ज्ञानेश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ज्ञानेश्वर
Saint Dnyaneshwar and Sachchidanand baba.jpg
नेवासा येथील संत ज्ञानेश्वर सच्चिदानंद बाबांना ज्ञानेश्वरी सांगत असतानाच्या दृश्याचे शिल्प.
मूळ नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
जन्म श्रावण कृ.अष्टमी,११९७ (इ.स. १२७५)
आपेगाव (ता.पैठण ) जि. आपेगाव महाराष्ट्र
निर्वाण =
समाधिमंदिर आळंदी जि.पुणे
उपास्यदैवत विठ्ठल
संप्रदाय नाथ संप्रदाय, वारकरी, वैष्णव संप्रदाय
गुरू निवृत्तिनाथ
भाषा मराठी
साहित्यरचना  • ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका),
 •  अमृतानुभव,
 •  हरिपाठ,
 •  अभंग
कार्य समाज उध्दार
वडील विठ्ठलपंत कुलकर्णी
आई रुक्मिणीबाई कुलकर्णी

संत ज्ञानेश्वर (जन्म : आपेगाव-पैठण, श्रावण कृष्ण अष्टमी, इ.स. १२७५; संंजीवन समाधी : आळंदी, इ.स. १२९६)[१][२] हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगीतत्त्वज्ञ होते.

फक्त 16 वर्षांच्या लहान आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरी (भगवद्गीतेवरील भाष्य) आणि अमृतानुभव यांची रचना केली.[३] देवगिरीच्या यादव घराण्याच्या आश्रयाने या मराठी भाषेतील सर्वात जुन्या हयात असलेल्या साहित्यकृती आहेत आणि या मराठी साहित्यातील मैलाचे दगड मानल्या जातात.[४] संत ज्ञानेश्वरांच्या विचारांमध्ये अद्वैतवादी वेदांत तत्त्वज्ञान आणि भगवान विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीवर आणि योगावर भर देण्यात आला आहे. त्यांच्या वारशाने एकनाथ आणि तुकाराम यांसारख्या संत-कवींना प्रेरणा दिली आणि ते महाराष्ट्रातील हिंदू धर्मातील वारकरी (विठोबा-कृष्ण) भक्ती परंपरेचे संस्थापक आहेत.[५][६] संत ज्ञानेश्वरांनी १२९६ मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली.

भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभव, चांगदेवपासष्टीहरिपाठाचे अभंग ह्या त्यांच्या काव्यरचना आहेत. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली.

ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्यरचना करताना बाप विठ्ठलसुत, बाप रखुमाईवर, ज्ञाना, ज्ञानाबाई, आणि ज्ञानदेव ही नावेही वापरली आहेत. हरिपाठ या ग्रंथाच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे, ती अशी : आदिनाथ → मत्स्येंद्रनाथ → गोरक्षनाथ → गहिनीनाथ → निवृत्तिनाथ → ज्ञानेश्वर

ज्ञानेश्वरांचे बालपण[संपादन]

ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे अकराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेवदेवमुक्ताबाई ही धाकटी भावंडे. त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. (काही अभ्यासकांच्या मते या सर्व भावंडांचा जन्म आळंदी येथेच अनुक्रमे शके ११९०, ११९३, ११९६ व ११९९ मध्ये झाला.)

संत ज्ञानेश्वर

आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुरूंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानमुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.

विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. त्या काळी संन्यास्याची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. गावाने त्यांना व त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकले. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले. [७]

आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली.

संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आहे. भिक्षा मागून ते आपला जीवन निर्वाह करीत असत. भिक्षा मागणाऱ्या या भाऊ बहिणींची कुशाग्र बुद्धी व शास्त्र ज्ञान पाहून पैठणमधील ब्राह्मण दुःखी होत असत. त्यांनी विचार केला की "आईवडिलांच्या अपराधाचे दंड मुलांना देणे अन्याय पूर्ण आहे." शेवटी 1288 साली पैठण मधील ब्राह्मणांनी चारही भाऊ बहिणींना शुद्ध करून पुनः समाजात सम्मिलित केले.

भावार्थदीपिका उर्फ ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले.

ज्ञानेश्वरांचे कार्य[संपादन]

ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ हेच त्यांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.

माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। (ज्ञाने - ६.१४)

असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते.

त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.

'चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण त्‍यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय. यात अद्वैतसिद्धान्ताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे.

चांगदेवांचे गर्वहरण

अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर ज्ञानेश्वरमाउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दुःख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह - या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.

