महेश वासुदेव केळुसकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महेश केळुस्कर या पानावरून पुनर्निर्देशित)
महेश केळुस्कर
जन्म जून ११, इ.स. १९५९
फोंडाघाट, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता

महेश वासुदेव केळुस्कर (जून ११, इ.स. १९५९; फोंडाघाट, महाराष्ट्र - हयात) हे मराठी भाषेतील कवी आणि लेखक आहेत.

जीवन[संपादन]

केळुस्करांनी एम.ए., पीएच.डी.पर्यंत उच्चशिक्षण केले आहे. इ.स. १९८३ सालापासून ते आकाशवाणीत नोकरी करत आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेची तीन वर्षासाठीच्या नव्या केंद्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून त्यात त्यांची अध्यक्षपदी नेमणूक झाली आहे.

प्रकाशित साहित्य[संपादन]

कादंबरी[संपादन]

  • यू कॅन आल्सो विन

कवितासंग्रह[संपादन]

  • मोर (इ.स. १९८६)
  • पहारा (इ.स. १९९६)
  • झिनझिनाट (इ.स. १९९७)
  • कवितांच्या गावा जावे[१] (३१ जुलै, इ.स. २००१)
  • मी आणि माझा बेंडबाजा (चारोळी विडंबन)
  • रोझ डे (पॉकेटबुक)
  • साष्टांग नमस्कार

संदर्भ[संपादन]

  1. 'कवितांच्या गावा जावे' हा अशोक नायगावकर, निरंजन उजगरे, नलेश पाटील, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, सौमित्र ह्या सर्व कवींचा एकत्रित उपक्रम डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.