माधव मोडक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माधव मोडक
बंधु माधव.jpg
माधव दादाजी मोडक
जन्म नोव्हेंबर ३, इ.स. १९२७
मृत्यू ऑक्टोबर ७, इ.स. १९९७
धर्म बौद्ध
प्रभाव भीमराव रामजी आंबेडकर
पुरस्कार दलित मित्र पुरस्कार

माधव दादाजी मोडक ऊर्फ बंधु माधव (जन्म : नोव्हेंबर ३, इ.स. १९२७; मृत्यू : ऑक्टोबर ७, इ.स. १९९७) हे मराठी लेखक होते. दलितांवरील साहित्यरचनेसाठी ते परिचित आहेत.

बंधु माधव यांनी अनुसूचित समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेल्या "जनता' व "प्रबुद्ध भारत' या साप्ताहिकांतून प्रबोधनपर लिखाण केले. कलापथकाच्या माध्यमातून आणि कथासंग्रह, कादंबऱ्या या माध्यमांतून त्यांनी प्रबोधनाचे प्रभावी कार्य केले.

जीवन व कार्य[संपादन]

शाळेत असतानाच बंधु माधव हस्तलिखितांतून कथालेखन करीत होते. तसे त्यांचे नियमित कथालेखन इ.स. १९४२ पासून सुरू झाले. त्यांनी म्हटले आहे, की "कथा वाचन ऐकत शिकलो. वयाने वाढत गेलो. वयात आलो. तारुण्याची गुलाबी स्वप्‍ने मला पडू लागली. त्या गुलाबी स्वप्नातील कथाच प्रथम प्रेमकथा म्हणून लिहू लागलो.'

बंधु माधव यांनी नोकरी सोडून पददलित समाजात जागृती घडवून आणण्यासाठी "कलापथक' स्थापन केले. सांगली, कोल्हापूर व सातारा या जिल्ह्यात ते "कलापथकाद्वारे' समाज जागृतीचे काम करत. प्रखर, अविरत आणि समाजहितोपयोगी लेखनासाठी मुंबईच्या महाराष्ट्र दलित साहित्य संघातर्फे त्यांचा इ.स. १९५६ मध्ये सत्कार करण्यात आला.

प्रकाशित साहित्य[संपादन]

  • आम्हीही माणसं आहोत
  • पेटलेले आकाश
  • शाहीर भाऊ फक्कड
  • रमाई
  • वगसम्राट

अधिक वाचन[संपादन]

  • संजय पासवान. एन्सायक्लोपीडिया ऑफ दलित्स इन इंडिया (भारतातील दलितांविषयीचा ज्ञानकोश) (इंग्लिश मजकूर). Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.