लक्ष्मण रामचंद्र पांगारकर
लक्ष्मण रामचंद्र पांगारकर | |
---|---|
जन्म |
३१ जुलै, १८७२ चिपळूण, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू | १० नोव्हेंबर, १९४१ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
विषय | संतसाहित्य, अध्यात्म |
प्रसिद्ध साहित्यकृती | मराठी वाङ्मयाचा इतिहास |
लक्ष्मण रामचंद्र पांगारकर ( : चिपळूण, ३१ जुलै १८७२; - १० नोव्हेंबर१९४१) हे मराठी लेखक, संतसाहित्य अभ्यासक होते.
जीवन
[संपादन]प्राचीन मराठी वाङ्मयाचे इतिहासकार व संताचरित्रकार ल.रा. पांगारकर यांचा जन्म १८७२ साली महाराष्ट्रातील चिपळूण गावी झाला. शालेय शिक्षणाकरता ते चिपळुणाहून पुण्यास 'न्यू इंग्लिश स्कूल' शाळेत दाखल झाले. लोकमान्य टिळक आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर त्यांना शाळेत शिकवत होते. त्यांनी 'मुमुक्षू' हे नियतकालिक साप्ताहिक स्वरूपात तेरा वर्षे आणि मासिक स्वरूपात बारा वर्षे चालवले.[१] मोरोपंतांचे चरित्र आणि काव्यविवेचन हा ग्रंथही त्यांनी लिहिला. इ.स. १९१० साली त्यांनी 'तुकाराम चरित्र' लिहिले.
१९४१ साली पांगारकरांचे निधन झाले.
लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांनी ’भक्तिमार्ग प्रदीप’ हे पुस्तक लिहिले आहे. हे प्रचंड खपाचे पुस्तक आजही लोकप्रिय आहे[ संदर्भ हवा ]
प्रकाशित साहित्य
[संपादन]- आनंदलहरी - काव्यसंग्रह
- चरित्रचंद्र (आत्मचरित्र)
- तुकाराम चरित्रामृत
- नवविद्या भक्ती
- पारिजातकाची फुले
- भक्तिमार्ग प्रदीप - भक्तिपर वेच्यांचा संग्रह
- मराठी भाषेचे स्वरूप
- मराठी वाङ्मयाचा इतिहास - खंड १, २ भागांचे संपादन (इ.स. १९३२) [१]
- महाराष्ट्रमहोदय
- मोरोपंतांचे चरित्र आणि काव्यविवेचन
- संत एकनाथांचे चरित्र
- ज्ञानेश्वरांचे चरित्र