Jump to content

संजीवनी खेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संजीवनी खेर

संजीवनी खेर या ऐतिहासिक स्त्रियांची व्यक्तिचित्रणात्मक तसेच विविध विषयांवर संशोधनात्मक पुस्तके लिहिणाऱ्या मराठी लेखिका, पत्रकार आहे.

प्रकाशित साहित्य

[संपादन]
  • अवधची बेगम( १८५७ च्या स्वातंत्र्य समरातील अयोध्येच्या बेगमवरील कादंबरी)
  • संचित ( धर्म, कला, इतिहासाचा मागोवा घेणारा लेख संग्रह)
  • मालिका-ए-हिंदोस्तान नूरजहान (कलासक्त, धूर्त साम्राज्ञीवरील कादंबरी)
  • पंडिता रमाबाई- ज्वालाशिखा (लघु नाटक)
  • सर्वसाक्षी ( जगभरातील सूर्य उपासनेचे संशोधन ,लेखन)( १ लाखाचा राज्य पुरस्कार)
  • जलसूक्त ( नद्यांभोवतीची संस्कृती आणि जल स्थिती)
  • देवानम प्रिय ( सम्राट अशोकावरील कादंबरी)
  • ख्रिस्तोफर कोलंबस(दर्यासारंगाच्या धाडसाची कहाणी)
  • मायादर्पण (मराठी अभिनेत्रींवरील लेख)
  • दर्पण (वर्तमानातील सामाजिक घटनांवर भाष्य)
  • शतकाचे ठसे (गतशतकातील थोरांचा परिचय)
  • धर्म(भारतातील आठ धर्मांचा परिचय)
  • नोबेल साहित्यिक १ (साहित्यासाठी नोबेल पारितोषिक प्राप्त साहित्यिकांचा परिचय)
  • नोबेल साहित्यिक २ ( साहित्यासाठी नोबेल पारितोषिक प्राप्त साहित्यिकांचा परिचय -वाढीव)
  • क्षण मोलाचा ( कथासंग्रह)
  • पाय मातीचे (कथासंग्रह)
  • चित्रकथी ( उत्तुंग प्रतिभेच्या दिग्दर्शकांवरील लेख संग्रह

अनुवाद

[संपादन]
  • अंतरीचा ठेवा( विनी मंडॆलाच्या पार्ट ऑफ माय सोलचे भाषांतर)
  • क्षण मोहाचा(अनुवाद)
  • बुद्ध ( दीपक चोप्रांच्या कादंबरीचा अनुवाद)
  • ईदगाह ( अनुवाद)
  • बेनझीर भुत्तो अनुवाद- अप्रकाशित
  • संभाजीची कहाणी (अमरचित्रकथा)

सन्मान

[संपादन]
  • नाशिक जिल्हा साहित्य संमेलनाची अध्यक्ष
  • साहित्य संघाचा पत्रकारिता सन्मान
  • पत्रकार संघाचा सन्मान
  • हेमांगी वार्षिकाचा सन्मान-लेखन आणि पत्रकारितेसाठी
  • वनिता समाज लेखन आणी पत्रकारितेतील कामासाठी
  • सृजनशील पत्रकारितेसाठी -कै. वसंत उपाध्ये पुरस्कार
  • एशियाटिक सोसायटीच्या व्यवस्थापकीय मंडाळावर उपाध्यक्ष
  • दूरदर्शन ग्रेडेशन कमिटीवर सदस्य

लेखन- कार्यक्रम

[संपादन]
  • आदिवासींच्या जीवनशैलीवर प्रत्यक्ष भेटींवर आधारित रेडिऒ मालिका -, कथांचे दूरदर्शन रूपांतर
  • ‘ग्लोरी ऑफ इंडिया’ इंदिरा गांधींच्या भाषणाच्या कॅसेटस, मुलांसाठी संस्काराच्या कॅसेटस
  • मराठी साम्राज्याचे वैभव साहित्य आणि पराक्रम-ग्वाल्हेर, तंजावूर, देशाविदेशी रामायणावर लेख. भाषणे, भाषणं सांस्कृतिक संचितावर ,भाषणे पाक भारत संबंधावर भाषणे
  • ८४व्या साहित्य संमेलनासाथी ‘ठाणे सांस्कृतिक संचित ’ एक तासाचा अनुबोधपट -डॉक्युमेंटरी , ‘ सा रम्या नगरी-वाई’ पंचेचाळीस मिनिटांचा अनुबोधपट
  • दुबई विश्व साहित्य संमेलनात सहभाग
  • मुंबई दूरदर्शन, आकाशवाणीवर असंख्य कार्यक्रमात सहभाग, आयबी एन, मी मराठी इत्यादी वाहिन्यआंवर कार्यक्रम संचालन आणि सहभाग

इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकात त्यांनी अनुवाद केलेला ईदगाह हा पाठ समाविष्ट केलेला आहे ( मूळ लेखक प्रेमचंद)