पुण्यातील प्लेगची साथ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
चापेकर बंधूंचे स्मारक

पुण्यात प्लेगची साथ १८९६ साली पसरली होती. त्यात अनेक लोक बळी गेले. पुण्यात प्लेगची साथ पसरल्यानंतर १८९७चा संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा लागू झाला होता. या कायद्यानुसार एखादी व्यक्तीला प्लेगचा आजार झाल्याची शंका आल्यास तिची इच्छा असो वा नसो, तिला सरकारी हॉस्पिटलात भरती केले जात असे. प्लेगचे रुग्ण शोधण्यासाठी ब्रिटिश अधिकारी रॅंड याचे सैनिक पुणेकरांच्या घरात घुसत होते, सामानाच्या तपासणीच्या नावाखाली लुटालूट करत होते. उगीचच संशय घेऊन बरेच सामान जाळून टाकत होते. रुग्णालयात भरती करण्यासाठी लोकांना फरफटत नेत होते. रोगग्रस्त लोकांसोबतच अनेक निरोगी लोकांनाही केवळ संशयावरून रोग्यांच्या छावणीत हलविण्यात आले.

ब्रिटिश सोल्जर हे देवघर-स्वयंपाकघरात पायातल्या जोड्यानिशी शिरत होते. देव बाहेर काढून रस्त्यावर फेकत होते. स्वयंपाकघरातील लोणच्याच्या बाटल्या रोग होईल म्हणून उकिरड्यात टाकत होते. घरातील वृद्ध तसेच स्त्रियांवर अत्याचार केले गेले. याचा बदला म्हणून चाफेकर बंधूनी रॅंडवर गोळीबार करून त्याचा खून केला.

याच प्लेगाच्या साथीत अडकलेल्या लोकांचे यांना सहन झाले नाहीत. त्यांनी प्लेगपीडितांसाठी पुणे शहराजवळील ससाणे यांच्या माळावर हॉस्पिटल सुरू केले. त्या स्वतः रोग्यांना धीर देऊ लागल्या. त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटू लागल्या. कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. पण रोग्यांचा उपचार करता करता सावित्रीबाईंनाही प्लेगने गाठले आणि त्यातच त्यांचाही मृत्यू झाला.

पुणेपासून 20 किलोमीटर अंतरावर पिरंगुट या गावात प्लेगच्या साथीने अक्षरशः गावात माणूस जिवंत राहत नव्हता अशा कठीण काळात नामाजी गोळे यांनी प्लेग साथीत मृत झालेल्या जवळपास 75 लोकांना एकट्याने भैरवनाथ मंदिर समोरील पांदण रस्ताला गाडले होते, स्वतःच्या कुटुंबात सदस्यची पर्वा न करता त्यांनी हे कार्य पार पाडले, दुर्दैवाने त्यांची दखल घेतली गेली नाही या कार्याचा खुलासा त्यांची नात श्रीमती द्रौपदाबाई हगवणे वय 98 ,सध्या राहणार म्हाळुंगे, क्रीडांनगरी,पुणे यांनी काल केला 20 मार्च 2021 रोजी त्यांची मुलखात घेतली असता हे समजले