चतुःशृंगी मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चतुःशृंगी मंदिर
Chaturshringi-TempleGates.jpg
अन्य नावे/ नामांतरे माता अंबेश्वरी
या अवताराची मुख्य देवता सप्तश्रुंगी देवी
विशेष माहिती http://www.chattushringidevasthanpune.org/

चतुःश्रुंगी मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरातील हिंदू मंदिर आहे. हे मंदिर सेनापती बापट रोडवरील टेकडीवर आहे. हे पेशव्यांच्या मराठा राज्याच्या काळात बांधले गेले असे म्हणतात.[१]

स्थान[संपादन]

चतुःशृंगी म्हणजे चार शिखर असलेला पर्वत. चट्टुशृंगी मंदिर ९० फूट उंच आणि १२५ फूट रुंद आहे आणि हे सामर्थ्य आणि श्रद्धा यांचे प्रतीक आहे. चतुःशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी १७०हून अधिक पायऱ्या चढणे आवश्यक आहे. मंदिराच्या आवारात दुर्गा आणि भगवान गणेश यांचीही मंदिरे आहेत. यात अष्टविनायकाच्या आठ लघु मूर्तींचा समावेश आहे. ही लहान मंदिरे चार स्वतंत्र टेकड्यांवर आहेत.[२]

बाह्य दुवे[संपादन]

चतुशृंगी देवस्थान, पुणे

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Know Your City: Chaturshringi Temple". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2013-09-30. 2021-05-13 रोजी पाहिले.
  2. ^ "Chaturshringi Temple". www.mapsofindia.com. 2021-05-13 रोजी पाहिले.