप्रेस

११] पुणे-वाराणसी ज्ञानगंगा एक्सप्रेस (रोज नाही)

१२] पुणे-मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस

१३] पुणे-सोलापूर-हुतात्मा एक्सप्रेस

१४] पुणे-मनमाड एक्सप्रेस

१५] पुणे-जोधपुर एक्सप्रेस (रोज नाही)

१६] पुणे-हैदराबाद एक्सप्रेस (लातूर मार्गे) (रोज नाही)

१७] पुणे-कर्जत शटल

१८] पुणे-मिरज शटल

१९] पुणे-दौंड शटल

२०] पुणे-मनमाड शटल

२१] पुणे-सोलापूर शटल

२२] पुणे-निजामाबाद शटल

२३] पुणे-बारामती शटल

२४] पुणे-एर्नाकुलम (पनवेल-रत्नागिरी मार्गे)

२५] पुणे-एर्नाकुलम (मिरज-बेळगाव-लोंढा मार्गे)

२६] पुणे-हावडा दुरान्तो एक्सप्रेस (रोज नाही)

२७] पुणे-नागपूर एक्सप्रेस (रोज नाही)

२८] पुणे-नागपूर गरीबरथ (रोज नाही)

२९] पुणे-विलासपूर एक्सप्रेस (रोज नाही)

मुंबईहून पुण्याला ६ गाड्या आहेत. याव्यतिरिक्त मुंबईहून कोल्हापूर, लातूर, सोलापूर (सिद्धेश्वर एक्स्प्रेस), हैदराबाद, बंगळूर, चेन्नई, नागरकोविल, भुवनेश्वर, कोइंबतूर या ठिकाणी जाणा-या सर्व रेल्वे-एक्स्प्रेस पुणे स्थानकात थांबतात.इ.स. २०११ साली सिकंदराबाद येथे जाण्यासाठी शताब्दी सुरू होण्याचा प्रस्ताव आहे. दिल्लीवरून बंगळुराला जाणारी कर्नाटक संपर्कक्रांती ही गाडी पुण्याला थांबते.

महाराष्ट्रातील पर्यटनाभिमुख गाडी डेक्कन ओडिसी हिच्या मार्गावरही पुणे हे एक ठिकाण आहे.

पुणे स्थानकातून सुटणा-या उपनगरीय रेल्वे

पुणे स्थानकातून तळेगाव आणि लोणावळा या ठिकाणी उपनगरी लोकल्स सुटतात. सध्या दिवसभरात १९ लोकल लोणावळ्याला आणि २ लोकल तळेगावला सुटतात. सर्व लोकल 'विद्युत मोटर'वर चालणा-या आणि १२ डब्यांच्या आहेत.

समस्या आणि आव्हानं[संपादन]

पुणे हे देशातील सातव्या क्रमांकाचे महानगर असून मागील दोन दशकांत पुण्याच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर पुण्याच्या रेल्वे स्थानकावरही काही समस्या आणि आव्हानं निर्माण झाली आहेत.

प्रमुख समस्या[संपादन]

१] एककेंद्रित गर्दी :- वाढत्या गर्दीचे विभाजन करण्याच्या हेतूने प्रमुख महानगरांत दोन किंवा अधिक रेल्वे टर्मिनस बांधण्यात आली आहेत. उदाहरण - दिल्लीत 'आनंद विहार', 'निजामुद्दीन', 'दिल्ली सराय रोहिल्ला', नवी दिल्ली' आणि 'पुराणी दिल्ली' असे पाच टर्मिनस आहेत. मुंबईतसुद्धा ५ टर्मिनस आहेत. कलकत्ता येथे ३ तर बंगळूर, पटना आणि चेन्नई येथे २ टर्मिनस आहेत.

तथापि, पुण्यात अद्यापि 'पुणे जंक्शन' हे एकमेव टर्मिनस असल्याने या स्थानकावर ताण पडत आहे.

२] अस्वच्छता :- वाढत्या गर्दीचा परिणाम हा स्थानकातील 'स्वच्छता आणि सुव्यवस्था' राखण्यावर होत आहे.

३] अपुरे प्लेटफोर्म :- पुणे जंक्शन स्थानकात सध्या ६ प्लेटफोर्म आहेत. प्रचंड गर्दी आणि गाड्यांची संख्या यामुळे उपलब्ध प्लेटफोर्मवर ताण येत आहे. तथापि प्लेटफोर्म वाढविण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.

प्रमुख आव्हाने[संपादन]

१] विस्तारीकरण : पुणे स्थानक मध्यवस्तीत असल्याने रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण हे एक आव्हान आहे.

२] सुरक्षा व्यवस्था : गर्दी वाढत असल्याने सुरक्षा व्यवस्था हेही आव्हान आहे.

३] जलद वाहतूक : मुंबई आणि पुणे हि महानगरे बंगळूर, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांशी जलद गाड्यांनी जोडण्याची आवश्यकता आहे. मात्र, 'दौंड-गुलबर्गा' या भागात अद्याप पूर्णतः विद्युतीकरण आणि दुपदरीकरण न झाल्याने सद्यस्थितीत दक्षिण भारताशी वेगवान गाड्या चालविताना आव्हान येत आहे.

४] गाड्यांची संख्या वाढविणे : उपलब्ध मार्गावर नवीन गाड्या सुरु करताना काही आव्हाने आहेत. विशेषतः उपनगरी गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी आहे, मात्र स्वतंत्र लोकलसाठी लोहमार्ग नसल्याने हे एक आव्हान आहे.

प्रमुख प्रस्ताव[संपादन]

पुणे रेल्वे स्थानकाच्या संदर्भात विविध विचारवंत आणि पुण्यातील प्रवासी संघटना यांनी पुढील प्रस्ताव ठेवले आहेत.

१] पुणे-नाशिक रेल्वेमार्ग बांधणे (हा प्रस्ताव संमत झाला आहे)

२] कर्जत-पनवेल या मार्गाचा कार्यक्षम वापर करून पुणे शहर कोकण रेल्वेशी जोडणे.

३] पुणे-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग (प्रस्ताव संमत झाला आहे)

४] पुण्याहून राजस्थानकडे नियमित गाडी चालू करणे.

५] उपनगरी लोकल्सची संख्या विशेषतः गर्दीच्या सायंकाळच्या वेळी वाढविणे.

बाह्य दुवे[संपादन]