Jump to content

राम नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रामनदी (पुणे) या पानावरून पुनर्निर्देशित)

राम नदी ही पुणे शहरात असलेली एक नदी आहे. ती पुण्याच्या वायव्येला असलेल्या मुळशी तालुक्यातील खाटपेवाडी येथील डोंगरात उगम पावते आणि पुण्यातील वर्पेवाडी, खाटपेवाडी, भुकूम, भूगाव, बावधन, सुतारवाडी करत पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर, औंध असा १८ किमीचा प्रवास करत मुळा नदीला मिळते. यामध्ये भुकूम, भूगाव आणि बावधन या तीन ग्रामपंचायती रामनदीच्या काठावर वसल्या आहेत. बेकायदेशीर घरबांधणीमुळे राम नदीचे पात्र आकसले आहे, व तिच्यात केरकचरा टाकल्याने तिला नाल्याचे स्वरूप आले आहे.

पुणेकरांची मागणी आहे की राम नदीचे पुनरुज्जीवन व्हावे. रामनदीची स्वच्छता आणि संवर्धनाच्या कामात रामनदी स्वच्छता अभियान समिती गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. यामध्ये रामनदीच्या खोऱ्यातील भूकुम, भूगाव, बावधन बुद्रुक, बावधन खुर्द, सुतारवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी, बाणेर आणि औंध या गावांमध्ये रामनदी स्वच्छता अभियान, जनजागृतीपर रामनदी जलदिंडी आणि रामनदी परिक्रमा कार्यक्रम राबवले जातात.

पुण्यातील खाटपेवाडी तलाव, मानस तलाव आणि पाषाण तलाव असे ३ तलाव याच नदीवर आहेत.

खाटपेवाडी तलाव
रामनदी, औंध
मानस तलाव
राम नदीतील प्रदूषण