मुठा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मुठा
पाणलोट क्षेत्रामधील देश महाराष्ट्र
ह्या नदीस मिळते भीमा नदी
धरणे पानशेत धरण, खडकवासला धरण

मुठा नदी पुणे जिल्ह्यातील एक नदी आहे. ह्या नदीचा उगम सह्याद्रीच्या पर्वतरांगेत होतो. तेथून ती पूर्व दिशेला वाहते.

लवासा या गिरिस्थानाकडे जाताना टेमघर धरण लागते. हे मुठेवरचे पहिले धरण आहे. येथून लवासाला जाण्यासाठी डावीकडे वळले की उजवीकडचा अत्यंत दुर्गम कच्चा रस्ता जांभळी गावापासून पुढे निरगुडवाडीला जातो. त्यापुढचा रस्ता मात्र पायी ट्रेकिंग करत जावे असा आहे. साधारण दहा किमी अंतरावर मांडवखडक वस्तीजवळ आपली मुठा नदी सुरू होते. या उगमावरती एक गोमुख बसविलेले आहे.

उगमानंतर काही अंतरावर मुठेचे लहान मुलाप्रमाणे अवखळपणे दुडदुडणारे रुपडे दिसते. नंतर सांगरूणला आंबी नदी मुठेला येऊन मिळते. या जोडनदीला थोड्याच अंतरावर मोसे नदीसुद्धा येऊन मिळते. हा त्रिवेणी संगमच आहे.

मुठा नदीवरची धरणे[संपादन]

खडकवासल्यापर्यंत कुठे दुडू-दुडू तर कुठे खळाळत धावरणारी नदी शिवणे येथे कुंठित झाली आहे. आसपासच्या गावांचा कचरा आणि सांडपाणी त्यात मिसळते. येथून पुढे मुठा शहरात प्रवेश करते.

पुणे शहराच्या पूर्व बाजूस मुठेचा संगम मुळा नदीशी होतो. ही मुळा नदी पुढे जाऊन तुळापूर येथे भीमा नदीस मिळते.

या नदीत झालेल्या प्रचंड प्रदूषणामुळे यातील माशांच्या १२० प्रजातींपैकी फक्त १६ प्रजाती आता शिल्लक आहेत.[१]

मुठा नदीकाठची गावे[संपादन]

 • मांडवखडक
 • निरगुणवाडी
 • जांभळी
 • सांगरूण
 • शिवणे
 • पुणे

पूल[संपादन]

 • एस.एम.जोशी पूल
 • ओंकारेश्वर पूल (विठ्ठल रामजी शिंदे पूल)
 • जयंतराव टिळक पूल
 • झेड पूल (Z-Bridge)
 • दगडीपूल (डेंगळे पूल)
 • नवा पूल (शिवाजी पूल - Lloyd's Bridge)
 • भिडे पूल
 • म्हात्रे पूल
 • यशवंतराव चव्हाण पूल
 • राजाराम पूल
 • लकडीपूल (संभाजी पूल)
 • वारजे पूल( देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर)
 • संगम पूल (रेल्वेचा आणि वाहनांचा). हा मुठेवरचा शेवटचा पूल.
 • आणि शिवाय दुचाकीसाठीचे दोन पूल आणि काही कॉज वे


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. माशांनीही घेतला निरोप मुठेतील माशांनीही घेतला निरोप. ईसकाळ.