‘जो जे वांछील, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्‍न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सावता माळी, या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारिक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्‍न केला.ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद् गीता मराठीतून लिहिली.

संजीवन समाधी[संपादन]

संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपानमुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपआपली इहलोकीची यात्रा संपवली.

इंद्रायणीच्या तीरावर आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य षष्ठी ते अमावस्येपर्यंत साजरा केला जातो. यातील प्रत्येक दिवसाला आगळेवेगळे महत्व आहे.

ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ[संपादन]

ज्ञानेश्वरांवरील आणि ज्ञानेश्वरांच्या ग्रंथांवरील पुस्तके[संपादन]

 • अमृतानुभव (रा.ब. रानडे)
 • अमृतानुभव (पंडित सातवळेकर)
 • अमृतानुभव अधिक सार्थ सान्वय चांगदेवपासष्टी (विष्णुबुवा जोगमहाराज)
 • अमृताचा अनुभव : ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचा छंदानुवाद (हेमंत राजाराम)
 • आजची ज्ञानेश्वरी - मूळ सांप्रदायिक ज्ञानेश्वरीसहित (कर्मकांडासह अनुवाद - त्र्यंबक मगनराव चव्हाण)
 • संत ज्ञानेश्‍वर : समाधी रहस्य आणि जीवन चरित्र (प्रवचन संग्रह, प्रवचनकार आणि लेखक - तत्त्वदर्शक सरश्री)
 • संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव (सोप्या पद्यमय मराठीत अमृतानुभव - (विंदा करंदीकर)
 • अलौकिकतावाद ज्ञानेश्वरांचा (लेखिका : डॉ. श्यामला मुजुमदार) - ढवळे प्रकाशन २०१४ (दुसरी आवृत्ती)
 • The Eternal Wisdom of Dnyaneshwari (इंग्रजी, डॉ. वसंत शिरवळकर)
 • इंद्रायणीकाठी (कादंबरी, रवींद्र भट)
 • गीतादर्शन : श्री ज्ञानेश्वर आणि श्री रमण महर्षी (डॉ. सुधाकर नायगावकर)
 • The Genius of Dnyaneshvar (रविन थत्ते)
 • ताटी उघडा ज्ञानेश्वरा (स.कृ. जोशी)
 • दैनंदिन ज्ञानेश्वरी (माधव कानिटकर)
 • नाथसंप्रदाय आणि ज्ञानेश्वर (डॉ. कृ.ज्ञा. भिंगारकर)
 • ज्ञानदेवांचे पसायदान (अरविंद मंगरूळकर, व विनायक मोरेश्वर केळकर)
 • भावार्थ ज्ञानेश्वरी (प्रा.शं.वा. दांडेकर)
 • महाराष्ट्राचा भागवतधर्म - ज्ञानदेव आणि नामदेव (डॉ. शं.दा. पेंडसे)
 • माऊलीचा सार्थ हरिपाठ (वामन देशपांडे)
 • माणूस नावाचे जगणे (रविन लक्ष्मण थत्ते)
 • मी हिंदू झालो (रविन थत्ते)
 • मुलांसाठी संत ज्ञानेश्वर (वामन देशपांडे)
 • येणें वाग्यज्ञें तोषावें (लेखक : डॉ. अविनाश स. पितळे) - प्रकाशक ऋजुता पितळे (पुणे) : ज्ञानेश्वरांच्या सर्वच वाङ्‌मय कृतींचा परिचय
 • विश्व माऊली ज्ञानेश्वर (डॉ. शैलजा काळे)
 • श्रीज्ञानेश्वर - अलौकिक व्यक्तिमत्त्व (कोंकणी, हरदत्त खांडेपारकर)
 • संजीवन (ज्ञानेश्वरांच्या भावविश्वावरील कादंबरी, लेखक - भा.द. खेर)
 • संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (गोविंद गोवंडे)
 • संत ज्ञानेश्वर (बालवाङ्मय, ल.गो. परांजपे)
 • संत ज्ञानेश्वर महाराज (चरित्र, बालवाङ्मय, लेखक - अरुण गोखले)
 • संत ज्ञानेश्वरांची 'घोंगडी' (शंकर अभ्यंकर)
 • सार्थ श्री ज्ञानेश्वरी (श्री गुरु साखरे सांप्रदायिक शुद्ध) (संपादक - विनायक नारायण जोशी आणि रामचंद्र तुकाराम यादव; अक्षर दालन प्रकाशन)
