कविता महाजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कविता महाजन
कविता महाजन.jpg
जन्म नाव कविता महाजन
जन्म सप्टेंबर ५, इ.स. १९६७
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र साहित्य,
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, बालसाहित्य, अनुवादित साहित्य
प्रसिद्ध साहित्यकृती ब्र
पुरस्कार साहित्य अकादमी

कविता महाजन (सप्टेंबर ५, इ.स. १९६७; नांदेड, महाराष्ट्र - हयात) या मराठी लेखिका, कवयित्री आहेत.

जीवन[संपादन]

कविता महाजनांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयमध्ये झाले. त्यानंतर नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्या मराठी साहित्य या विषयात एम.ए.आहेत.

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
ब्र कादंबरी राजहंस प्रकाशन २००५
भिन्न कादंबरी राजहंस प्रकाशन जुलै २००७
धुळीचा आवाज काव्यसंग्रह
म्रृगजळीचा मासा काव्यसंग्रह
कुहू [१] लेखसंग्रह दिशा क्रिएटिव्हस
तत्पुरुष काव्यसंग्रह
ग्राफिटीवॉल लेखसंग्रह राजहंस प्रकाशन २००९
वारली लोकगीते आदिवासी लोकगीतांचे संकलन व संपादन साहित्य अकादमी
रजई (इस्मत चुगताई) लघुकथासंग्रह
वैदेही यांच्या निवडक कथा (संपादित : भारतीय लेखिका पुस्तक मालिका) कथा संग्रह
(जानकी श्रीनिवास मूर्ती यांच्या कथांचा अनुवाद. अनुवादकः उमा कुलकर्णी)
तुटलेले पंख (संपादित: भारतीय लेखिका पुस्तक मालिका) लेखसंग्रह
पूल नसलेली नदी (संपादित: भारतीय लेखिका पुस्तक मालिका) कथा संग्रह
जोयानाचे रंग बालसाहित्य राजहंस प्रकाशन सप्टेंबर २०११

पुरस्कार[संपादन]

  • यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्‌मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार (इ.स. २००८)
  • कवयित्री बहिणाई पुरस्कार (इ.स. २००८)
  • साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार (रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादाला)(इ.स. २०११)
  • मुख्याध्यापिका शशिकलाताई आगाशे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा राज्यस्तरीय बालवाड्मय पुरस्कारासाठी ‘जोयनाचे रंग’ या कथासंग्रहासाठी (२०१३). [२]

बाह्य दुवे[संपादन]

  1. पुस्तकविश्व मधील मुलाखत
  2. लोकप्रभा मधील मुलाखत

संदर्भ[संपादन]

  1. [१]महाराष्ट्र टाईम्स मधला कुहू वरचा लेख
  2. [२]दिव्यमराठी मधली बातमी


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.