रुबी हॉल क्लिनिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रुबी हॉल क्लिनिक
ब्रीदवाक्य Patient safty and quality care
प्रकार वैद्यकीय सेवा
उद्योग क्षेत्र वैद्यकीय सेवा
स्थापना १९५९
संस्थापक डॉ.के.बी.ग्रँट
मुख्यालय

पुणे, भारत

पुणे
कार्यालयांची संख्या
महत्त्वाच्या व्यक्ती डॉ.के.बी.ग्रँट
सेवा वैद्यकीय सेवा
मालक पुना मेडिकल फाऊंडेशन
कर्मचारी २०५०
विभाग ४२
संकेतस्थळ http://www.rubyhall.com/

रुबी हॉल क्लिनिक हे एक पुण्यातील प्रमुख रुग्णालयांपैकी एक रुग्णालय आहे. या रुग्णालयाची सुरवात डॉ.के.बी.ग्रँट यांनी १९५९ ला सध्या असण्याऱ्या ठिकाणी पूर्वी असणाऱ्या जनरल डेव्हिड ससुन यांच्या बंगल्यात केली. १९६६ मध्ये रुग्णालयाची मालकी स्वमालकीच्या पुना मेडिकल फाऊंडेशन कडे गेली. २००० मध्ये ग्रँट मेडिकल फाऊंडेशनची स्थापना झाली व रुबी हॉल क्लिनिकचा विस्तार होत गेला. या रुग्णालयात ५३५ बेडची सुविधा असून ५०० संलग्नित डॉक्टर आहेत व १५० विशेष तज्ञ डॉक्टर आहेत. याशिवाय १४०० लोकांचा सहायक कर्मचारी आहेत. रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले ह्रदयरोग, ह्रदयशस्त्रक्रिया, न्युरॉलॉजी, नैदानिक विभाग, कॅन्सर रिसर्च सेंटर, अति दक्षता विभाग, रक्तपेढी हे विभाग आहेत.

संदर्भ[संपादन]

संकेतस्थळ