 • सार्थ श्रीज्ञानेश्वरी (दिवाकर अनंत घैसास)
 • ज्ञानदेव आणि ज्ञानदेवी (अनेक विद्वानांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह)
 • श्री ज्ञानदेव गाथा (साखरे महाराज)
 • श्रीज्ञानदेवांचा हरिपाठ (सार्थ, प्रा. के.वि. बेलसरे)
 • ज्ञानाचा उद्‍गार (ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर)
 • ज्ञानदेव व ज्ञानेश्वर (भारद्वाज)
 • श्रीज्ञानदेव विजय (मामा देशपांडे, रा.नी. कवीश्वर)
 • ज्ञानराज माउली (लीला गोळे)
 • (वि)ज्ञानेश्वरी (रविन थत्ते, मृणालिनी चितळे)
 • ज्ञानदेवांची भजने आणि चांगदेव चाळीशी (विनोबा भावे)
 • ज्ञानदेवांची वाणी (डॉ. अशोक देशमाने, डॉ. विद्यासागर पाटंगणकर)
 • ज्ञानदेवांचे निवडक अभंग ((डॉ. प्रमोद पडवळ)
 • श्रीज्ञानेश्वर चरित्र (ल.रा. पांगारकर)
 • श्रीज्ञानेश्वर : तत्त्वज्ञ, संत आणि कवी (व्याख्यानसंग्रह, व्याख्याते लेखक : डॉ. व.दि. कुलकर्णी) - ढवळे प्रकाशन
 • ज्ञानेश्वर ते आंबेडकर (डॉ. श्रीपाल सबनीस)
 • ज्ञानेश्वर जीवननिष्ठा (१९७१) (गं.बा. सरदार)
 • ज्ञानेश्वर नीति कथा (वि.का. राजवाडे)
 • श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र आणि ग्रंथ विवेचन (ल. रा. पांगारकर)
 • श्री ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी (पंडित कृष्णकांत नाईक)
 • श्री ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र (तात्या नेमिनाथ पांगळ)
 • ज्ञानेश्वर माऊली (दत्ता ससे)
 • संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव (समीक्षा, विंदा करंदीकर)
 • ज्ञानेश्वरांचा खरंच छळ झाला का? (गुरुदेव डॉ. नारायणानंदनाथ काटेस्वामीजी)
 • श्रीज्ञानेश्वरांचा वाङ्मयीन वारसा (:डॉ. जुल्फी शेख)
 • ज्ञानेश्वरांचे चमत्कार (विश्वनाथ खैरे)
 • ज्ञानदेवांचे पसायदान (अरविंद मंगरूळकर, व विनायक मोरेश्वर केळकर)
 • ज्ञानेश्वरांचे विचारदर्शन (डॉ. शं.रा. तळघट्टी)
 • ज्ञानेश्वरी - अध्याय (अनेक पुस्तके, अच्युत सिद्धनाथ पोटभरे)
 • सार्थ ज्ञानेश्वरी प्रस्तावना (सोनोपंत दांडेकर)
 • सुबोध अनुष्टुप ज्ञानेश्वरी (प्र.सि. मराठे)
 • सोपी ज्ञानेश्वरी (वामन देशपांडे)
 • ज्ञानेश्वरी (राजवाडे संहिता); अध्याय १, ४ व १२
 • ज्ञानेश्वरी (साखरेमहाराज)
 • ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा - एक अभ्यास (प्रा. भावे, प्रा. दाते; मेहता प्रकाशन)
 • श्रीज्ञानेश्वरी अमृतगंगा (प्रा. ह.शे. टेकाळे)
 • ज्ञानेश्वरी - एक अपूर्व शांतिकथा (लेखक : डॉ. व.दि. कुलकर्णी) - मॅजेस्टिक प्रकाशन २०१४ (दुसरी आवृत्ती)
 • श्री ज्ञानेश्वरी : एक अवलोकन (डॉ. ह.य. कुलकर्णी)
 • ज्ञानेश्वरी (ओबड-धोबड), भाग १, २; संच - रविन मायदेव थत्ते
 • ज्ञानेश्वरी निरूपण (सेतुमाधव संगोराम)
 • ज्ञानेश्वरीचे भावविश्व (डॉ. मो.रा. गुण्ये)
 • ज्ञानेश्वरीचे शब्दभांडार (रामचंद्र नारायण वेलिंगकर)
 • ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान (डॉ. शं.दा. पेंडसे)
 • ज्ञानेश्वरीतील भावगंध (कि.द. शिंदे)
 • ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण (वि.का. राजवाडे)
 • ज्ञानेश्वरीतील माणिक मोती (वामन गो. नातू)
 • ज्ञानेश्वरीतील विदग्ध रसवृत्ती डॉ. (रा.शं. वाळिंबे)
 • ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी (म.वा. धोंड)
 • ज्ञानेश्वरी दर्शन (प्रा. रा.श्री. जोग)
 • ज्ञानेश्वरी सर्वस्व (न.चिं.केळकर)

