डेक्कन जिमखाना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेक्कन जिमखाना भारताच्या पुणे शहरातील एक भाग आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात पेठांच्या पश्चिमेस असलेला हा भाग उच्चभ्रू समजला जातो. या भागातून कर्वे रोड, जंगली महाराज मार्ग, फर्ग्युसन रोड असे महत्त्वाचे मार्ग सुरू होतात. येथील पीएमपीएमएलचे बसस्थानकातून शहराच्या इतर भागांत सार्वजनिक वाहतूक उपलब्ध आहे.

या भागास डेक्कन जिमखाना या क्रीडासंस्थेचे नाव आले आहे. याशिवाय येथे पीवायसी हिंदू जिमखाना तसेच इतर अनेक क्रीडासंस्था आहेत. या भागात अनेक उपाहारगृहे आहेत.