सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पुणे विद्यापीठ या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
ब्रीदवाक्य यः क्रियावान् स पण्डितः
Type शासकीय शैक्षणिक आस्थापना
स्थापना १० फेब्रुवारी १९४९
विद्यार्थी १,७०,०००
संकेतस्थळ www.unipune.ac.inUniversity of Pune -Main Building 1.JPG

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्यातील पुणे मधील एक विद्यापीठ आहे. मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी झाली. या संस्थेचे मुख्य आवार ४११ एकर क्षेत्रांत पसरलेले आहे. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. भारताच्या काही प्रसिद्ध विद्यापीठातील हे एक विद्यापीठ आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात

  • ४६ शैक्षणिक विभाग आहेत.
  • ४७४ महाविद्यालये आणि
  • सुमारे सहा लाख विद्यार्थी संख्या आहे.

इतिहास[संपादन]

पुणे विद्यापीठाची स्थापना पुणे विघापीठ अधिनियमच्या अधीन केली गेली, ज्याला १० फेब्रूवरी १९४८ला मुंबई विधान-मंडल ने पारित केले. त्याच वर्षी, डा एम॰ आर॰ जयकर यांनी विघापीठचे प्रथम उपकुलपतिचे पदभार ग्रहण केले. श्री बी॰ जी॰ खैर, जे मुंबई सरकार (विधान-मंडल)चे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री होते, त्यांच्या प्रत्यनातुन विघापीठला को मोठा भूखण्ड मिळवून देण्यासाठी मदत केली. प्रारंभिक १९५० मध्ये, विद्यापीठाला ४११ एकड़ (१.७ किमी²) भूमि आवंटित केली गेली.

पुणे विद्यापीठाची स्थापना झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हे त्या विद्यापीठाच्या अखत्यारित होते. इ.स. १९६२ मध्ये त्यांतून काही जिल्हे वगळून कोल्हापूर येथे स्थापन झालेल्या शिवाजी विद्यापीठच्या अखत्यारित गेले. इ.स. १९९० मध्ये धुळेजळगाव यांसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन झाले. आता फक्त पुणे, नगर, नाशिक हे तीनच जिल्हे पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येतात.

कुलगुरू[संपादन]

नामविस्तार[संपादन]

इ.स. २००४ साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी पुणे विद्यापीठाचे आधीचे नाव बदलून 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' करावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. पुणे विद्यापीठाच्या नावाशी, स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचलेल्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांचे नाव जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. ७ जून २०१४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं.[१]

अध्यासने[संपादन]

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २० अध्यासने आहेत.

विभाग आणि संशोधन केंद्रे[संपादन]

शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एकूण ४६ विभाग आहेत, ज्यांमध्ये कला, विज्ञान, विधी, भाषां, मानव्यशास्त्रे, आणि अनेक आधुनिक ज्ञानशाखांच्या अध्यापनाचे आणि संदर्भातील संशोधनाचे काम केले जाते.

ग्रंथालय[संपादन]

जयकर ग्रंथालय

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "पुणे विद्यापीठाचा नामांतराचा प्रस्ताव मंजूर". आयबीएन लोकमत. ३० ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]