गंगाधर देवराव खानोलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गंगाधर देवराव खानोलकर
जन्म नाव गंगाधर देवराव खानोलकर
जन्म ऑगस्ट १९, इ.स. १९०३
खानोली, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू सप्टेंबर ३०, इ.स. १९९२
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
विषय चरित्र
प्रभाव श्रीपाद कृष्ण कोल्हटकर

गंगाधर देवराव खानोलकर (ऑगस्ट १९, इ.स. १९०३ - सप्टेंबर ३०, इ.स. १९९२) हे मराठी लेखक, चरित्रकार होते.

जीवन[संपादन]

गंगाधर खानोलकरांचा जन्म ऑगस्ट १९, इ.स. १९०३ रोजी महाराष्ट्रातील रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या 'खानोली' गावी झाला. त्यांचे शिक्षण रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात झाले.

साहित्यिक कारकीर्द[संपादन]

खानोलकरांनी आपल्या साहित्यिक कारकिर्दीत २२ ग्रंथ लिहिले. 'अर्वाचीन वाङ्‌मय' (खंड १ ते ९), श्रीपाद कृष्ण कोल्हटकर चरित्र, वालचंद हिराचंद चरित्र, माधव ज्यूलियन चरित्र, के.बी. ढवळे चरित्र इत्यादी ग्रंथरचनांचा त्यात समावेश होतो. याखेरीज 'स्वामी विवेकानंद समग्र वाङ्‌मय' (खंड १- २१) (इ.स. १९६२), 'पुणे शहराचे वर्णन' (इ.स. १९७१), कोल्हटकर लेखसंग्रह, डॉ. केतकरांचे वाङ्‌मयविषयक लेख, शेजवलकर लेखसंग्रह (इ.स. १९७७), धनंजय कीर: व्यक्ती आणि चरित्रकार (इ.स. १९७४), सोन्याचे दिवस: बा.ग. ढवळे स्मृतिग्रंथ (इ.स. १९७४) इत्यादी ग्रंथ त्यांनी संपादिले.
ग्रंथलेखनाखेरीज खानोलकरांनी पत्रकारिताही केली. 'वैनतेय' साप्ताहिकाचे त्यांनी काही काळ संपादकपद सांभाळले.

प्रकाशित साहित्य[संपादन]

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
मराठी गद्यवैभव समीक्षा
महाराष्ट्र रसवंती समीक्षा
अर्वाचीन वाङ्‌मयसेवक (खंड १ ते ९) चरित्र इ.स. १९३८
आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार वालचंद हिराचंद: व्यक्ति, काळ व कर्तृत्व चरित्र शेट वालचंद हिराचंद मेमोरियल ट्रस्ट इ.स. १९६५
महाराष्ट्र रसवंती समीक्षा

संदर्भ[संपादन]

[DçJçç&®ççÇvç cçjçþçÇ Jçç*ddcç³çmçíJçkçÀç