चित्रपट[संपादन]

 • ज्ञानेश्वरांच्या जीवनावर ’संत ज्ञानेश्वर’ नावाचा मराठी चित्रपट प्रभात फिल्म कंपनीने काढला होता. तो १८ मे १९४० रोजी एकाच वेळी मुंबईत आणि पुण्यात प्रकाशित झाला. पुण्यात तो ३६ आठवडे चालला. या चित्रपटामुळे प्रभातची कीर्ती जगभर पसरली. आजही हा चित्रपट गर्दी खेचतो.
 • संत ज्ञानेश्वर नावाचा हिंदी चित्रपट सन १९६४ मध्ये बनला होता.

स्मारके[संपादन]

 • अहमदनगर जिल्ह्यात नेवासा येथे श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय या नावाचे कॉलेज आहे.तसेच या शहरात संत ज्ञानेश्वरांच्या नावाने उद्यान आहे याचे संगोपन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान करते
 • आळंदीला ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आणि तिने चालविलेले ज्ञानेश्वर विद्यालय आहे. ही प्रशाला भावी कीर्तनकार, प्रवचनकार घडविणारी प्रबोधन शाळा आहे.
 • औरंगाबाद जिल्ह्यातील हर्सूल गावी ’श्री संत ज्ञानेश्वर वेदविद्या प्रतिष्ठान’ची वेद शाळा आहे.
 • गोंदिया जिल्ह्यात पांढराबोडी येथे संत ज्ञानेश्वर आदिवासी निवासी आश्रमशाळा होती।
 • संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा, तळेगांव
 • श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय, महर्षीनगर, पुणे
 • संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, इस्लामपूर (सांगली जिल्हा)
 • एम‌आयटी संस्थेचे श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय (पुणे)
 • संत ज्ञानेश्वर उद्यान, निगडी (पुणे)

संत ज्ञानेश्वर संबंधित निवडक पीएच. डी प्रबंध[८][संपादन]

 • श्री संत ज्ञानेश्वर एक विभूती चिकित्सा
 •  संत ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथातील शिक्षण व मुल्यविचारांचा चिकित्सक अभ्यास
 •  संत ज्ञानेश्वर आणि संत मीराबाई यांच्या मधुराभक्तीपर काव्याचा तौलनिक अभ्यास
 •  संत साहित्यातील कल्याणाच्या अर्थशास्त्राचा एक तौलनिक अभ्यास : विशेष संदर्भ - संत तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ व नामदेव
 •  नामदेव- ज्ञानदेवकालीन मराठी संत साहित्याचे सांस्कृतिक, सामाजिक व वाण्ग्मयीन आकलन: एक अभ्यास

हेही पहा[संपादन]

विकिस्रोत
ज्ञानेश्वर हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.

संदर्भ[संपादन]

 1. ^ Mokashi 1987, p. 39.
 2. ^ W. Doderet (1926), ]https://www.jstor.org/stable/607401 The Passive Voice of the Jnanesvari], Bulletin of the School of Oriental Studies, Cambridge University Press, Vol. 4, No. 1 (1926), pp. 59-64
 3. ^ Ranade 1933, pp. 31–34.
 4. ^ D. C. Sircar (1996). Indian Epigraphy. Motilal Banarsidass. pp. 53–54. ISBN 978-81-208-1166-9.
 5. ^ Melton, J. Gordon (2011-09-13). Religious Celebrations: An Encyclopedia of Holidays, Festivals, Solemn Observances, and Spiritual Commemorations [2 volumes]: An Encyclopedia of Holidays, Festivals, Solemn Observances, and Spiritual Commemorations (इंग्रजी भाषेत). ABC-CLIO. ISBN 978-1-59884-206-7.
 6. ^ R. D. Ranade (1997). Tukaram. State University of New York Press. pp. 9–11. ISBN 978-1-4384-1687-8.
 7. ^ "संत ज्ञानेश्वर परिचय". जुलै १२,२०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 8. ^ "संत ज्ञानेश्वर यांच्याशी संबंधित इंटरनेटवरील निवडक ग्रंथ, पीएच. डी प्रबंध, चित्रपट, माहिती".

बाह्य दुवे[संपादन]