Jump to content

नागेश पेठ (पुणे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(न्याहाल पेठ, पुणे या पानावरून पुनर्निर्देशित)

नागेश पेठ पुणे शहरातील एक भाग आहे.

पुणे शहरातील पेठांच्या नावांसंदर्भात न्याहाल पेठ हे नाव १९६५-७० सालापर्यंत वापरात होते.[ संदर्भ हवा ] १८५१साली या पेठेत एकूण ६६५ लोक राहात होते. (पुण्याची तत्कालीन लोकसंख्या ७३०००).१९०१ साली पुण्याची लोकसंख्या १ लाख अकरा हजारावर गेली, तर न्याहाल पेठेची बाराशेवर. म्हणजे न्याहाल पेठेत पुण्याच्या संपूर्ण वस्तीपैकी एक टक्का लोक राहात होते. याच पेठेला नागेश पेठ असेही म्हणत. पुण्याला महापालिका होण्यापूर्वीच, म्हणजे इ.स.१९५० च्या आधी, पुणे नगरपालिकेने या पेठेचे नाव अधिकृतरीत्या नागेश पेठ असे केले. आजही २०१३ साली, ही पेठ पुण्यातील रास्ता पेठेला अगदी लागून आहे.