खराडी
Appearance
खराडी पुणे शहराच्या पूर्व भागातील उपनगर आहे. हा भाग अत्यंत वेगाने विकसित होत आहे. त्याचे कारण म्हणजे येथे असणारे इयॉन आय-टी पार्क आणि नियोजित वर्ल्ड ट्रेड सेंटर. अनेक माहिती-तंत्रज्ञान संस्था (आय.टी पार्क) स्थित आहेत.
अनेक पंचतारांकित हॉटेल, मल्टिप्लेक्स, शॉपिंग मॉल्स खराडीच्या आसपास आहेत. हयात रिजेंसी, रॅडिसन ब्लु, नोवोटेल, फिनिक्स मार्केट सिटि, इन ऑर्बिट, अमानोरा, सिझन्स मॉल तरुण वर्गाला आकर्षित करतात.