निनाद बेडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
निनाद बेडेकर
Ninad Bedekar.jpeg
निनाद बेडेकर
जन्म नाव निनाद गंगाधर बेडेकर
जन्म ऑगस्ट १७, १९४९
मृत्यू १० मे, इ.स. २०१५
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र इतिहाससंशोधन, साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार इतिहाससंशोधन, साहित्य
विषय शिवाजीकालीन इतिहास
वडील गंगाधर बेडेकर

छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणार्‍या अभ्यासकांच्या प्रभावळीत निनाद बेडेकर यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले होते. जगभरात फिरून, पुरातन कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून, गड-किल्ले धुंडाळून ते शिवकालीन इतिहासात रममाण झाले होते. या अभ्यासासाठीच अरेबिक व पर्शियन भाषाही ते शिकले होते. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले होते. शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी अशा अनेक पैलूंपैकी प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करून त्यांनी त्यावर लिखाण केले होते. शिवाजीची व्यवस्थापकीय कौशल्ये आजच्या 'एमबीए'वाल्यांना कळावीत म्हणून इंग्रजीतही त्यांनी भाषणे दिली होती. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची गोडी निर्माण करण्यासाठी ते व्याख्यानमाला आयोजित करत.

वयाची साठी पूर्ण झाल्यावर २००९ मध्ये बेडेकर यांनी युवक आणि गडप्रेमींना घेऊन ६१ किल्ल्यांवर भ्रमंती करण्याचा संकल्प केला होता. मात्र, त्या वर्षभरात त्यांनी १०१ किल्ल्यांना भेटी दिल्या.

शिवकालीन इतिहासाबद्दलची त्यांची ही तळमळ लक्षात घेऊन, शिवाजीच्या चरित्राची नव्या पिढीला ओळख करून देण्यासाठी आणि गड-किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नेमलेल्या समितीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनाद बेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.

निनाद बेडेकर यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • अजरामर उद्‌गार (ऐतिहासिक)
  • आदिलशाही फर्माने (ऐतिहासिक; सहलेखक - गजानन मेहंदळे, डॉ.रवींद्र लोणकर
  • गजकथा (ऐतिहासिक)
  • छत्रपती शिवाजी (चरित्र)
  • झंझावात (ऐतिहासिक)
  • थोरलं राजं सांगून गेलं (ऐतिहासिक ललित)
  • बखर पानिपत ची (मूळ लेखक - रघुनाथ यादव चित्रगुप्त, इ.स. १७६१)
  • विजयदुर्गाचे रहस्य (पर्यटनविषयक)
  • शिवभूषण (ऐतिहासिक)
  • समरांगण (बालसाहित्य)

जीवन[संपादन]

पुरस्कार[संपादन]