Jump to content

भास्कर चंदनशिव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भास्कर चंदनशिव
जन्म नाव भास्कर देवराव यादव
जन्म १२ जानेवारी, १९४५ (1945-01-12)
हासेगांव-कळंब
मृत्यू २८ सप्टेंबर, २०२५ (वय ८०)
लातुर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य, अध्यापन
भाषा मराठी
साहित्य प्रकार कथा लेखन

भास्कर तात्याबा चंदनशिव (मूळ नाव:भास्कर देवराव यादव; १२ जानेवारी, १९४५:हासेगांव, कळंब, महाराष्ट्र - २८ सप्टेंबर, २०२५, लातूर, महाराष्ट्र) हे मराठी ग्रामीण साहित्यिक होते.

सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण

[संपादन]

हे दत्तकविधानानंतर भास्कर तात्याबा चंदनशिव झाले. निजाम राजवटीतील मराठवाड्यात असलेल्या उस्मानाबाद जिल्हयातील कळंब गावापासून बार्शीकडे कडे जाणाऱ्या महामार्गावरील हासेगाव हे त्यांचे मूळ जन्म गाव होय.[] लातूर येथील स्वामी विवेकानंद हॉस्पीटल येथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू ८० व्या वर्षी झाला.[]

प्राथमिक शिक्षण खेडेगावात झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी अंबाजोगाई आणि औरंगाबाद असा प्रवास त्यांनी केला. वयाच्या विसाव्या वर्षी भास्कर चंदनशिव यांनी कथालेखनास प्रारंभ केला. तत्पूर्वी मराठवाडयाच्या काळजावर सातत्याने कोरला गेलेला दुष्काळ हा त्यांच्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा विषय राहिला.

इ.स. १९६२ ते ७२ या कालावधीत दुष्काळाचा अभ्यास आणि अनुभव यांवर लक्ष केंद्रित करून त्यांनी काम केले.[]

साहित्यिक

[संपादन]

त्यांच्या साहित्यकृतीमध्ये सातत्याने ग्रामीण भागातील शेतकरी, सामान्य नागरिक नायकाच्या रूपाने वाचकांच्या समोर येतो. ज्यांची नाळ मातीशी जोडली गेलेली आहे आणि मूळ गावगाडयात घट्ट रुतलेले आहे. चंदनशिव यांच्या ‘जांभळढव्ह’, ‘मरणकळा’, ‘अंगारमाती’, ‘बिरडं’, ‘नवी वारुळं’ या कथासंग्रहांचा आवर्जून उल्लेख केला जातो. मानवी समाजजीवनाला व्यापकपणे स्पर्श करणाऱ्या या कथासंग्रहांनी शेती क्षेत्रात जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे उगवून वर आलेले वेदनेचे कोंब दाखवून देण्याचे काम केले.

पुस्तके

[संपादन]

कथासंग्रह

[संपादन]
  • अंगारमाती
  • जांभळढव्ह
  • नवी वारुळं
  • बिरडं
  • भिंगुळवाणा
  • मरणकळा

अन्य संपादित साहित्य

[संपादन]

सन्मान आणि पुरस्कार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ भालेराव, इंद्रजीत. निवडक लाल चिखल. १५ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.
  2. ^ "प्रा. डॉ. भास्कर चंदनशिव यांचे निधन:वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, लातूर येथे 15 दिवसांपासून सुरू होते उपचार". दैनिक दिव्य मराठी. २८ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
  3. ^ "ग्रामीण जीवनाचा 'बखर'कार!".