उमाकांत निमराज ठोमरे
Jump to navigation
Jump to search
उमाकांत निमराज ठोमरे | |
---|---|
जन्म नाव | उमाकांत निमराज ठोमरे |
जन्म | १५ ऑगस्ट, १९२९ |
मृत्यू | ऑक्टोबर ७, १९९९ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | साहित्य |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | ललित |
प्रसिद्ध साहित्यकृती | वगैरे वगैरे |
उमाकांत निमराज ठोमरे (जन्म : १५ ऑगस्ट, १९२९ - - ऑक्टोबर ७, १९९९) हे मराठी लेखक, संपादक आणि बालसाहित्यकार होते.
उमाकांत ठोमरे यांचा जन्म अहमदगरला झाला. तिथेच प्राथमिक शिक्षण, मग पुण्यात माध्यमिक शिक्षण. ते मुंबईत स्थायिक झाले होते. ते वीणा या दर्जेदार मराठी मासिकाचे संपादक होते. त्यांनी त्या मासिकात लिहिलेल्या लेखांचे संग्रह ’वगैरे...वगैरे’ या पुस्कात संग्रहित आहेत. व्यंग्यचित्र हा साहित्यप्रकाराला प्रतिष्ठा मिळवून देऊन लोकप्रिय करण्यास वीणा मासिकाचा मोठा वाटा आहे.