शिवाजीनगर (पुणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(शिवाजीनगर, पुणे या पानावरून पुनर्निर्देशित)

शिवाजीनगर (पूर्वीच भांबुर्डे) पुणे शहरातील एक भाग आहे. पुण्याचे न्यायालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शेतकी महाविद्यालय, इ. अनेक महत्त्वाच्या संस्था या भागात आहेत. शिवाजीनगर रेल्वे स्थानक पुणे-मुंबई लोहमार्गावरील स्थानक आहे तर शिवाजीनगर बस स्थानक पुण्याला महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतील महत्त्वाच्या शहरांशी जोडते.