Jump to content

दशभुजा गणपती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पुण्याच्या कर्वे रोडवर एस.एन.डी.टी कॉलेजजवळ हे दशभुजा गणपतीचे देऊळ आहे. या देवळापासूनच कोथरूड या उपनगराची सुरुवात होते.

पुण्यात दशभुज गणेशाच्या एकूण तीन मूर्ती आहेत. त्यापैकी कोथरूडची ही मूर्ती सर्वांत मोठी आहे. उत्तर पेशवाईत हरिपंत फडके यांनी हे मंदिर बांधून दुसऱ्या बाजीरावाच्या ताब्यात दिले. मंदिराची व्यवस्था देवदेवेश्वर संस्थानातर्फे पाहण्यात येते. या मंदिराचा जीर्णोद्धार कोंडोपंत महादेव ऊर्फ दादासाहेब कुमठेकर यांनी इ.स. १९४६ मध्ये केला. हल्लीचा सभामंडप १९५७-५८ मध्ये बांधण्यात आला. हा गणपती उजव्या सोंडेचा आणि दहा हात असलेला आहे. गणपती बसलेला असून, उजवा पाय दुमडून जवळ घेतलेला व डाव्या पायाची मांडी घातली आहे. त्याच्या गुडघ्यावर द्विभुज देवी आहे.[ संदर्भ हवा ]