संचेती हॉस्पिटल, पुणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संचेती हॉस्पिटल, पुणे
प्रकार वैद्यकीय सेवा
उद्योग क्षेत्र वैद्यकीय सेवा
मुख्यालय

पुणे, भारत

पुणे
सेवा वैद्यकीय सेवा
मालक डॉ. संचेती

संचेती हॉस्पिटल, पुणे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पुणे शहरातील शिवाजीनगर भागात असलेले अस्थिरोग रुग्णालय आहे. याची स्थापना डॉ. कांतिलाल संचेती (जन्म : २४ जुलै, इ.स. १९३६) यांनी केली. दारिद्ऱ्याला तोंड देत, शिक्षणासाठी कमाई करत त्यांनी ऑर्थोपेडिक सर्जनचा अभ्यासक्रम चिकाटीने पूर्ण केला. १९७२ साली त्यांनी १० खाटांचे रुग्णालय सुरू केले आणि हळूहळू ते वाढवत २०० खाटांपर्यंत नेले.

आता रुग्णालयाबरोबरच तेथे संचेती इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक्स ॲन्ड रिहॅबिलिटेशन ही संस्था आहे. या संशोधन केंद्राला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची मान्यता आहे.


कांतिलाल संचेती यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

  • डॉ. कांतिलाल संचेती यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
  • पुण्याच्या शारदा ज्ञानपीठम्‌‍कडून ऋषितुल्य व्यक्ती म्हणून सत्कार (६-९-२०१६)