मुकुंदराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मुकुंदराज

मुकुंदराज (जीवनकाल: इ.स.चे १२वे शतक) हे मराठी भाषेतील आद्यकवी होते. ज्ञानेश्वरांच्या जन्माच्या आधी मुकुंदराजांना समाधी घेऊन ७५ वर्षे झाली होती. मुकुंदराजांनी विवेकसिंधु या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन केले आहे. शा.श. १११० सालच्या सुमारास लिहिला गेलेला मराठीतील हा आद्यग्रंथ त्यांनी बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई या आपल्या जन्मगावी लिहिला. या ग्रंथात एकूण अठरा ओवीबद्ध प्रकरणे आहेत.[१] [२] [३] [४]

परमामृत हा मुकुंदराज यांनी लिहिलेला दुसरा ग्रंथ. या ग्रंथाबद्दल डाॅ. श्रीकृष्ण द. देशमुख यांनी दिलेली माहिती [१]येथे वाचावी. या ग्रंथाचे १८पैकी चौदा भाग आॅडियो स्वरूपात येथे ऐकायला मिळतील.

मुकुंदराज यांची समाधी अंबाजोगाई शहराच्या वायव्य दिशेस ५ कि.मी अंतरावर आहे. शहरात अमर हबीब यांनी स्थापन केलेले मुकुंदराज कविता ग्रंथालय आहे. ग्रंथालयात मराठीत प्रकाशित झालेल्या सर्व उपलब्ध कविता संग्रहित केल्या आहेत. ग्रंथालयाचा पत्ता :

मुकुंदराज कविता ग्रंथालय, अंबर हौसिंग सोसायटी, अंबाजोगाई -४३१५१७ जिल्हा- बीड

मुकुंदराज कवीवरील मराठी साहित्य[संपादन]

  • आद्यकवी श्री मुकुंदराज : एक शोध वाट (ॲड. दत्तात्रेय आंधळे)
  • विवेकसिंधू (डॉ. श्री.द. देशमुख)संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "लोकसत्ता:मराठी भाषा विद्यापीठाची घोषणा करण्याची मागणी". १९ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "मराठवाडा नेता[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". १९ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)
  3. ^ "लोकसत्ता:मराठी कवितेसाठी". १९ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ "सकाळ". १९ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.