येथून पुणे विमानतळ जवळ आहे. अहमदनगर शहराला जोडणारा रस्ता येथूनच सुरू होतो. कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, विमान नगर यांसारखे शहराचे महत्त्वाचे भाग येथून अत्यंत जवळ आहेत.
पुणे शहराचे मध्यवर्ती कारागृह येरवडा येथे आहे. भारतातील अत्यंत ऐतिहासिक असे हे कारागृह १९ व्या शतकात बांधण्यात आले होते.
येरवड्यात वेड्यांचे इस्पितळही आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी यांचे वास्तव्य असलेला ऐतिहासिक आगाखान पॅलेस येरवडा येथे आहे. दुष्काळग्रस्तांना रोजगार देण्यासाठी सुल्तान महंमद शाह, आगाखान, ३रे यांनी हा महाल १८८२ साली बांधला. युवराज करीम हुसेनी आगाखान, ४थे यांनी हा पॅलेस महात्मा गांधी आणि त्यांच्या विचारांच्या स्मरणार्थ १९६९ साली भारत सरकारला अर्पण केला. देशी विदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेले आगाखान पॅलेस हे आता राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात आले आहे. महात्मा गांधी यांनी वापरलेल्या वस्तुंचे संग्रहालय तसेच त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांची समाधी आगाखान पॅलेस येथे आहे.